Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शोध

य — यशोधरा, Wed, 04/24/2013 - 08:07
इतकं कशाला झाकोळायला हवं माझ्या नसण्याने? मला शोध ना.. इथं, तिथं, फुललेल्या रानफुलात, कोमेजल्या निर्माल्यात. दवानं भिजलेल्या रानात, अंगार ओकणार्‍या वाळवंटात. पक्ष्यांच्या स्वैर गाण्यात, कुठल्याश्या चिरंतन वेदनेतही. निळ्या मुक्त आकाशात, अन् करड्या फांदीवरल्या हळूच डोकावणार्‍या, बंदिस्त चार काड्यांच्या घरट्यातही. जन्म मृत्यूच्या उत्सवात, आणि निराकार निर्गुणात. वार्‍याच्या सळसळीत, हवेच्या झुळुकीत, जीवघेण्या वादळात, नि:शब्द, नीरव शांततेत, न सरत्या कोलाहलात. हास्याच्या लकेरीत, पापणीआडच्या पाण्यात. पहा नीट एकदा, कदाचित सापडेनही तुझ्या मनाच्या एखाद्या, खोलश्या कप्प्यात.

प्रतिक्रिया द्या
11220 वाचन

💬 प्रतिसाद (33)
स
स्पंदना Wed, 04/24/2013 - 08:12 नवीन
__/\__!!
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Wed, 04/24/2013 - 09:13 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 04/24/2013 - 09:38 नवीन
श्वास रोखून वाचतच गेले. अजून तिथेच आहे!
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 04/24/2013 - 10:09 नवीन
सुरेख !!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 04/24/2013 - 10:40 नवीन
निव्वळ अप्रतिम रचना!! __/\__
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Wed, 04/24/2013 - 10:41 नवीन
कविता....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/24/2013 - 10:47 नवीन
आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Wed, 04/24/2013 - 10:51 नवीन
त्या फुलांच्या गंधकोशी...ची आठवण झाली. :)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 10/30/2020 - 03:08 नवीन
+1 सुरेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 04/24/2013 - 11:11 नवीन
टाळ्या..............!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 04/24/2013 - 13:47 नवीन
सगळ्यांना धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 04/24/2013 - 13:50 नवीन
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं.... केवळ लाजवाब!
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ Wed, 04/24/2013 - 15:01 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 04/24/2013 - 15:05 नवीन
ते झाकोळणं थांबलं... अन शोधही संपला....!
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 04/24/2013 - 15:05 नवीन
आवडली. ओघवती आहे.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 04/24/2013 - 15:20 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
उ
उपास Wed, 04/24/2013 - 15:41 नवीन
ओघवत्या तरल भावना.. आवडलीच कविता! हं पण, नसण्याचा नुसत्या भासानेही झाकोळायला होवू शकतं.. संदीप म्हणतो तसं.. 'नसतेस घरी तू जेव्हा.. जीव तुटका तुटका होतो...' :)
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता गुरुवार, 04/25/2013 - 06:04 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 04/25/2013 - 06:17 नवीन
छान
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 04/25/2013 - 07:33 नवीन
वाचक, प्रतिसादकांचे मनापासून आभार. @आतिवास, तुम्ही सुचवल्याप्रमाणे बदल केला आहे, थ्यांक्यू.
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 04/25/2013 - 07:45 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
उ
उत्खनक गुरुवार, 04/25/2013 - 10:32 नवीन
सुंदर लिहिलंय!
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे गुरुवार, 04/25/2013 - 17:40 नवीन
आवडली कविता. मस्तच. शेवट सुरेख.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 05/13/2013 - 10:55 नवीन
भारीच!!!!!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 05/14/2013 - 06:42 नवीन
कविता समजली तरी समजलीच नाही, बघु पुर्णपणे केव्हा समजते ती. केव्हातरी समजेलच, इथे घाई कुणाला आहे.
  • Log in or register to post comments
र
रुमानी Tue, 05/14/2013 - 06:53 नवीन
सह्ज आणि सुंदर........!
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Tue, 05/14/2013 - 07:26 नवीन
जन्म मृत्यूच्या उत्सवात, आणि निराकार निर्गुणात. वा..! सुरेख.
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Fri, 05/17/2013 - 12:15 नवीन
उत्तम रचना...! आवडली.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 05/20/2013 - 19:01 नवीन
अनेक लेव्हल्सवर सुरेख आहे! जियो!!!
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 05/21/2013 - 08:10 नवीन
हेच म्हणतो! सुरेखच आहे कविता :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
वेल्लाभट Tue, 05/21/2013 - 03:55 नवीन
वाह ! सुरेख आहे. आवडली...
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 05/21/2013 - 08:17 नवीन
सुंदर कविता. उदास उदास वाटायला लावणारी...
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 10/29/2020 - 15:46 नवीन
आज यशोतैची खूप आठवण आली. जरा तिचं जेवढं मिळालं तेवढं वाचत बसलो होतो. ही रचना वाचून एकदम समाधान वाटलं. खूप खूप सुंदर रचना. स्पर्शणारी. :-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा