मँगो - गुलाबजाम चीज केक
Primary tabs

साहित्यः
१. तयार गुलाबजाम - १० (३ बाजुला वगळावे)
२. चक्का - १ कप
३. २०० ग्राम क्रीम चीज (मिळालं तर उत्तम नाहितर पर्याय म्हणुन आपलं पनीर आहेच :D)
४. मॅंगो पल्प - १ कप (ताजा आमरस वापरण्याआधी मिक्सर मधे एकदा फिरवुन घेणे जेणेकरुन गुठळ्या राहणार नाहित)
५. १.५ वाटी मारी किंवा कुठल्याही डायजेस्टीव्ह बिस्किटांचा चुरा
६. २-३ टेस्पून कडेंन्स्ड मिल्क
७. साखर, मध, कडेंन्स्ड मिल्क किंवा गुलाबजामचाच पाक (रसाच्या गोडीप्रमाणे कमी-जास्त)
८. १ टेस्पून जिलेटीन पावडर (प्लेन किंवा मॅंगो फ्लेवर असलेली)
९. पिस्ता पूड - २ चमचे किंवा आपल्या आवडिचे ड्राय फ्रुट्स
१०. वितळवलेलं बटर - पाव वाटि
पाकृ:
१. दहि रात्रभर टांगुन त्याचा चक्का तयार करावा
२. मारी किंवा डायजेस्टीव्ह बिस्किटांच्या चुर्यात वितळवलेलं बटर/गुलाबजामचाच पाक घालुन नीट एकजीव करावे
३. जर स्प्रींगफोर्मचा केक टीन असेल तर त्यात ह्या चुर्याचा बेस दाबून तयार करावा. नसेल तर कुठल्याही बाऊल/भांडयात चमच्या च्या मदतीने बेस दाबून तयार करावा. तयार टीन / बाउल फ्रिजमध्ये १५ मिनिटे सेट होण्यासाठी ठेवावे
४. आता मिक्सींग बाऊलमध्ये क्रीमचीज, उरलेले ७ गुलाबजाम (हलकेच कुस्करुन), आंब्याचा रस, चक्का व साखर/मध, कडेंन्स्ड मिल्क किंवा गुलाबजामचा पाक घालून बीटरने फेटून घ्यावे किंवा डावेने एकजीव करावे
५. ३ टेस्पून पाणी मायक्रोव्हेवमध्ये १०-१५ सेकंद गरम करून घ्यावे व त्यात १ टेस्पून मँगो जिलेटीन पावडर घालून ती पूर्ण विरघळू द्यावी. आता हे जिलेटीन मिश्रित पाणी वरिल मिश्रणात घालून बीटरने बीट करुन घ्यावे व तयार टीन पुन्हा फ्रिजमध्ये १५ मिनिटे सेट होण्यासाठी ठेवावे
७. वगळलेले ३ गुलाबजाम मधुन अर्धे करावे
८. एक तासा-दिड तासाने सेट झालेल्या मिश्रणावर थोडया थोडया अंतरावर अर्धे गुलाबजाम गोलाकार लावावे व ६-७ तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवावे. आवडत असल्यास आपण पुर्ण रिंगण अर्ध्या गुलाबजामने सजवु शकता. हवं असल्यास हार्ट शेपच्या स्टेन्सीलने मधोमध पिस्ता किंवा कोको पावडरचं ह्र्दय काढावं
९. केक पुर्ण सेट झाला कि स्प्रींगफोर्म केकटीनच्या कडेने हलकेच सुरी फिरवून त्याचे रिंगण काढावे
१०. प्रत्येक भागावर अर्धा गुलाबजाम येईल ह्या हिशोबात केक कापावा/तुकडे करावे
११. सर्व्ह करण्याआधी त्यावर:
अ. १ ते १.५ चमचा थंडगार आंब्याचा रस अर्ध्या गुलाबजामवरुन हलकेच सोडावा व एक चिमुटभर पिस्ता पुड भुरभुरावी किंवा
ब. आंब्याचे तुकडे, काजु-बदाम-पिस्त्याच्या कापांनी सर्व्ह करावे किंवा
क. मिश्र फळांचे तुकडे ठेवुन त्यावर एक चमचा मध हलकेच सोडावा किंवा
ड.चेरि फळाचे दोन अर्धे भाग करुन घ्यावेत. प्रत्येक अर्धा भाग हा अर्ध्या गुलाबजामवर ठेवावा व वरुन चिमुटभर पिस्ता पुड भुरभुरावी......पर्याय बरेच आहेत आपल्याला आवडेल/रुचेल तो करावा
लगेच खावासा वाटतो आहे.
अहाहा! निव्वळ अप्रतिम!!
मँगो ,गुलाबजाम आणि चीज तीन्हि आवडिचे पदार्थ :D केक १००% भन्नाट लागणार!
खाण्यावर जो काही ताबा आणलाय तो सोडायला भाग पाडणार राव तुम्ही अशा रेशिप्या टाकून. बाकी ते जिलेटिन कम्पल्सरी आहे का ?
संयम सूड संयम :)
कारण त्यामुळे केक बाईन्ड/घट्ट व्हायला मदत होते.
जिलेटिन इथे कुठे मिळेल? कुणी सांगू शकेल काय?
ते जिलेटीन वगैरे समुद्र मार्गे मागवता येत म्हणे.... जास्त वपरू नका हो, जीव जायचा एखाद्याचा... ;)
>>जास्त वपरू नका हो, जीव जायचा एखाद्याचा...
ज्याचा जीव घ्यायचा असेल अशाच माणसाला खायला घालावं, नंतर देवाक काळजी. ;)
मँगो चीजकेक असाच आवडीचा त्यात गुलाबजाम म्हणजे जबराट
पाकृ एकदम सिनफुल्ल :)
@ सुड कुठल्याही सुपर मार्केटमध्ये मिळतं
जिलेटीन नाही मिळाले तर व्हेजी जेल मिळतं का बघा शाकाहरी लोकांसाठी चांगला पर्याय आहे व्हेजी-जेल.
इथं पुण्यातल्या सुपर मार्केटात शोधायला हवं या वीकांतास !!
नै मिळाले तर तुझ्या चुलतबहिणीला ऑस्ट्रेलियातून पाठवायला सांग!
होय होय, सुड माझ्यासाठी पण ३ मिटर मागव लाल कलरचं, एक शर्ट शिवावा म्हंतो जिलेटिनचा.
=)) =))
कित्ती दिवसांनी मोकळं मोकळ हसले बै =))
५० फक्त तुम्ही म्हण्जे अगदी ' हे ' आहात बगा =))
ब्रम्हास्त्र असं सारखं सारखं वापरलं तर त्याचं महत्त्व काय उरणार पैकाकू ;) त्यामुळे गप्प बसायचे ठरविले आहे.
गुलाबजाम,मॅंगो आणि चीज. सही कॉम्बीनेशन.
दिसायलाच इतका छान आहे चवीला असणारच. :)
सांभाळुन दिपकराव.
अशी पाककृती देताना आधी एखादा डिस्क्लेमर टाकत जा राव, एखादा डायबेटीस पेशंट नुसता फोटो पाहुनच गचकेल.
:)
गोडखाऊ नसलो तरी पाककृती जीवघेणी आहे खरी. :)
खल्ल्ल्लास.........................
काय जबरा प्रेझेन्टेशन आहे राव.
लाजवाब !!!
अप्रतिम!!!
तोंपासु
जबरी केक आहे..
क ह र !!!
:) :)
खुप सुंदर.. मस्त दिसतोय केक अगदी... टेम्पटिंग :D
ज ब रा ट!!
जीव गेला...हाल हाल झाले...ठ्ठार जाहलो
आए...हाय... एखाद्या सुंदर ललनेच्या पहाता क्षणिच प्रेमात पडावं,तसं होतय फोटु कडे पाहुन... :)
काय वाइट्ट माणूस आहे हा........ इतके सुंदर आणि चविष्ट पदार्थ करतो तरी कधी?????????????
अप्रतिम, लाजवाब :)
नको...नको... दीपकराव काय छळ मांडलाय...
इथे त्याजायला आंबे आणि गुलाबजाम दोन्ही मिळत नाही :(
मस्त पाककृती. आवडली.
जिलेटिन जनावरांच्या, विशेषतः डुकराच्या हाडांपासून आणि कातडीपासून तयार करतात असे वाचून आहे. तेंव्हा शाकाहारी मंडळींनी जरा सांभाळून...
तुमची माहिती अगदि बरोबर आहे. हल्ली शाकाहारी जिलेटिन 'कॅरेगनीयन' (उच्चार चुकला असेल तर माफि असावी) मिळतं किंवा माझ्या मते जिलेटिनला पर्याय म्हनून 'अगार-अगार' पण वापरु शकतो
त्याचे घटक पाहता चव पण भारी असेल असे वाटते!
अरे ह्या काकांना पाककृत्या आणि फोटो टाकण्यापासून बॅन करा रे!
काय बोलणार??? बादलीभर लाळ जमा झाली आहे तोंडात...
दीपु काका डाएटिंग वर असणार्यानी ह्यात काय काय नाय टाकायच ???
काकु ची किती मज्जाय .... :-/
डाएटिंग वर असणार्यानी हे नुस्त पहायचं आणि खाल्ल्याचं समाधान मानायच....हाय काय नाय काय :D
:-/ :-/
आईग्ग! भारी!
शारिरीक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक छळ .
अतिब्येक्कार(जडगाव-मलकापूरवाल्यांना माहिती आहे शब्द) पाकृ.
- असंयमित प्यारे ;)
तोंपासु............
लैच गोड
भारी प्रकार दिसतो... :)
(केक प्रेमी) :)
ओ दिपकशेठ,
माझ्यासाठी कुवेतमध्ये एखादी नोकरी असेल तर सांगा ना! लग्गेच येतो. :D
तेव्हढीच अंमळ तब्येत सुधारावी म्हणतो.
ए आपट्या...चल रे, येतो का कुवेतला? दिपकशेठकडंच राहू..सा म्हैन्यात फुल्ल बॉड्डी शॉड्डी बनून जाईल. :D
देवा! हा धम्या बॉडी शॉडी बनवायला स्पाला घेउन चाललाय.
ये! फोटु बघितला नाहिस काय चेपुवर? आता काय गरज नाही स्पाला.
=))
=))
चला अमी एका पायावर रेड्डी हौत
@ए आपट्या...चल रे, येतो का कुवेतला? दिपकशेठकडंच राहू..सा म्हैन्यात फुल्ल बॉड्डी शॉड्डी बनून जाईल. >>> धमुशेट,अहो त्यांना गरज नाही,हल्ली ते दुधाचे पदार्थ/तुपातल्या मिठाया भरपुर भक्षण करताहेत.अशी डोंबिवलीच्या बाजुनी खबर आलिये. =))
दिपक राव जरा जपुन मान्स गारद बिरद तर होणार नाहीत ना हे बघुन फोटो टाकत जावा!
च्या मारी हे भारीय! बाकिच्यांना फोटो टाका टाका म्हणाव लागतय तर इथे नको नको म्हणाव लागतय.
फोटू पाहूनच तंद्री लागली
लय भारी
खुप गोड होइल ना हा केक?
की कमी गोड ठेवायचा?
एकुण फार छान दिसतो आहे.
@ धमाल मुला: अरे तु कशाला मीच येतो तिकडे. तुझ्याबरोबर अजुन बरेच जणांच्या तब्येती सुधारु :D
@ साऊ: एवढा गोड नाहि होत. गोडपणा थोडा थोडा करुन वाढव म्हणजे अंदाज येईल आणि अती गोड नाहि होणार
मँगो चीझकेक आणि गुलाबजमुन खतरा कॉम्बिनेशन !!!
अरे कसले भारी पदार्थ करतोस रे...... !!
कातिल दिसतोय केक :)
नक्की करुन बघणार.
तुमच्या एक से बढकर एक रेसिपी बघून प्रतिक्रीया देण्यासाठी शब्दच सुचत नाही.
ह्याला पाककृती म्हणता येत नाहीये...
'अनन्वित अत्याचार' असे म्हणावे लागते आहे...
हाय कॅलरी.. :(
मस्स्स्स्त ;)