Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भगोरिया

र — राजा सोव्नी, Tue, 03/26/2013 - 16:58
अपरे नाक भृकुटी चाप लघु भाल ,गुलाबी गाल , सिह कटी ,उन्नत वक्ष , गालात खळी ,अपुरी चोळी. फाटके नेसू ,मुखी हासु , वेचते वनबाला ,मोहाच्या फुला, मोहाचा सुटेना मोह,मद्याचे साठले डोह , ढोलक्या ची थाप ,तालात पदचाप . येता सण भगोरिया ,किरात धुंडती प्रिया , जीवाचे करुनी रान ,करिती मद्यपान, प्राशुनी महुवाची दारू ,पळती बैसुनी वारू, घेऊनी आनंद उरी,पळवती तरण्या पोरी. लग्नाची सुंदर प्रथा,नसे चिंता कुणा वृथा. डौलात निघते स्वारी.भिल्लाची रीतच न्यारी.

प्रतिक्रिया द्या
2704 वाचन

💬 प्रतिसाद (6)
स
स्पंदना Wed, 03/27/2013 - 01:12 नवीन
मस्त! अगदी मस्त!
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 03/30/2013 - 16:10 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed. मध्य प्रदेशातील झाबुआ भागात आदिवासींचा हा महत्वाचा सण असून हा होळीच्या सुमारास महिनाभर साजरा केला जातो. यावेळी भिल्ल तरूण-तरुणी मेळ्यात मुक्त पणे फिरत असतात. आवडलेल्या तरुणीच्या तोंडात पान घातले, आणि तिने त्याचा स्वीकार केला, तर ते दोघे पळून जातात व एकत्र (घोटुल मधे?) रहातात... हा संदर्भ ठाउक असणार्‍यांना ही कविता खचितच आवडावी. (मी फार पूर्वी या मेळ्यात बरेच फोटो घेतले होते, ते मिळाल्यास टाकेन, वरील फोटो जालावरून घेतले आहेत).
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 03/30/2013 - 19:21 नवीन
@तर ते दोघे पळून जातात व एकत्र (घोटुल मधे?) रहातात...>>> हे शाम मानवांच्या भाषणात आंम्ही एकदा ऐकलवत.त्यामुळे वाचताना अंदाज आला.आणी पान भरवतानाच्या फोटूंमुळे पुरावाही मिळाला. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
प
पाषाणभेद Sat, 03/30/2013 - 17:41 नवीन
सुंदर काव्य
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 03/31/2013 - 10:40 नवीन
छान झालीये कविता!
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sun, 03/31/2013 - 11:39 नवीन
अशा तर्‍हेच्या लग्नाविषयी ऐकून होतो. छान कविता. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा