किंग फिश सिझलर
Primary tabs
साहित्य :- सुरमई माश्याचे तुकडे, वाफवलेल्या बटाट्याचा लगदा, तिखट, मीठ, मिरपूड, मोहरी पेस्ट (बाजारात मिळते ती ), टोमाटो केचअप, बटर, अद्रक लसून पेस्ट, मैदा, लीम्बुरस, केळीच पान, सिझलर प्लेट, तेल, विविध भाज्या (गाजर, फरसबी, बेबीकॉर्न, पत्ताकोबी, मशरुम्स ई.)
कृती:- प्रथम माशे भरपूर पाण्याने साफ करून त्यावर लीम्बुरस, मीठ, मिरपूड, अद्रक लसून पेस्ट, टोमाटो केचअप, मोहरी पेस्ट व थोड तेल घालून १० मिनिट मेरीनेट करायला ठेवा. इकडे बटाट्याचा लगद्यात तिखट, मीठ, मिरपूड घालून चपटे गोळे बनवून या टिक्क्या मैद्यात घोळवून तेलावर खरपूस तळून घ्या. नॉनस्टिक तव्यावर थोड्या तेलावर गाजर, फरसबी, बेबीकॉर्न, पत्ताकोबी, मशरुम्स ह्या भाज्या परतून शिजवून घ्या. नंतर मीठ व मिरपूड घाला. माश्यांचे तुकडे देखील मैद्यात घोळवून खरपूस तळून घ्या. सिझलर प्लेट खूप गरम करून ती ग्यासवर असतानाच त्यावर पत्ताकोबीचा कीस पसरवून केळीच पान ठेवा. या केळीच्या पानावर एका बाजूस टिक्क्या, दुसर्या बाजूस माश्यांचे तुकडे, तिसर्या बाजूस परतलेल्या भाज्या व वरून थोड बटर घालून गरमगरम खायला घ्या.
फोटो असंता तर अजुन छान दीसला असता !! करुन पाहाण्यात येईल !!
पुन्हा एकदा निराशा...
अजून तरी फोटो चढवायला जमल नाहीये :(
काढला असेल तर मदत करता येइल ..एखद्या संपादकाला इ मेल करा
थंडगार ............किंगफिशर बिअर ....आहा आहा आहा
जल्लं मेलं लक्षाण ते :-/
@जल्लं मेलं लक्षाण ते>>>
बालिका चिड्ली... =))
कालच जर्मनीत इस्टर साजरा झाला ,
हा अधिकृत ख्रिस्ती देश असल्यामुळे येथे ह्या दिवशी किंवा आदल्या दिवशी मासे खाण्याची ह्यांच्या धर्माची प्रथा अनेक जर्मन कुटुंब पाळतात.
आम्ही हौशेने ताज्या तळ्यातील मासा त्याच तळयाजवळील उपहारगृहात खायला गेली .
मासा युरोपियन चवीनुसार चांगला होता , आता अश्याकाही पाककृती पहिल्या
कि थंड बियर सोबत भारतात गजाली सारख्या उपह्रागृहात खाल्लेले मासे आठवतात .
व जीव बैचेन होतो.
साले आपल्या सारखा लसूण,आल्याची व इतर मसाल्यांची पेस्ट वापरत नाही उकडलेला मासा खाणे अनिवार्य ठरते.
सदर पाककृतीत मोहरीची पेस्ट हा घटक भलताच रोचक व नाविन्यपूर्ण आहे.
हाच तो मासा ,
चुकून किंगफिशर सिझलर वाचले :-०,
आणि नेमकी प्यायची किंगफिशर कि उडणारा किंगफिशर ह्याचा अर्थ लागेना :-)
मी पण चुकून किंगफिशर सिझलर वाचले...