रंगुनी रंगात मधुर.....
रंगुनी रंगात मधुर............
दिन रंगांचा आजला
कल्लोळ भावनांचा उरी,
रुसलीस तू, खुलवींन मी
आज उधळूनी रंग तुजवरी !.
विरतिल गडद रंगांत ह्या
राग रुसव्याच्या खुणा,
उरतील मागे पुन्हा
प्रेम स्नेहाच्या पाऊलखुणा !
विविध रंग घेउन सवें
पोहोचलो द्वारी तुझ्या,
बावरली तू गोड अईसी
फुलले गुलाब गालीं तुझ्या !
ढळला पदर, आरक्त मुखचन्द्रम़ा,
स्मितबरसात इन्द्रधनुसम भासली,
रंगांची मुक्त उधळण अशी
नव्हती कधी मी ल्यायली !
मुक्त रंग तव लावण्याचे
ह्या परी कधी ना पाहिले
निस्तब्ध जाहल़ो इतुका
उधळण्याचे रंग तुजवर, हाती तैसेचि राहीले ! ! !
निरंजन वहाळेकर
💬 प्रतिसाद
(3)
श
श्रिया
Fri, 03/29/2013 - 10:30
नवीन
छान आहे.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Fri, 03/29/2013 - 11:20
नवीन
ये बात!
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Sun, 03/31/2013 - 11:45
नवीन
छान आहे.
- Log in or register to post comments