Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<नाव सुचले नाही>

च — चाणक्य, Tue, 04/02/2013 - 10:55
काळजातल्या जखमांना, न्याय पाहिजे होता तु घाईत होतीस अन् , त्यांना वेळ पाहिजे होता तू गेलीस परंतु , हा वसंत ईथेच आहे मोग-याला तुझा जरासा, सुगंध पाहिजे होता रोजचेच आहे, हे ही धुके परंतु सुर्यास आज यायला, उजेड पाहिजे होता तू दिल्या जखमांचे, ओझे कधीच नव्हते एकदा तरी पण करायला, मी वार पाहिजे होता एकटाच येत गेलो , हरेक मैफिलीतून मी ऎकल्या स्वरांचा मला, झंकार पाहिजे होता हो म्हणून गेलीस, मी विचारल्या प्रश्नास तू आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होता

प्रतिक्रिया द्या
5655 वाचन

💬 प्रतिसाद (24)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 04/02/2013 - 11:00 नवीन
मस्तच!!
हो म्हणून गेलीस, मी विचारल्या प्रश्नास तू आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होता
हे खासचं!! 'नकार' शिर्षक कसे वाटते?
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Tue, 04/02/2013 - 11:03 नवीन
जबरदस्त झालीय!
तू दिल्या जखमांचे, ओझे कधीच नव्हते एकदा तरी पण करायला, मी वार पाहिजे होता
आणि
हो म्हणून गेलीस, मी विचारल्या प्रश्नास तू आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होता
कातिल शेर आहेत!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 04/02/2013 - 11:41 नवीन
शेवटचे कडवे आवडले !
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 04/02/2013 - 11:45 नवीन
पण जरा मीटरध्ये बसवली तर अजून छान वाटेल सहज सुचवतेय, काळजातल्या जखमांना, न्याय पाहिजे होता होतीस घाईत तू अन्, त्यांना वेळ पाहिजे होता गेलीस तू परंतु , हा वसंत ईथेच आहे मोग-याला तुझा जरासा, सुगंध पाहिजे होता रोजचेच आहे, हे ही धुके परंतु सुर्यास आज यायला, उजेड पाहिजे होता तू दिल्या जखमांचे, ओझे कधीच नव्हते पण एकदा कराया, मी वार पाहिजे होता एकटाच होतो येत, हरेक मैफिलीत मी ऎकल्या स्वरांचा मला, झंकार पाहिजे होता मी विचारल्या प्रश्नास, तू गेलीस म्हणून हो, आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होता
  • Log in or register to post comments
त
तिमा गुरुवार, 04/04/2013 - 06:18 नवीन
मीटरमधे बसवल्यावर आता छान वाटतंय! नाहीतर तो 'वार' फारच खटकत होता. सात वारांमधला वाटत होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
च
चाणक्य गुरुवार, 04/04/2013 - 07:33 नवीन
छान सुधारणा केलीस. आता खरच पहिल्यापेक्शा छान वाटतीये. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
J
jaypal Tue, 04/02/2013 - 11:53 नवीन
१+ माउ
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Tue, 04/02/2013 - 12:15 नवीन
च्यायला प्रोपोज केल्यावर हो म्हणाली आन नंतर सोडून गेली काय ?
  • Log in or register to post comments
फ
फिझा Tue, 04/02/2013 - 23:53 नवीन
खूपच छान !!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 04/03/2013 - 03:21 नवीन
सुरेख लिहिलेय.
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Wed, 04/03/2013 - 04:33 नवीन
छान. शेवटचा 'नकार' विशेष वाटला.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Wed, 04/03/2013 - 11:42 नवीन
मस्स्स्स्स्स्त
हो म्हणून गेलीस, मी विचारल्या प्रश्नास तू आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होता
हे कातिल!!!!
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Wed, 04/03/2013 - 13:00 नवीन
उत्तम
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Wed, 04/03/2013 - 19:50 नवीन
:) लवलि .....
  • Log in or register to post comments
च
चाणक्य गुरुवार, 04/04/2013 - 07:54 नवीन
सर्वांना धन्यवाद. मि.का. 'नकार' चांगल शीर्षक आहे
  • Log in or register to post comments
श
श्रिया गुरुवार, 04/04/2013 - 12:02 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
च
चिगो गुरुवार, 04/04/2013 - 12:56 नवीन
गझल आवडली.. माऊतैनी सुचवलेल्या सुधारणा आवडल्या..
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 04/06/2013 - 06:04 नवीन
मस्तच ! :)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 04/06/2013 - 10:33 नवीन
नेमका कोणता प्रश्न विचारला असेल, ज्याला नकार मिळायला हवा होता. हा विचार करणारी, --स्नेहांकिता
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Sun, 04/07/2013 - 02:59 नवीन
चाणक्यमियाँ, माशाल्लाह। :)
  • Log in or register to post comments
र
रेशा Sun, 04/07/2013 - 09:18 नवीन
मस्त मस्त
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 04/07/2013 - 15:37 नवीन
मला आधी शीर्षकामुळे विडंबन असेल असे वाटले होते. पण छान रचना निघाली!
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Sun, 08/06/2017 - 21:35 नवीन
मस्तच!! "हो म्हणून गेलीस, मी विचारल्या प्रश्नास तू आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होता"
  • Log in or register to post comments
ह
हृषीकेश पालोदकर Sat, 08/12/2017 - 22:23 नवीन
छान गुंफलय !! एकदम मस्त.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा