कलादालन

वेलीचा स्कार्फ आणि बटवा

Primary tabs

हे नाजुक आणि सुरेख डिझाईन मला मिळालं पिंटरेस्ट.कॉम वर. अनायसे हिरवा दोरा होताच.......लगेच करायला घेतला. दोरा बारीक असल्यामुळे थोडा वेळ लागला. पण झाल्यावर खूप समाधान सुद्धा मिळालं :)

scarf

आणि हा बटवा

Scarf2

कवितानागेश

हे शेडेड दोरे वापरले की मस्तच होतात वस्तू. सुंदर दिसतायत दोन्ही. :)

रेवती

काय गोड दिसतायत वस्तू! रंग अगदी सुरेख.

पैसा

दोन्ही वस्तू अप्रतिम झाल्यात!

दादा कोंडके

हाउ स्वीट! कित्ती गोड आहे बटवा. मी पण करायचं ठरवलं होतं पण हल्ली न वेळच मिळत नाही माला. खूप कामं असतात. पण हे गं काय? टाके कसे घालायचे ते सांगितलंच नाहीस. मागच्या वेळी दोन उलटे, साडेतीन सुलटे, दिड सरळ रेशेत घालायचे होते पण चुकून साडेतीन ऐवजी पावणेचार टाके घातले आणि झबल्या ऐवजी टोपडं झालं होतं.

-(अबोला) दादा

(ता.क. वरील प्रतिसाद ह घेणे.)

गणपा

महिलाविभागाच्या मुद्दयाला सिद्ध केल्याबद्दल आपले आभार.
ह्या आणि असल्याच प्रतिसादांना टाळण्यासाठी अबोली विभाग हवाय.

अवांतर : वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जयवी तै.

प्यारे१

अवांतरः जयवीतैंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नि दादांना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

दादा कोंडके

अपेक्षीत प्रतिसाद. एव्हडं बोलून या प्रतिसादावरून रजा घेतो. :))

प्यारे१

एकदम चिकण्या दिसताहेत वस्तू. रंगसंगती मस्त.

इन्दुसुता

दोन्ही आवडल्या. स्कार्फ जास्त आवडला...
जयवी पॅटर्न कुठाय ? ( स्कार्फ चा हवा )

अवांतर : अस्सं रे काय गणपा... दादांना करायच्या असतिल रे क्रोशाच्या गोष्टी .. पण म्हणून असं घालून पाडून बोलू नये हो ( कुण्णी कुण्णी समजून घेत नाही मेलं त्यांना )... :D :D

अक्षया

जयवीतै वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! :)

दिपक.कुवेत

दोन्हि गोष्टि रंगसंगतीमुळे सुरेख दिसतायेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रत्यक्ष फोन करतोच....

जयवी

तहे दिल से शुक्रिया यारो....... :)
कौतुकाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल !!
इन्दुसुता..... स्कार्फचा पॅटर्न तुला इमेल करते.

सुंदर आहेत दोन्हीही विणकामे. स्कार्फला मराठीत काय म्हणावे बुवा?

पुढल्या वेळी शक्य असल्यास विणकाम सुरू असतानाचे टप्प्या टप्प्या फोटो टाकू शकाल का?

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

शुचि

खतरनाक क्यूटी पाय झाल्यात दोन्ही चीजा.

जयवी

श्रीरंग...चालेल पुढल्या वेळी टाकेन सगळे फोटो.....मला वाटलं की सगळ्यांना बघायला कंटाळा येईल म्हणून नव्हते टाकले.
ऋषिकेश.... दुवा.......त्यापेक्षा हा पॅटर्न पाठवू का ?

अनन्न्या

वेळ नाहीये ग सध्या, नुसतं बघत राहणं जमत नाही आणि करता नाही आलं की राग येतो स्वतःचा!
मस्त झाल्यात दोन्ही वस्तू!