Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

ग — गंगाधर मुटे, Mon, 03/25/2013 - 10:57
                        दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे

तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला
तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे

कुणालाच नव्हती खबरबात काही, कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला
तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे, स्वत:ला विसरणे वगैरे वगैरे

अनासक्त मी! हे तिला मानवेना, कसे डाव लटकेच खेळायची ती
वृथा आळ घेणे, मनस्ताप देणे, रुजूवात करणे वगैरे वगैरे

कधी द्यायची ती दुटप्पी दुजोरा, मुळी थांग पत्ता मनाचा न येई
मला पेच हा की पुढे काय होणे! मनाशी कचरणे वगैरे वगैरे

मुसळधार होती तुझी प्रेमवर्षा, किती चिंबलो ते कळालेच नाही
जणू थेंब प्रत्येक मकरंद धारा, मधाचे पखरणें वगैरे वगैरे

तुझी ठेव अस्पर्श तू रक्षिलेली, मिळाली मला; ते ठसे आज ताजे
स्मरे त्या क्षणांचे मदोन्मत्त होणे, कराग्रे विहरणे वगैरे वगैरे

"अभय" एक युक्ती तुला सांगतो मी, करावे खरे प्रेम मातीवरी या
भुई संग जगणे, भुई संग मरणे, भुई संग झरणे वगैरे वगैरे

                                                       -  गंगाधर मुटे "अभय"
--------------------------------------------------------------------------

प्रतिक्रिया द्या
21738 वाचन

💬 प्रतिसाद (54)
ब
बॅटमॅन Mon, 04/01/2013 - 09:16 नवीन
तुम्ही म्हणताय ना की नक्कल केली से, की नाकारताय?
पहिल्यांदाच मी म्हटले की नक्कल केली आहे, तर परत या प्रश्नाचे प्रयोजन काय? बाकी क्रेडिट देणे ओके आहे, पण मी माझे काव्य सर्वथैव वरिजिनल, औट ऑफ द ब्ल्यू आहे असा क्लेम तरी कुठे करतोय? लोक ते काव्य वाचून म्हणाले की पंडित कवींची मशिनरी बरी वापरलीये, त्याला मी होच म्हटले आहे. नाकारण्याचा प्रश्न येतच नै. पण मजा अशी आहे, की क्रेडिट द्यायचे तरी कुणाकुणाला? कवी म्हटला की बर्‍याच गोष्टी इतरांकडून तो उसन्या घेतच असतो. उल्लेख करायचा तरी कुणाकुणाचा. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Mon, 04/01/2013 - 09:22 नवीन
>परत या प्रश्नाचे प्रयोजन काय? >> माझा मुद्दा समजावण्यासाठी :) >>पण मी माझे काव्य सर्वथैव वरिजिनल, औट ऑफ द ब्ल्यू आहे असा क्लेम तरी कुठे करतोय? >> मी असे कुठेच म्हटलेले नाही :) किंबहुना सुचवलेले नाही, रादर आत्तापरेंत असा विचारही केला नाही. माझे तितकेच म्हणणे आहे की मग, की क्रेडिट द्या. :) जर कोणाकडून मूळ कल्पना उसनी घेत असू, तर क्रेडिट देण्याने काही कमी तर होत नाही ना? तर जिथे उल्लेख आवश्यक आहे तिथे करावा असे मला वाटते. माझेही असो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ग
गंगाधर मुटे Mon, 04/01/2013 - 05:57 नवीन
नमस्कार मित्रहो,
 आपले सर्व प्रतिसाद मी येथे संकलीत केलेले आहेत.  :) -----------------------------------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments
आ
आगाऊ म्हादया...... Mon, 04/08/2013 - 16:01 नवीन
जम्लिय!!! आवडलीय..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा