लेखणी !!
लेखणी !!
तिला असेल आठवण आपल्या शेवटच्या भेटीची
अंतर पडण्याआधी लिहिलेल्या जवळच्या शब्दांची
तिही विचारत असेल तुला ...
काही लिहीशील का आज माझ्यासाठी ...!!
भिजलो एकदाच पावसात ...डोळेभरून ...
परत भिजलास का रे कधी ...
भेटलो नेहमी त्याच वाटेत ...नजर टाळून ..
फिरकलास का रे तिथे पुन्हा कधी .....
राखून ठेवलेल्या शब्दांना अर्थ दिलास का रे कधी .....
तिही विचारत असेल तुला ...
काही लिहीशील का आज माझ्यासाठी ...!!
रंगलेला समुद्र मावळतीच्या सूर्याला
रोज काहीतरी विचारायचा ...
रातराणीचा सुगंध श्वासा श्वासात
नेहमीच का दरवळत राहायचा ...
अंधार फिटताना पानावरचे दव
का आजही ओले होते ....
चिरकाल टिकलेल्या त्या क्षणभंगुर आठवणींना
शब्दात बांधण्यासाठी .....
तिही विचारत असेल तुला ...
काही लिहीशील का आज माझ्यासाठी ...!!
बहाणे हजारो शोधत असशील ...
तिच्याशी नजर टाळून .....
हृदयाशी मात्र रोज ठेवत असशील...
खिशाचा शर्ट घालून ...
चुकूनच दिलेली आणि घेतलेली….. ती ....
बोलायचंय तिला वाचा नसून ...
.
कधीतरी भावना करशील का व्यक्त ......
लिहिशील का आज तिच्यासाठी तरी ...एखादा शब्द ...!!!
....फिझा !
💬 प्रतिसाद
(3)
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 03/25/2013 - 04:52
नवीन
हे खासचं!
- Log in or register to post comments
इ
इन्दुसुता
Mon, 03/25/2013 - 04:58
नवीन
आवडली कविता ! थोडी उदास करून गेली.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 03/25/2013 - 15:51
नवीन
छान
- Log in or register to post comments