Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संमोहरमल

अ — अज्ञातकुल, Sun, 04/07/2013 - 07:20
भोर प्रभाती चंद्रकोर कोकीळ शीळ अन मनकवडी हळुवार स्पर्श झुळुकेचा लाघव पक्षांची लाडी गोडी गूढ साद अवती भवताली क्षितिजावर लाली थोडी पर्णफुलांवर वसंत सण अंगणभर जगणारी कोडी नील सरोवर प्रतिबिंबाविण थांग न त्या खोली वेडी मेघ ढाळतो ऋतू तयातुन जीवन हसण्याची नाडी मन हृदयी स्वप्ने जरतारी कुणी तरी नकळत धाडी व्योम प्राणमय लयलाटेवर सुख दु:खे कडवी जोडी काठ किनारे शब्दांचे रसरंग क्षणांच्या कावेडी पाऊलठसे संमोहरमल मृगजळी तरंगे तन होडी .....................अज्ञात

प्रतिक्रिया द्या
2945 वाचन

💬 प्रतिसाद (17)
य
यशोधरा Mon, 04/08/2013 - 12:44 नवीन
वा, सुरेख!
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Tue, 04/09/2013 - 03:44 नवीन
कवितेतील लय आवडली. दोन शब्दांचे अर्थ मात्र समजले नाहीत, कावेडी आणि संमोहरमल. त्यामुळे कविता थोडीफार समजली असे वाटत असले तरी नीट समजाऊन घ्यायला आवडेल. कविने येथे रसग्रहण द्यावे अशी विनंती करते.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 04/09/2013 - 06:22 नवीन
अहाहा! काय वर्णावी शब्दांनी मम या काव्याची गोडी!
  • Log in or register to post comments
स
साऊ Tue, 04/09/2013 - 07:44 नवीन
वेगळे शब्द! छान आहे कविता.
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Tue, 04/09/2013 - 17:00 नवीन
इंदुसुता, आपल्या विनंतीचा आदर करून कवितेचा आशय थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो आहे. आशा आहे आपल्याला अपेक्षित आनंद आणि समाधान मिळेल . भोर प्रभाती चंद्रकोर कोकीळ शीळ अन मनकवडी हळुवार स्पर्श झुळुकेचा लाघव पक्षांची लाडी गोडी गूढ साद अवती भवताली क्षितिजावर लाली थोडी पर्णफुलांवर वसंत सण अंगणभर जगणारी कोडी कृष्ण पक्षातल्या त्रयोदशीची भली पहाट. अत्यंत नाजुक रेखीव चंद्रकोर उगवलीय. दूर कुठूनशी मनातल्या प्रसन्नतेशी सुसंगत कोकिळेची शीळ घुमते आहे. झुळुकेच्या लाघवी स्पर्शासोबत पक्षांची लगबग, चिवचिव, गुटुर घू चालू आहे.क्षितिजावर लाली उमलत चालली आहे पनाफुलांवर वसंताचा बहर सजलेला आहे कुणी अनामिक साद घालतोय असा भास होतोय. अशा अनेक कधीही न उमजलेल्या परंतू नेमाने न चुकता घडणार्‍या गोष्टी आजुबाजूला वावरताहेत. नील सरोवर प्रतिबिंबाविण थांग न त्या खोली वेडी मेघ ढाळतो ऋतू तयातुन जीवन हसण्याची नाडी मन हृदयी स्वप्ने जरतारी कुणी तरी नकळत धाडी व्योम प्राणमय लयलाटेवर सुख दु:खे कडवी जोडी वरती नील सरोवराप्रमाणे भासणारे कुठल्याही प्रतिबिंबाचा अद्याप स्पर्श न झालेले अथांग खोल आकाश आहे. त्यातूनच एखादा मेघ आपले जीवन सुखकर करणारे ऋतू साकार करत असतो. तशीच आपल्या नकळत आपल्या अंतरंगात अकल्पित स्वप्ने साकर होत असतात. ह्या प्राणमय विश्वाच्या वाटचालीत सुख दु:खाची जोडी मात्र एकमेकांच्या कडव्या साथीने अखेरपर्यंत मार्ग क्रमीत असते. काठ किनारे शब्दांचे रसरंग क्षणांच्या कावेडी पाऊलठसे संमोहरमल मृगजळी तरंगे तन होडी या सर्व घडामोडींचा घेतल्या जात असलेला अस्वाद शब्दांच्या काठावर सुखद क्षणांच्या कावेडी घेऊन स्थिरावतोय; चिरंजीव होतोय. गतकाळातील संमोहनाचे गारूडासोबत आणि आयुष्याच्या अनाकललीय मृगजळावर ही तन होडी आपोआप तरंगते आहे. ......................अज्ञात
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 04/09/2013 - 17:05 नवीन
सुंदर. फार आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अज्ञातकुल
ज
जेनी... Tue, 04/09/2013 - 21:11 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अज्ञातकुल
स
सुधीर Wed, 04/10/2013 - 10:25 नवीन
मन हृदयी स्वप्ने जरतारी कुणी तरी नकळत धाडी सुंदर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अज्ञातकुल
प
प्यारे१ Tue, 04/09/2013 - 17:46 नवीन
सुंदर कविता. अवांतरः कावेडी नसावं. 'कावड/ कावडी' असावं. एका आडव्या काठी च्या दोन टोकांना बांधलेल्या घागरी. जुन्या काळची (जनरल) पाणी वाहण्याची पद्धत.
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Tue, 04/09/2013 - 19:28 नवीन
'संमोहरमल'या शब्दाचा अर्थ शोधला - तो सापडला नाही. संमोह (bewilderment,infatuation, stupefaction... )आणि रमल (mode of fortune telling by means of dice )असे अर्थ या संस्थळावर शोध घेता आढळले. गतकाळातील संमोहनाचे गारूड असा तुम्ही प्रतिसादात त्या शब्दाचा दिलेला अर्थ नीटसा कळला नाही. म्हणजे 'गतकाळातील संमोहनाचे गारुड' हे कळते आहे पण संमोहरमल कळत नाही :-(
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 04/09/2013 - 20:03 नवीन
आहा!!!!!!!!! बोरकरांची आठवण करून देणारी कविता एकदम. पक्व रसदार गोड फळे लगडलेल्या झाडांची आठवण होते अशी कविता वाचली की. फार आवडली :)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 04/09/2013 - 22:24 नवीन
फारच सुंदर मनमोहक!
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Fri, 04/12/2013 - 16:42 नवीन
कवितेचा आशय देण्याबद्दल धन्यवाद. कविता अतिशय आवडली, मोठयाने वाचून बघितली, कर्ण मधूर वाटली.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sat, 04/13/2013 - 20:38 नवीन
आहा!!
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Sun, 04/14/2013 - 10:45 नवीन
व्वा! खूप आवडली! संमोहरमल शब्द आवडूनच गेला! ब्याटम्यानशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 04/18/2013 - 13:18 नवीन
रचना... आशय समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ गुरुवार, 04/18/2013 - 13:32 नवीन
आवडली शब्द सुरेख
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा