Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कधी वाटतं..

व — विसोबा खेचर, Wed, 04/10/2013 - 15:37
कधी वाटतं.. नाशिकला तात्यासाहेब शिरवाडकरांच्या घरी भरणा-या सामान्य लोकांच्या दरबारात सामिल व्हावं.. तर कधी वाटतं... भाई आणि सुनिताबाईंच्या सोबत एखादी संध्याकाळ घालवावी...त्यांच्याकडून कविता ऐकाव्या.. कधी वाटतं.. बाबूजींच्या पायाशी बसून 'झाला महार पंढरीनाथ..' किंवा 'निजरुप दाखवा हो..' असं काहितरी शिकावं.. तर कधी वाटतं.. थेट उठून पेडररोडला दीदीच्या घरी जावं.. आणि तिच्या पायांना मिठी मारावी.. कधी वाटतं... हळूच, पावलांचा आवाज न करता कलाश्री बंगल्यात शिरावं... आतून भन्नाट जुळलेल्या निषादाच्या तानपु-यांच्यात अण्णांनी सुरू केलेला पुरिया कानी पडावा.. वाटलंच तर हळूच हिंमत करून आत जाऊन चुपचाप ऐकत बसावं.. नाहीच जर हिंमत झाली.. तर कलाश्रीच्या अंगणातली थोडी माती कपाळावर अबीरबुक्क्यासारखी लावावी आणि माघारी फिरावं...! -- तात्या.

प्रतिक्रिया द्या
7189 वाचन

💬 प्रतिसाद (14)
त
तर्री Wed, 04/10/2013 - 15:51 नवीन
रायगडावर जावेसे नाही का वाटत ?
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 04/10/2013 - 16:00 नवीन
हि तुमची रचना फेसबुकावर वाचली होती.. एका वाचनातच आवडून गेली. मस्त.
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 04/10/2013 - 16:23 नवीन
हे आवडलं आणि कलाश्रीची आठवण झाली .धन धन भाग सुहाग तेरो ...
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 04/10/2013 - 16:29 नवीन
तुमची आणि तुमच्या लेखांची फार आठवण येते. असे येत जा हो परत. गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि सर्व मिपावासीयांना शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
स
सुधीर गुरुवार, 04/11/2013 - 14:06 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
च
चावटमेला Wed, 04/10/2013 - 16:34 नवीन
आधी वाचली असू दे वा नसू दे तात्या, तुमचा लेख इतक्या दिवसांनी मिपा वर पाहूनच आम्हाला आनंद झाला :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/10/2013 - 20:10 नवीन
क्या बात है....
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 04/11/2013 - 10:48 नवीन
हे असं वाटणं अशा शब्दात न पकडलं तर असंच विसरून गेलं असतं..!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 04/11/2013 - 13:13 नवीन
व्वा तात्या!
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 04/11/2013 - 13:47 नवीन
तात्या आज पाडवा आहे दसरा नव्हे....सीमोल्लंघनाचा हा दिवस कसा काय निवडला राव ? की तुम्हालाही आता कुमारांसारखी बंडखोरी करावीशी वाटतेय ? बाकी तुमच्या सर्व पंक्तीना दुजोरा देत खाली काही भर टाकत आहे पहा माझ्यात आपल्याला समानधर्मा दिसतोय का ? कधी वाटतं ठाण्यातील राणी नाखवाच्या घरी जावं जिथे आता फक्त भितीवर ओ पी नय्यर यांचा फोटो असेल तेच आहेत असो समजून आपल्या प्रेमाची कबुली द्यावी बहुत शुक्रिया बडी मेहरबानी ....मेरी जिंदगीमे हुजूर आप आये मग असंच देवास गाठावं कुमारांचा कुटीत एका कोपर्‍यात बसावं शांत एकचित्त होऊन ऐकावं राजन अब तो आजाओ थिर न रहत कजरा आंखनमे नाहीतर उड जायेगा हंस अकेला जग दो क्षणका मेला ....... न्रिर्गुणी भन ऐकतच पंचत्वात विलीन व्हावं !!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 04/25/2013 - 09:39 नवीन
कधी वाटतं ठाण्यातील राणी नाखवाच्या घरी जावं जिथे आता फक्त भितीवर ओ पी नय्यर यांचा फोटो असेल तेच आहेत असो समजून आपल्या प्रेमाची कबुली द्यावी बहुत शुक्रिया बडी मेहरबानी ....मेरी जिंदगीमे हुजूर आप आये मस्त.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
व
वेल्लाभट Tue, 04/23/2013 - 18:20 नवीन
सुरेख !
  • Log in or register to post comments
म
मी_आहे_ना गुरुवार, 04/25/2013 - 10:07 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 04/26/2013 - 10:00 नवीन
सर्व प्रतिसादी रसिकवरांचा मी मनापासून आभारी आहे..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा