Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फिर्याद

च — चाणक्य, Mon, 04/22/2013 - 12:15
ही पुन्हा हवा आज, धुंदकुंद झाली ही पुन्हा मला आज, तुझी याद आली घनांचे पुरेपूर बरसून झाले आता कोण आसवांना, अवेळी साद घाली तु दिलास ना दगा, वाटते जगाला तुला ठाव स्वप्ने, कुणाची बरबाद झाली मी न कधी घेतले, नाव तुझे कोणापुढे दोन शब्द लिहिले, हाय ती फिर्याद झाली लपविले सदा मी, पाय भेगाळले माझे वाटले जगास माझी, चाल सुखात झाली ईतक्यात त्यांना माझे, एवढे रडू आले आता कुठे सांगण्यास, माझी सुरुवात झाली

प्रतिक्रिया द्या
3174 वाचन

💬 प्रतिसाद (14)
स
सस्नेह Mon, 04/22/2013 - 13:06 नवीन
गझल (आहे असे वाटते ) आवडली.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Mon, 04/22/2013 - 18:04 नवीन
गझलच आहे, फक्त गैर्-मुरद्दफ (म्हणजे ज्यात 'रदीफ' नसतो ती) आहे
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 04/22/2013 - 19:04 नवीन
छान लिहिलय. पण गैर्-मुरद्दफ (म्हणजे ज्यात 'रदीफ' नसतो ती) > म्हणजे काय जरा सविस्तर लिहाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
च
चाणक्य Tue, 04/23/2013 - 08:36 नवीन
गझलेतल्या यमकाच्या शब्दांनंतर येणा-या शब्दाला / शब्दगटाला रदीफ म्हणतात. रदीफ गझलेच्या पहिल्या शेराच्या दोन्ही ओळींत येतो, मात्र पुढच्या शेरांच्या फक्त दुस-याच ओळीत यतो. उदाहरण म्हणून 'चुपके चुपके'ही प्रसिद्ध गझल घेऊ. या गझलेचा पहिला शेर आहे - 'चुपके चुपके रातदिन आसूं बहाना याद हैं हमको अबतक आशिकी का वह जमाना याद हैं' यात बहाना आणि जमाना या यमकाच्या शब्दांनंतर 'याद हैं' हे रदाफी (रदीफ चे अनेकवचन) आले आहेत. आता याच गझलेतले पुढचे शेर पाहू - दोपहर की धूप में मेरे बुलाने के लिये वो तेरा कोठे पे नंगे पाँव आना याद हैं खींच लेना वो मेरा परदे का कोना दफ्फतन ऒर दुपट्टे से तेरा वो मुँह छुपाना याद हैं आता या वरच्या दोन्ही शेरात आना आणि छुपाना या यमकाच्या शब्दांनंतर 'याद हैं' हे रदाफी येतात. माझ्या गझलेत आली, झाली, घाली हे यमकाचे शब्द आलेत पण त्यानंतर कुठलाही रदीफ नाहीये. म्हणून ही गझल गैर-मुरद्दफ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
स
सुधीर Tue, 04/23/2013 - 09:12 नवीन
गझल आणि हा प्रतिसादही आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
क
कवितानागेश Tue, 04/23/2013 - 09:50 नवीन
छान माहिती दिली आहेत. :) तुमच्या गजल्सबरोबर अजून इतर रसग्रहणे पण येउ देत. वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर
न
नीलकांत Mon, 04/22/2013 - 19:06 नवीन
छान लिहीले आहे. :)
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 04/23/2013 - 09:56 नवीन
ज्जे बात!!
तु दिलास ना दगा, वाटते जगाला तुला ठाव स्वप्ने, कुणाची बरबाद झाली
जियो!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/25/2013 - 04:19 नवीन
फक्त सलाम सलाम सलाम!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 04/25/2013 - 05:02 नवीन
तू साल्या रडवणार आहेस एखाददिवस मला. हे असलं लिहिताच कसं येतं राव तुम्हाला? तू एक अन तो आमचा आंद्या एक. कमीतकमी शब्दात काळीज कसं पिळवटायचं ते शिकावं तुमच्याकडून. :(
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता गुरुवार, 04/25/2013 - 05:50 नवीन
गझल आवडली. आपण दिलेली माहितीही आवडली. वर माऊ ने म्हटले आहे तसेच म्हणते, रसग्रहण आणि माहिती वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 04/25/2013 - 06:19 नवीन
छान आहे. पण मला स्वतःला मराठी काव्यात हिंदी/उर्दू शब्द घुसडलेले रुचत नाहीत.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 04/25/2013 - 06:22 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 04/25/2013 - 08:01 नवीन
दवणीय गझल!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा