Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाचते नार तोऱ्यात -

व — विदेश, गुरुवार, 05/02/2013 - 17:20
. नाचते नार तोऱ्यात फार नखऱ्यात माळुनी गजरा चाळ ते पायी तालात छान डौलात खिळवती नजरा ओठिचे हास्य मधुजाल गाल ते लाल भान हुरहुरते होउनी दंग चोळीत तंग वेडात ध्यान भिरभिरते हातची काकणे नाद घालुनी साद दावती मेंदी ती अदा करतसे फिदा विसरुनी क्षुधा वाढती धुंदी चमकती नयन सोडुनी तीर हृदयात थेट ते त्यांच्या मेखला खास झुलवून हात अदबीन हाती ये त्यांच्या भिंगरी गरगरा फिरत राही भरभरा सावजा पाठी रंगता महल रंगात येतसे शीळ कुठुनशी ओठी पापी ते पोट बोटात नोट थाटात ओढ गाठीची थिरकतो ताल दावी कमाल ती नार नजर भेटीची .

प्रतिक्रिया द्या
2710 वाचन

💬 प्रतिसाद (9)
अ
अभ्या.. गुरुवार, 05/02/2013 - 23:10 नवीन
हांगाश्शी, ह्ये जबराट एकदम. :)
  • Log in or register to post comments
स
साऊ Fri, 05/03/2013 - 03:32 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 05/03/2013 - 05:07 नवीन
तान तान तान ता..नानानानाना... Image removed. जबरी जमलय आज शाहिर पा.भे.यांची लैच आठवण येऊन र्‍हायली राव...
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 05/09/2013 - 04:37 नवीन
हाहाहा..अगदी ठेक्यात म्हणून पाह्यली हि लावणी.. पाभेंच्या आठवणीसाठी +१ (कुठे गेलेत राव हे पाभे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
व
विसोबा खेचर Fri, 05/03/2013 - 07:07 नवीन
छान जमली आहे लावणी... :-)
  • Log in or register to post comments
म
महेश नामजोशि Fri, 05/03/2013 - 12:19 नवीन
चपखल शब्दरचना.
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Fri, 05/03/2013 - 13:25 नवीन
वा..! जबरदस्त...! लावणी आवडली.
  • Log in or register to post comments
व
विदेश गुरुवार, 05/09/2013 - 04:25 नवीन
अभ्या, साऊ, अतृप्त आत्मा, विसोबा खेचर, महेश नामजोशि, Bhagwanta Wayal ...... प्रतिसादाबद्दल सर्वान्चे आभार !
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 05/10/2013 - 12:39 नवीन
फक्कड जमलंय कि काम
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा