Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

॥ आरती दुष्कळाची ॥

B — Bhagwanta Wayal, Sun, 04/21/2013 - 06:09
जय देव जय देव जय दुष्काळदादा,हो श्रीदुष्काळदादा । आमच्या गावाला येऊनको यंदा जय देव जय देव ॥धृ॥ मागील वर्षी अतिवृष्टी झाली । उभी पिके सर्व वाहूनिया गेली । चालु वर्षाला पाऊस गेला । सर्व पिकांचा सत्यानास झाला । मिळेना गारिबांना कुठे कामधंदा...॥१॥ ऊन्हाळ्यात मिळेना प्यायला पाणी । मुले बाळे कशी फिरती रानोरानी । पोटाला मिळेना पोटभर अन्न । अशा वेळी वाटते नको हे जीणं । डगमगतो तेंव्हा पुरुष ही खंदा...॥२॥ मंत्री महोदय येऊनिया जाती । मोठमोठाल्या सभा भरविती । हे करू ते करू अश्वासने देती । घरी गेल्यावर विसरुन जाती । भोळ्या जनतेचा घेतात फायदा...॥३॥ रोजगार हामीची कामे ही येती । ऊन्हा तान्हात कामे करताती । मर मर राबतात दिवस भर । पगार कधीना मिळे वेळेवर । खाण्या पिण्याचा होतोय वांद...॥४।

प्रतिक्रिया द्या
666 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा