Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रवास वेगळाच घडला…

म — मनिष, Wed, 05/01/2013 - 07:16
तुझा हात सोडला अन् प्रवास वेगळाच घडला मी मृगजळाचा नाद सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. तुझीच शक्ती, तुझीच भक्ती; हिच इथली वहिवाट मी हा शिरस्ता मोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. आपलं ओझं आपल्याच खांद्यावर अन् रखरखीत पाऊलवाट, मी धोपटमार्ग सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. माझे प्राक्तन, माझीच दृष्टी अन् माझेच हे दोन हात मी अट्टहास फळाचा सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. फाटलेले शीड, वादळाची साथ अन् संकटांची लाट पण हा कणा नाही मोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. अविरत कष्टांची लांबलचक रात्र अन् मग स्वप्नांची पहाट मी प्रयत्न नाही सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. मुक्कामही विसरलो, अशी सापडली ही माझी वाट मी मार्ग माझा शोधला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. ~ मनिष (१/५/२०१३ --> ६/४/२०१२)

प्रतिक्रिया द्या
2185 वाचन

💬 प्रतिसाद (9)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 05/01/2013 - 20:41 नवीन
छान झालीये रचना.
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा गुरुवार, 05/02/2013 - 18:03 नवीन
.
  • Log in or register to post comments
ढ
ढालगज भवानी गुरुवार, 05/02/2013 - 18:08 नवीन
छानच.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/02/2013 - 18:10 नवीन
छान ! सुंदर !!
  • Log in or register to post comments
स
सुधीर गुरुवार, 05/02/2013 - 18:50 नवीन
छान जमली आहे.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 05/02/2013 - 20:46 नवीन
खूप छान जमली आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/02/2013 - 21:18 नवीन
सुरेख...
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 05/21/2013 - 08:18 नवीन
आवर्जुन प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांनाच धन्यवाद. थोडे मनातले: हे विचार मनात घोळतच होते, आणि देऊळ पाहिल्यावर ३-४ ओळी लिहिल्या होत्या. मग खूप महिन्यांनी कविता पूर्ण केली. मला स्वतःला ही कविता नीट जमली आहे असे वाटत नाही. असो!
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 05/21/2013 - 08:31 नवीन
व्वा!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा