Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

असही तसही....

न — निश, Wed, 04/17/2013 - 13:57
सकाळी दाढी करता करता टिव्ही चालु केला बातम्या होत्या लागल्या भीषण दुष्काळाच्या फार फार वाईट वाटल ते बघुन बेसिनचा नळ मात्र माझा ओकत होता पाणी बदाबदा भरभरुन. दुपारी जेवताना परत टिव्ही लावला बातमी होती लागली अन्न पाण्यावाचुन मरणार्‍या जनावरांची. मी परत ऐकदा ह्ळहळलो ते बघुन अन मी उठलो ताटात जास्त झालेल अन्न टाकायला कचर्‍याच्या डब्ब्यात. रस्त्यातुन जाताना मोबाईल वर फेसबुक पहात होतो. मित्राने कुपोषित मुलाचा फोटो पाठवला होता लाईक करायला. मनात परत ऐकदा दुखावलो, मित्राला मनातल्या मनात शिव्या दिल्या. फोटो कसला पाठवतो लाईक करायला , त्यापेक्षा त्या मुलाना मदत द्यायला हवी त्यानें. मी मात्र हाकलल त्यावेळी रस्त्यावर माझ्याजवळ, काहितरी खायला द्या म्हणुन भिक मागणार्‍या त्या लहान मुलाला. खरच माझ्यातला माणुस असा आहे का की खरच जगण झाल आहे माणुसकीविहीन दुसर्‍याला मदत करायची सोडुन आपण आहोत आपल्याच सुखात तल्लीन. दुसर्‍याला मदत करायची सोडुन आपण आहोत आपल्याच सुखात तल्लीन.

प्रतिक्रिया द्या
999 वाचन

💬 प्रतिसाद (3)
म
मुक्त विहारि Wed, 04/17/2013 - 15:48 नवीन
छान लिहिले आहे आवडले..
  • Log in or register to post comments
प
पक पक पक गुरुवार, 04/18/2013 - 06:47 नवीन
निश, एक 'अन्पेक्शित' धक्का दिलास..मस्त आवड्ल.. :)
  • Log in or register to post comments
न
निश Fri, 04/19/2013 - 10:43 नवीन
मुक्त विहारि साहेब व पक पक पक साहेब, तुमचे मनापासुन आभार
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा