पाककृती

डा़ळ वडे

Primary tabs

वडा नावाचा मासा आहे पण डाळ नावाचा नाही तसेच डाळ घालून माशाचे प्रकार केले जात नाहीत त्यामुळे हा माशाचा प्रकार असेल असा गैरसमज करुन घेऊ नका. :हाहा:
माझ्या वहिनीकडे एक समारंभ होता तेंव्हा मी हे डाळवडे केले होते म्हणून फोटोतील प्रमाण जास्तीचे आहे. पण सोयीसाठी मी पावकिलोचे प्रमाण लिहीले आहे.

साहित्यः
चणा डाळ पाव किलो
२ मिडियम कांदे चिरुन
२ ते ३ मिरच्या चिरुन
मुठभर कोथिंबीर चिरून
१ चमचा धणेपुड (असल्यास)
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
चविनुसार मिठ
तळण्यासाठी तेल

पाककृती :
चणा डाळ ५ ते ६ तास भिजत ठेवा.

५-६ तासांनंतर ती स्वच्छ धुवुन मिक्सरमधुन थोडेसेच पाणी घालून जाडसर लगदा होईल अशी थोडी चरट वाटून घ्या. (बापरे किती शब्द टाकले? : हाहा: गोंधळ उडाला नाही ना?)

वाटलेल्या पिठात चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, हिंग, हळद, धणेपुड, मिठ घालून एकत्र करा.

आता लिंबाएवढा ह्या मिश्रणाचा गोळा घेउन त्याचे चपटे वडे करुन तेलावर मिडीयम गॅसवर शॅलोफ्राय करावेत. ६-७ मिनिटे एक बाजू शिजायला लागते.
हे आहेत तयार डाळवडे.

अधिक टिपा:
घरात लहान मुले असतील तर मिरची सरळ डाळीसोबत वाटून घ्या म्हणजे खाताना मिरची तोंडात येणार नाही.

आल-लसुण पेस्ट तसेच गरम किंवा गोडा मसालाही घालू शकता.
हा वडा चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. वरुन गरम गरम चहा तर मस्तच.

अभ्या..

ब्येस्ट. हे वडे आमच्या हितं पूर्व भागात (तेलुगु भाषिक) भजी न वडापावपेक्षा जास्त खपतेत :)
मस्त टेस्ट असते. धन्यवाद
(तुम्ही त्या फिशवाल्या जागुतै ना? लै दिवसानी आलात. :) )

Mrunalini

वाव... माझे फेवरेट.. आमच्या सासुबाई हे वडे एकदम मस्त करतात... भारतात गेल्यावर ही पन एक ठरलेली फर्माईश असते. ;)
आठवण करुन दिलीह... आता करायलाच लागेल. :)

ह्याच मिश्रणात माझी आई थोडे आले व कढीपत्ता घालून वडेऐवजी भजी करते
माझी सगळ्यात आवडती भजी माझ्या वाढदिवसाला शेवायांच्या खीरीसोबत ही भजी असायचीच , अजूनही भारतवारीत हा बेत असतोचं :)

रेवती

माझे आवडते पण कधीतरी केले जाणारे वडे!छान फोटू जागु.

आले,कढीलिंबाची पाने आणि किंचित खायचा सोडा.

मधल्या वेळेस किंवा उशीरा संध्याकाळी चहा बरोबर टॉप जोडी जमते.

स्पंदना

वेल्कम बॅक!
मलापण माश्याचाच प्रकार वाटला हो जागुताई!
मस्त फोटोज, अन फारच छान पाकृ.
माझ्याकडे पुरणपोळीच्या स्वयंपाकातली वाटलेली डाळ शिल्लक आहे तिचे होतील का वडे?

दिपक.कुवेत

मस्तच. मलाहि खुप आवडतात डाळ-वडे. पण आपण बाहेर खातो तेव्हा ते कडक का लागतात? कदाचीत तेलात जास्त वेळ तळल्यामुळे?

सूड

एका सौदिंडियन मैत्रिणीच्या घरी गणपतीत गेलं की जेवणाच्या पानात हा पदार्थ हमखास असतो. अतिशय चविष्ट पदार्थ !!

जागु

सगळ्यांना धन्यवाद.
अपर्णा अग पण त्यात गुळ घातलेला असेल ना? ,मग गोड लागतील. करंज्या करुन टाक त्याच्या.

दिपक गरम खायचे आणि ओल्या चटणी बरोबर खायचे.

पैसा

डाळवडे उडप्यांचे खाल्लेत, त्यामुळे फार आवडत नाहीत. पण फोटो लै भारी!

अनन्न्या

मी हेच साहित्य, फक्त मुगाची डाळ वापरून करते हे वडे!!

चिंतामणी

ह.डाळीच्या वड्यापेक्षा जास्त कुरकुरीत होतात.

प्यारे१

मस्त!

शुचि

मस्त!!!! ठाण्याला खल्ला होता. एक लहानशी खिडकी होती त्यातून विकत होते. ठाण्याचा फेमस वडा म्हणून ऐकले होते तेव्हा तरी.

इशा१२३

खुप दिवसात केले नाहीयेत.आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.मस्तच..

काकाकाकू

बशी उचलावी नी हाण सावळ्या! काकू कधी मनावर घेतात बघुया...