पाककृती

कूस-कूस -ब्रोकोली सलाड

Primary tabs

couscous salad >साहित्य-
१) कूस कूस (couscous )-१/२ कप
२) चिकन स्टॉक किंवा पाणी - १/२ कप
३) उकडलेली ब्रोकोली-१ कप
४) बारीक चिरलेले गजर- १/२ कप
५) बारीक चिरलेली काकडी- १/२ कप
६) सुकलेल्या क्रेनबेरीज (dried craneberries )-१ ते २ टेबल स्पून
७) बेसिलची पाने - ४ ते ५
८) लिंबाचा रस - २ टेबल स्पून
९) ऑलिव ओईल -२ टेबल स्पून
१०) मिरपूड-१/४ टी स्पून
११) मीठ चवीनुसार
१२) बारीक चिरलेला लसुन-१ टी स्पून
कृती -
१) एका बाउलमध्ये कूसकूस घेऊन त्यावर उकळता चिकन स्टॉक किंवा उकळते पाणी घालावे व ५ ते ६ मिनिट झाकून ठेवावे
२) एका पॅनमध्ये १ टी स्पून ऑलिव्ह ऑईल गरम करावे त्यात बारीक चिरलेला लसुन घालून परतावा व त्यात उकडलेली ब्रोकोली घालून टॉस करावी त्यावर थोडे मीठ भुरभुरावे .
३) कूसकूसला एका काटेरी चमच्याने खरडून घ्यावे . त्यात तयार ब्रोकोली, गाजर, काकडी व क्रेनबेरीज घालावेत . बेसिलची पाने चुरडून घालावीत
४) एका छोट्या बाउलमध्ये लिंबाचा रस,बाकी ऑलिव्ह ऑईल,मिरपूड व मीठ एकत्र करून हलकेसे फेटून घ्यावे . हे मिश्रण वरील कूसकूसमध्ये घालावे व हलक्या हाताने काट्यानेच एकजीव करून घ्यावे .
५) तयार कूसकूस सलाड आपल्या आवडत्या डीशसोबत सर्व्ह करावे . couscous salad
टीप-
१) वरील रेसेपिमध्ये मी चिकन स्टॉक वापरला आहे त्याएवजी व्हेज स्टॉक किंवा साधे पाणी वापरले तरी चालेल .
२) या रेसेपित ब्रोकोलीएवजी झुक्कीनी वापरू शकतात

सूड

हे कूसकूस म्हण्जे असतं तरी काय नक्की? दिसायला भगरीसारखं दिसतंय.

कूसकूस म्हण्जे एक प्रकारचा पास्ताच भगर्/वरईसारखा दिसणारा :)
कच्चीकैरी पाकृ आवडली , फोटो ही छानच आलायः)
कूसकूस आवडता प्रकार आहे :)

दिपक.कुवेत

कसला क्लास फोटो आलाय. फोटो पाहुनच भुक चाळवली. माझ्या मते हे नुसत खाल्लं तरि पोट भरत असेल नाहि?

अनन्न्या

ब्रोकोली, झुक्किनी, कूसकूस हे काही मिळत नाही इथे! पाहिलेही नाही.

अनन्न्या

आमची बाजारपेठ फार मोठी नाही. जास्त प्रमाण इथे पिकणाय्रा भाज्याचे, काही भाज्या येतात कोल्हापूरहून!!

शिल्पा ब

वर सांगितलेल्या भाज्याच घातल्या पाहीजेत असं नाही. टॉमेटो, काकडी, गोडे मटार असं घालुन सुद्धा चव छान येते. गव्हाचं कुसकुस हा हेल्दी पर्याय अन चिकन स्टॉक ऐवजी व्हेजी स्टॉक किंवा साधं पाणि सुद्धा वाईट लागत नाही कारण अगदी थोडंच वापरायचं असतं.

Mrunalini

फोटो तर एकदम मस्त.. पण हे कुसकुस खायला मन धजावतच नाहीये.... काय माहित काय प्रॉब्लेम आहे माझा ह्या कुसकुस सोबत... :D

नेहरिन

कुस कुस पुण्यात दोराबजी मधे मिळते . चविला थोडेसे भगरि सारखेच लागते . जी-याची फोडणी करुन उकडलेला बटाटा घालुनहि छान लागते.

हि रेसीपि छानच आहे. करुन बघण्यात येईल .

नेहरिन

कुस कुस पुण्यात दोराबजी मधे मिळते . चविला थोडेसे भगरि सारखेच लागते . जी-याची फोडणी करुन उकडलेला बटाटा घालुनहि छान लागते.

हि रेसीपि छानच आहे. करुन बघण्यात येईल .

प्यारे१

परवाच कुसकुस खाल्लं.
एक चमचा तोंडात घातला नि बास्स केलं.
चवीला होतं बरं पण...इकडची 'ॐ सहनाववतु' पद्धत!
एक्कीच परात में पांच लोगा ;)

सूड

एक्कीच बरतन मे खानेसे प्यार बढता हय प्यारेचिच्चा !! ;)

स्पंदना

"सहनाववतु' पद्धत!
व्वा! हा विचार कधी केलाच नव्हता.
तरीही एक उपाय सांगते, एक बाऊल मागवायचा अन त्यात घेउन खात रहायच, दाखवताना खाताना सांडु नये म्हणुन बाऊल पकडला आहे अस दाखवायच.
एकुण 'स्टील" आहे तर!

प्यारे१

नानवेज खात नाय ना म्हून. बाकी काय नाय!

शिल्पा ब

सलाड काय असतं बॉ? सॅलड माहीतीये.
असो. छान आहे.

५० फक्त

फोटो बघुन तर बुवांची रांगोळी आठवली एकदम, एकदाच खाल्लं आहे, नाही जमलं परत कधी.

कच्ची कैरी

सर्वांचे मनापासुन आभार :)
@मृणालिणी अगं एकदा खाऊन बघ तुला नक्की आवडेल अशी आशा आहे
@ शिल्पा चुकीची दुरुस्ती केली जाईल

स्मिता.

पहिला फोटो आवडला... मस्त रंगबेरंगी आहे.

स्पंदना

हो फोटो फार सुरेख आहे. अन ड्रेसिंगपण आवडल.
खुसखुस खरच कधी खाल्ल नाही. आता ट्राय करेन.

जेनी...

कुस कुस आवडत नै :(

पण फोटो नक्किच दाद देन्यासारखा आहे :)