Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सीमारेषा

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Wed, 03/20/2013 - 07:21
आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर जगणे तसे फार अवघड असते गं ------ श्वासाइतकीच सवयीची झालेल्या तुझ्या आणि माझ्यातील अंतर आता समुद्र आणि चंद्राइतकेच आहे एकतर रात्रिशिवाय नजरानजर नाही आणि समुद्राला तो चंद्र स्पर्शातित.... आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर जगणे फार अवघड असते गं ------- सूर्यास्तानंतर चंद्रोदयापर्यंतच्या वेळात तुझे भास मृगजळासारखे मागेपुढे करतात कटलेल्या पतंगामागे धावण्यार्‍या मुलासारखा मीही त्यांचा पाठलाग करत राहतो मगं जाणवत ज्या झाडावर पतंग अडकलाय त्याच झाडामागे चंद्रही अडकलाय आता चंद्र आणि पतंग यात निवड करणे आले, पण चंद्रही हाताला लागत नाही अन् तो पतंगही... खरचं, आहे आणि नाही यातील सीमारेषा जिवघेणी असते गं ------- आजकाल तू सोडून दुसरे विषय नसतात आणि तुझे विषय अथांग असतात ------- काळ्याभोर डोळ्यांत तू नेहमी एक हलकी स्मितरेषा घेऊन वावरायचीस अजूनही तेच डोळे तुझ्या कपाटावरच्या आरश्यात दिसतात, पण ती स्मितरेषा.. ती धूसर झाली आहे आहे कि नाही? हम्म.. आहे आणि नाही यातील सीमारेषा फार जीवघेणी असते गं! ------ एकदा सांगून टाक अजूनही तू तशीच स्मितरेषा घेऊन वावरतेस? आहे आणि नाही यातल्या सीमारेषेवरची!! ------ आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर जगणे तसे फार अवघड असते गं |-मिसळलेला काव्यप्रेमी -| (२०/०३/२०१३)

प्रतिक्रिया द्या
6863 वाचन

💬 प्रतिसाद (25)
क
कवितानागेश Wed, 03/20/2013 - 07:31 नवीन
:)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/20/2013 - 07:39 नवीन
दिल खुष कर देते हो आप...!!! :-) कटलेल्या पतंगामागे धावण्यार्‍या मुलासारखा मीही त्यांचा पाठलाग करत राहतो मगं जाणवत ज्या झाडावर पतंग अडकलाय त्याच झाडामागे चंद्रही अडकलाय आता चंद्र आणि पतंग यात निवड करणे आले, पण चंद्रही हाताला लागत नाही अन् तो पतंगही...>>> Image removed.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 10/24/2018 - 16:13 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
साऊ Wed, 03/20/2013 - 07:45 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Wed, 03/20/2013 - 07:46 नवीन
पहिल्या कडव्यातच गुरफटतेय पुन्हा पुन्हा! शब्द काही जीवघेणे..
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 03/20/2013 - 08:09 नवीन
अप्रतिम.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Wed, 03/20/2013 - 08:21 नवीन
__/\__ आपण तर मिकाच्या कवितांची फॅन आहोत बॉस्स.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 03/20/2013 - 09:38 नवीन
आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर जगणे तसे फार अवघड असते गं
तहेदिलसे आवडली आहे :)
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 03/20/2013 - 09:44 नवीन
तू सोडून दुसरे विषय नसतात
:)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/21/2013 - 12:46 नवीन
इंडीड. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
प
प्यारे१ Wed, 03/20/2013 - 10:48 नवीन
मिका, जास्त त्रास नका करुन घेऊ! :) कविता पटली नाही. 'पाष्ट इज पाष्ट' म्हणून सोडून द्या झालं! ;) -प्यारेकाका मस्त आहे!
  • Log in or register to post comments
अ
अनिदेश गुरुवार, 03/21/2013 - 07:52 नवीन
एकदा सांगून टाक अजूनही तू तशीच स्मितरेषा घेऊन वावरतेस? आहे आणि नाही यातल्या सीमारेषेवरची!! ---आवडली :)
  • Log in or register to post comments
त
तिमा गुरुवार, 03/21/2013 - 15:46 नवीन
पहिले कडवे विशेष आवडले. मिका इज मिका.
  • Log in or register to post comments
फ
फिझा Fri, 03/22/2013 - 06:08 नवीन
खूप आवडली कविता !!
श्वासाइतकीच सवयीची झालेल्या तुझ्या आणि माझ्यातील अंतर आता समुद्र आणि चंद्राइतकेच आहे एकतर रात्रिशिवाय नजरानजर नाही आणि समुद्राला तो चंद्र स्पर्शातित....
हे खासंच !!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sat, 03/23/2013 - 03:47 नवीन
मस्त रे मिका. संदिप-सलिल च्या एका गाण्यातले पुढचे हे शब्द तुझ्या कवितांच्या बाबतीत अगदी चपखल बसतात. तुझ्या कविता वाचताना - 'असे हालते आत हळुवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा' - असा अनुभव नेहमीच येतो.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 03/23/2013 - 04:06 नवीन
अशा आहे आणि नाहीच्या सीमारेषेवर जगण्याचा अनुभव घेतलाय त्यामुळे संपुर्ण रचना थेट आतपर्यंत पोहचलीय. आपण जे न देखे मध्ये येतो ते खास सिलेक्टेड लोकांसाठी..त्यातलेच तुम्ही एक!
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Sat, 03/23/2013 - 16:03 नवीन
"अशा आहे आणि नाहीच्या सीमारेषेवर जगण्याचा अनुभव घेतलाय " मी ही घेतलाय.. रडायचं नाही असं स्वतःला समजावलं, तरी रडू कोसळलच, प्रतिसाद देणार नाही ( अशी कविता लिहिल्याबद्दल तुमच्यावर रागवून :) ) तरी दिलाच.....
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Sat, 03/23/2013 - 16:34 नवीन
अवघडे बाबानु ! :-/
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर Sat, 03/23/2013 - 17:49 नवीन
अप्रतिम ! ! ! थेट काळजाला भिडलि ! ! !
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 03/26/2013 - 13:05 नवीन
नेहमीप्रमाणेच!
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sun, 03/31/2013 - 12:24 नवीन
अप्रतिम कविता.
  • Log in or register to post comments
न
नाना चेंगट Mon, 04/01/2013 - 13:33 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 10/24/2018 - 15:58 नवीन
क्या बात मिका!! डोळ्यात पाणी आलं हो...
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 10/24/2018 - 17:09 नवीन
आवडली सीमारेषेची कल्पना. :-) अवांतर: सीमारेषेवर जगणे या कल्पनेवरून लेडीहॉक : https://en.wikipedia.org/wiki/Ladyhawke_(film) या सिनेमाची आठवण झाली!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 10/25/2018 - 08:18 नवीन
साला, या मिकाच्या कविता केव्हाही आणि कितीही वेळा वाचल्या तरी आवडतातच रच्याकने :- हा गृहस्थ सध्या आहे कुठे? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा