Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भान

आ — आतिवास, Mon, 04/01/2013 - 07:36
गोधूळ लेऊन देह मनावर अक्षरांची तरली आण. आकाशाने उचलून घेता तरारले मग अवघे रान. पंचम पंचम मध्यावरती सुरेल, हळवी नाजूक तान. जपले आहे मुठीत इवल्या अव्यक्ताचे अफाट भान.

प्रतिक्रिया द्या
2192 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ऋ
ऋषिकेश Mon, 04/01/2013 - 10:13 नवीन
वा! (का कोण जाणे) भान पेक्षा 'अव्यक्त' असे नाव हवे होते असे वाटले (अर्थात नामयोजनेचा अधिकार फक्त कवियित्रीलाच हे मान्य आहेच.. हे फक्त मत)
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Mon, 04/01/2013 - 12:40 नवीन
'अव्यक्त' हेही शीर्षक चांगलं आहे. अनेकदा कवितेचं शीर्षक भुईतून आपोआप उगवून येतं (म्हणजे कवितेबरोबरच)! - पण काही वेळा ते होत नाही. कविता आधी येते आणि शीर्षक शोधावं लागतं. ही कविता या दुस-या प्रकारातली आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
य
यशोधरा Mon, 04/01/2013 - 10:24 नवीन
भारी!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 04/01/2013 - 12:46 नवीन
फार छान. :)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 04/01/2013 - 19:10 नवीन
हेच शीर्षक शोभते. कविता फारशी कळली नाही, पण अखेरचे कडवे भावले..
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Tue, 04/02/2013 - 04:41 नवीन
कविता मलाही क्वचितच कळतात - अगदी मी लिहिलेल्याही :-) कविता आवडण्याशी/ न आवडण्याशी मतलब - अशी मी स्वतःची अनेकदा समजूत घातली आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
इ
इन्दुसुता Tue, 04/02/2013 - 01:33 नवीन
"पंचम पंचम मध्यावरती सुरेल, हळवी नाजूक तान." हे आणि शेवटचे कडवे अतिशय आवडले.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 04/02/2013 - 04:44 नवीन
सुंदर अ‍ॅबस्ट्रॅक्ट अभिव्यक्ती...
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Tue, 04/02/2013 - 09:02 नवीन
ऋषिकेश, यशोधरा, लीमाउजेट, स्नेहांकिता, इन्दुसुता, मिसळलेला काव्यप्रेमी - सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा