बटाटा
केला जरी सर्व भाज्यांनी टाटा
उरतो केवळ मी बटाटा
उन्ह-पाऊस-थंडीत राहतो मी
सान-थोर सर्वांस भावतो मी
गाव-शहर असो पाऊल-वाटा
सर्वत्र दिसतो मी बटाटा
पार्टी असो वा उपास
करती जन माझा तपास
गोड अथवा तिखट
कुरकुरीत वा चिवट
परिस्थिती असो बिकट
असतो मी सदैव निकट
असा मी बटाटा
💬 प्रतिसाद
(12)
स
स्पंदना
गुरुवार, 03/21/2013 - 01:10
नवीन
- Log in or register to post comments
त
तिमा
गुरुवार, 03/21/2013 - 15:50
नवीन
हा शुद्ध अन्याय आहे. समोर जे दिसतंय ते त्याक्षणी खाता येत नाही. नुसता फोटो बघून पोटात आगडोंब उसळला.
- Log in or register to post comments
आ
आनन्दिता
गुरुवार, 03/21/2013 - 19:47
नवीन
कवितेखाली हे असले फोटो टाकण्याचा दुष्ट्पणा सुचणार्या अपर्णातै चा तीव्र णिशेढ!!!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/21/2013 - 10:58
नवीन
खरं आहे...! बटाटा भगवंतापेक्षाही सर्वव्यापी झालेला आहे. ;)
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 03/21/2013 - 11:03
नवीन
बटाट्याच्या जिलब्या कुठं मिळतात म्हणे? :#
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 03/21/2013 - 11:07
नवीन
बटाट्याचा अतिरेक झाल्याने जरा सध्या तिटकाराच आहे..पण बटाटाकाव्य आवडले.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 03/21/2013 - 16:32
नवीन
बटुची कविता आवडली. :)
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
गुरुवार, 03/21/2013 - 20:16
नवीन
राजा,
आपल्या कवितेच्या रुपातील प्रतिभा - 'बटाटा एकमेव तारक कंद भाजी' ने बहरुन आली आहे.... मला तर ती भाजीबाजारातील 'राजा' पदवीस पात्र असल्याचे मान्य आहे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 03/22/2013 - 09:31
नवीन
@ मला तर ती भाजीबाजारातील 'राजा' पदवीस पात्र असल्याचे मान्य आहे.>>> तरिही असला राजा लोकमान्य की हा प्रश्न उरतोच!
- Log in or register to post comments
र
राजा सोव्नी
Sun, 03/24/2013 - 13:51
नवीन
खड ,खड चुंबन
दंताडा दंताडी चे लग्न जाहले ,दिवस मजेत जावू लागले .
चुंबन घेता खड~खड होई ,ओठांचे मिलन ना होई ,
आगळे वेगळे ऐसे चुंबन ,तृप्त होईना कधी मन ,
त्रासून त्यांनी लावली कवळी ,चुंबनाची चव ती कळली ,
एकदा मात्र गंमत घडली ,चुंबन घेता कवळी पडली .
- Log in or register to post comments
र
राजा सोव्नी
Sun, 03/24/2013 - 13:58
नवीन
खड ,खड चुंबन
दंताडा दंताडी चे लग्न जाहले ,दिवस मजेत जावू लागले .
चुंबन घेता खड~खड होई ,ओठांचे मिलन ना होई ,
आगळे वेगळे ऐसे चुंबन ,तृप्त होईना कधी मन ,
त्रासून त्यांनी लावली कवळी ,चुंबनाची चव ती कळली ,
एकदा मात्र गंमत घडली ,चुंबन घेता कवळी पडली .
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
Tue, 03/26/2013 - 18:38
नवीन
स्वतःची व्यथा दंताजींच्या नावे कथा तर नव्हे?
- Log in or register to post comments