Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पंचम पुरीवाला.. एक श्रद्धास्थान..!

व
विसोबा खेचर
Fri, 05/03/2013 - 11:40
💬 88 प्रतिसाद
मुंबैचा पंचम पुरीवाला. पंचम पुरीवाला हे एक हॉटेल आहे..परंतु खुद्द मालक मात्र त्याला पुरीचं दुकान असं म्हणतो.. बोरीबंदर स्थानकासमोरच बजारगेट स्ट्रीटच्या तोंडाशी हा पंचम पुरीवाला गेली दीडशेहून अधिक वर्ष उभा आहे.. अतिशय साध्या पद्धतीनं सजवलेलं साधंसुधं हॉटेल. लाकडी बाकं..अगदी प्रसन्न वातावरण. प्यायला थंडगार पाणी. प्रत्येक टेबलावर लिंबूमिरच्यांचा एक मोठा वाडगा ठेवलेला..! अतिशय सुरेख गरमगरम पुर्‍या. पानात पडलेली छान गरमगरम फुगलेली पुरी हळूच फोडावी अन् बोटाला वाफेचा चटका बसावा याहून अधिक सुंदर ते काय?! पुर्‍या तळण्याचा हा महायज्ञ दिवसभर सुरू असतो.. पुर्‍यांसोबत खायला आलुमटर, आलूमेथी, छोले असे मोजकेच परंतु चवदार पदार्थ... राईसप्लेटचीही व्यवस्था आहे. साधी राईसप्लेट मागवलीत तर साधारण ५० रुपायांमध्ये पोटभर जेवण होतं..गरमागरम ५ पुर्‍या, एक कोणतीतरी आपल्या आवडीची पातळ भाजी, चांगल्या तांदळाचा भात, सोबत कढी आणि वरण..अगदी ताजं आणि गरमागरम आणि मुख्य म्हणजे सोडा न मारलेलं जेवण असतं..! दहीही अगदी मधूर असतं.. डीलक्स थाळी ७० रुपायांपर्यंत मिळते. तुम्ही नुसती गरमगरम पुरीप्लेट मागवलीत तर सोबत तोंडी लावायला बटाट्याचा रस्सा फुकट..! - : ) हा काँप्लिमेटरी मिळणारा बटाट्याचा रस्साही चवीला अगदी सुरेख असतो.. साधी जिर्‍याची फोडणी..चवीपुरती मीठमिरची.. अगदी साधा असा हा रस्सा गरमागरम पुरीसोबत तुम्हाला खाता येईल.. तेलाची क्वालिटी अतिशय उत्तम.. कधी कुठल्या पुरीला तेलाचा खराब वास आलाय किंवा कधी मैद्याची पुरी दिली गेल्ये असं मला तरी आजतागायत आठवत नाही.. त्याशिवाय मसालापुरी, भटुरे हे देखील पदार्थ अतिशय उत्तम मिळतात.. पंचमचा जगनसेठ.. (मी त्याला जगनसेठ म्हणतो.. त्याचं खरं नांव मला माहीत नाही.. ) जग्नसेठचे कुणी आजोबा की पणजोबा त्याकाळी मुंबैत आले आणि एका लाकडी फळीवजा टेबलावर रस्त्यावरच उभं राहून त्यांनी पुर्‍या तळण्याचा व्यवसाय सुरू केला..तो यज्ञ आजही अव्याहत सुरू आहे..फक्त अलीकडे दोनेक वर्षांपूर्वी काही दिवस पंचमपुरीचं दुकान नुतनिकरणाकरता बंद होतं.. pp आजतागायत अनेकदा पंचमपुरीच्या पायर्‍या अगदी भक्तिभावाने झिजवल्या. आताशा जगनसेठ फारसा दुकानात येत नाही..आता त्याचा मुलगा सांभाळतो..(चवथी की पाचवी पिढी!) पण पूर्वी जगनसेठ असताना कधी पंचमपुरीच्या दुकानात गेलो की माझं अगदी, 'आओ भाई.. आज बहोत दिनोंके बाद दर्शन दिये.. " असं अगदी तोंड भरून स्वागत करायचा. मग लगेच स्वत: माझ्या टेबलापाशी येऊन ऑर्डर घेईल..माझं जेवण झालं की मी मागवलेला नसतानाही एखादा छानसा गुलाबजाम माझ्या पानात ठेवेल.. वर 'ये हमारी तरफसे.. ' - असंही मिश्किलपणे सांगेल.. सांगायचा मुद्दा हा की हल्लीच्या काळात या शेट्टी हॉटेलवाल्यांनी मांडलेल्या प्रचंड महागड्या हॉटेलच्या तुलनेत आजही आमचा पंचमपुरीवाला त्या मानाने खूप उजवा आहे.. शेट्टी हॉटेलातल्या महागड्या सोडा मारलेल्या पदार्थांपेक्षा पंचमपुरीचीवाल्याची पुरीभाजी अथवा राईसप्लेट केव्हाही उजवी, अधिक समाधान देणारी आणि मुख्य म्हणजे पोटभरीची..! असो... तात्या. आगामी : इडलीडोश्याची पंढरी - माटुंग्याचं मणिज लंच होम..

प्रतिक्रिया द्या
44760 वाचन

💬 प्रतिसाद (88)
स
स्पा Fri, 05/03/2013 - 11:45 नवीन
आगामी : इडलीडोश्याची पंढरी - माटुंग्याचं मणिज लंच होम..
सुरेख .. 3 वाजलेत .. ५ वाजेपर्यंत येउंद्या पुढील लेख तुमचे लेख म्हणजे साला पर्वणी असते महाराजा :)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 05/03/2013 - 11:54 नवीन
तुला़ काय अडच ण रे स्पावड्या? तात्यानी एकदम सतरा लेख टा कले तर तुला काय खतरा आहे़? पर्वणीचा लाभ घे की मेल्या. तुला काय पैशे पडायलेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सूड Fri, 05/03/2013 - 12:08 नवीन
'नव्या माणसान रोज दोन लेख टाकले तर ताका जिल्बी म्हण्टंत नि जुन्या माणसान टाकले तं पर्वणी' हा म्हायत नाय ताका. रे मेल्या स्पावड्या, धा पावट 'पर्वणी पर्वणी' बरंय. हांगा फिरान येव नको, कळ्ळें?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
क
कुंदन Fri, 05/03/2013 - 12:12 नवीन
मौ भात न मेतकुट खाणार्‍या स्पा ला पुरीची चव काय कळणारे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ब
बॅटमॅन Fri, 05/03/2013 - 12:18 नवीन
मौ भात न मेतकुट खाणार्‍या
&*%## स्पावड्या, साल्या गरीब बिचार्‍या मांजर्‍या मारून खातोस होय रे &%$##!!!! मुंबैच्या समस्त कोंबड्या डुकरे काय रोगग्रस्त झाली काय रे आँ? बॅटू बर्वे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
स
स्पंदना Fri, 05/03/2013 - 13:05 नवीन
अच्छा अस आहे होय? म्हणुनच त्या भयकथा प्रसवतात स्पा कडुन. खरच रात्र वैर्‍याची आहे. जागते रहो!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मोदक Fri, 05/03/2013 - 13:27 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ब
बॅटमॅन Fri, 05/03/2013 - 13:33 नवीन
बैलाचा डॉळाच फोडलात की हो =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 05/03/2013 - 15:03 नवीन
@बैलाचा डॉळाच फोडलात की हो>>> Image removed.Image removed.Image removed. पांडुज बाजार Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सूड Fri, 05/03/2013 - 13:50 नवीन
अहो एखादा आयडी जालीय आत्महत्या करायचा तुमच्या या अशा लिखाणानं !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
स्पा Fri, 05/03/2013 - 13:58 नवीन
अच्छा अस आहे होय? म्हणुनच त्या भयकथा प्रसवतात स्पा कडुन.
ख्याक =)) =)) डायरेक सुपरमार्केट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ध
धमाल मुलगा Sat, 05/04/2013 - 00:34 नवीन
=)) =)) =)) कॉफी अडकली साल्या नरड्यात! काय लिहितो का काय करतो? ते स्पांडू पारंपारिक वैदूच्या गेटपमध्ये डोळ्यापुढं आलं ना बे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sat, 05/04/2013 - 11:12 नवीन
=)) =)) =)) धमुशेठच्या नरड्यात कॉफी अडकण्यास अखेरीस आपणही कारणीभूत ठरलो हे पाहून डोळे पाणावले ;) लै दिसांची इच्छा होती ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
सहज Sat, 05/04/2013 - 11:17 नवीन
मिपाशास्त्रात धमूशास्त्री आठवले यांच्या पद्धतीप्रमाणे कळफलकावर सांडून तो खराब होणे हेच खरे कर्मकांड आहे. आजकाल कळाफलक ह्या विधीत वापरला जात नाही. शॉर्टकट मधे प्रथा पाळल्या जात आहेत. चालायचेच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sat, 05/04/2013 - 11:22 नवीन
खराय. काळ मोठा कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
अ
अद्द्या Sat, 05/04/2013 - 05:52 नवीन
या ब्याट्या ला कोणी तरी आधी मारा रे नको तिथे नको ते सुचतं याला सकाळी सकाळी तात्यांचा लेख वाचावं म्हटलं . तोंडाला पाणी सुटतंय . भूक लागतीये हे वाचून . पण तरीही मक्ख चेहरा ठेवलाय हापिसात . आणि हे उलटं लटकलेलं मधेच पचकतय . आता दिवस भर बॉस चा उगाचच रागावलेला आणि माझ्या कडे "काय पात्र आहे हे" अशी नजर झेला :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sat, 05/04/2013 - 11:13 नवीन
=)) =)) एक सुधारणा सुचिवतो बगा फकस्त. बॅटमॅन उल्टं लटकत न्हाई. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
श
श्रावण मोडक Fri, 05/03/2013 - 14:03 नवीन
पर्वणीचा लाभ घे की मेल्या. तुला काय पैशे पडायलेत ?
पैशे? ऑं? पैशे पडतात का असं वाचण्यासाठी कुठं? आधीच सांगून ठेव. तिकडं जाणं टाळतो... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
क
कुंदन Sat, 05/04/2013 - 11:21 नवीन
तुम्ही पण आता डॉलर मध्ये वेवहार कर्ता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
ढ
ढालगज भवानी Fri, 05/03/2013 - 13:57 नवीन
=)) =)) कसली विनोदी प्रतिक्रिया लिहीतोस रे स्पा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
च
चौकटराजा Fri, 05/03/2013 - 12:29 नवीन
पुण्याच्या नान्या, जागा हो २४ तास मुंबैच्या तात्याचे आहेत ! चितळे, बेडेकर, श्री, सगळ्या श्रद्धास्थानांची लैन लाव गड्या !
  • Log in or register to post comments
क
कुंदन Fri, 05/03/2013 - 12:34 नवीन
अन ते जोशि बटाटे वाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
स्पंदना Fri, 05/03/2013 - 13:07 नवीन
खेडशिवापूरची भेळीचे दुकान्ं? त्यातला पण कुणी असेल की "याऽऽ" म्हणणारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
च
चित्रगुप्त Fri, 05/03/2013 - 13:29 नवीन
वाचून जल्मात पहिल्यांदा आपण मुंबैकर नसल्याबद्दल खंत वाटली.
  • Log in or register to post comments
क
कुंदन Fri, 05/03/2013 - 13:36 नवीन
चित्रगुप्त साब के लिये एक प्लेट पुरी लाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
आ
आजानुकर्ण Fri, 05/03/2013 - 14:22 नवीन
चार पाच पिढ्या मुंबईत घालवूनसुद्धा स्थलांतरितांच्या पाचव्या पिढीने भाईकाका, आण्णा आणि बाबूजींसारख्या मराठी मानबिंदूंच्या निस्सीम भक्ताचे स्वागत आओ भाई.. आज बहोत दिनोंके बाद दर्शन दिये.. " अशा भय्यास्टाईलने करावे आणि त्या मराठी माणसाने मिटक्या मारत पाणीपुरी हाणावी याची मिपाकर म्हणून शरम वाटली.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 05/03/2013 - 14:26 नवीन
ऐवजी पुरीभाजी वाचावे धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
म
मदनबाण Fri, 05/03/2013 - 14:51 नवीन
हे तातुडी, एक लेख "जिलबी"वर पण लिहा ना... प्लीज प्लीज प्लीज...
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक Sat, 05/04/2013 - 05:59 नवीन
लाडे लाडे नाही लिहिले तरी लेख येईल, काळजी नका करू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ध
धमाल मुलगा Sat, 05/04/2013 - 06:56 नवीन
=)) =)) =)) बा**ला! त्या मदन्याचा साला तुमीतर पार शारुक करुन टाकला द्येवा! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
स
सामान्य वाचक Sat, 05/04/2013 - 07:44 नवीन
शारूक केला तोपर्यंत ठीक आहे नशीब कि कारण जोहर नाही केला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मदनबाण Sat, 05/04/2013 - 08:39 नवीन
माझा प्रतिसाद हा उपरोध आहे हे कळले नाही असे दिसते... असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
स
सामान्य वाचक Sat, 05/04/2013 - 08:42 नवीन
आम्ही पण काही एवढे '' हे'' नाही तुमचा प्रतिसाद गमतीशीर वाटला , म्हणून तर त्याला उत्तर दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
स
संदीप चित्रे Fri, 05/03/2013 - 15:33 नवीन
अत्यंत साध्या पण उत्तम रेस्टॉरंटची ओळख करून दिल्याबद्दल धन्स रे! जेवणात सोडा मारलेला नसतो हे तर फारच महत्वाचं :)
  • Log in or register to post comments
व
विनोद बोरोले Sat, 05/04/2013 - 10:39 नवीन
आम्च्य नग्पुरत नहि मिलत अशि चन्ग्लि पुरि भजु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
स
संजय क्षीरसागर Sat, 05/04/2013 - 11:01 नवीन
हा कि-बोर्डचा प्रॉब्लम आहे का जिभेचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद बोरोले
L
lakhu risbud Sat, 05/04/2013 - 12:07 नवीन
ठ्ठो(=)!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 05/04/2013 - 12:53 नवीन
त्यांच्या पहिल्या नावाकडे पहा... उत्तर त्याच्यात दडलं आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
उ
उपास Fri, 05/03/2013 - 15:48 नवीन
तात्या, 'बोरीबंदर' ह्या एकाच शब्दात जिंकलस गड्या.. साला हल्ली सी.एस.टी नाहीतर व्हीटी शिवाय कोणी हाक नाही मारत त्याला.. ६५, ६६, ६९ किंवा कुठल्याही बशीत 'बोरीबंदर' हा शब्द हद्दपार झालाय.. पुरीवाल्याकडे जाऊन बघायला हवे एकदा.. पण तिकडे गेलो की विठ्ठल भेळ, बादशाहा आणि मागे भगत ताराचंद सारख्या भुरळ घालणार्‍या इतक्या गोष्टी आहेत की बस्स! आणि हो ते जाताजाता कामताला नावं ठेव्ण्याचं काम नाय हां.. सुविधा आहे ना समोर फोर्ट चं ते तोंडात मारेल कुणाच्याही.. हाटेल चालवावं तर कामतांनीच.. साला पुण्यात हे तुळ्ळू कामत मात्र फार दिसत नाहित ह्याचं वाईट वाटतं!
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 05/03/2013 - 16:20 नवीन
आजचा गृहपाठ - जगनसेठचे व्यक्तीचित्र लिहा. थीम- साधारण दुकान सुरु व्हायची वेळ, जगनसेठ व प्रोटॅगॉनिस्ट यांची भेट, जगनसेठ भीमाण्णाचे फॅन, मग काय सुरवातीला हा कोण आला पासुन आपण साला ह्या प्रोटॅगॉनिस्ट चे कट्टर फॅन व पुढे पुढे निस्सीम भक्त असा जगनसेठचा प्रवास. दरवेळी गेलो की आवडीने प्रोटॅगॉनिस्ट फर्माईश करुन गाउन घेणार. प्रोटॅगॉनिस्ट चे कौतुकच कौतुक, थरथरत्या हाताने शेवटच्या दिवशी पण प्रोटॅगॉनिस्टला पुर्‍या भरवून, ठंडा पाजून जगातून एक्झीट घेणार जगनसेठ सहाय्यक शब्द, - साला, कोणकुठला, फॅन, भक्त, भीमण्णा (हा शब्द सूचक जागी एकदाच किंवा दोन वेळा पुरे पण एका भीमाण्णाच्या वाक्यात चार मी, माझे, मला, आपणही हवे), कौतुक, समाधान, मान, सन्मान, माज
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 05/03/2013 - 16:28 नवीन
उतार्‍याखालचे व्याकरण: १) भाजीत माशी मरुन पडली आहे, व्याकरणाच्या मदतीने चालवून दाखवा. २) 'बोरीबंदर' या शब्दाचा सामासिक विग्रह करा. ३) 'पुर्‍या तळण्याचा हा महायज्ञ दिवसभर सुरू असतो.. ' यातील उपमा, उपमेय आणि उपमान शोधून व्याख्येसहित स्पष्ट करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
विश्वनाथ मेहेंदळे Sun, 05/05/2013 - 10:13 नवीन
हे आवडले...लई भारी !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
व
विसोबा खेचर Fri, 05/03/2013 - 17:19 नवीन
आदरणीय सहजराव, मूळ लेखासंदर्भात कुठलीही बरीवाईट प्रतिक्रिया न देणारा आपला अवांतर प्रतिसाद वाचून अतिशय वाईट वाटले. इतकेच सांगू इच्छितो की भारतरत्न अण्णांचा पूर्णत: अस्थानी असा उल्लेख व जगनशेठच्या जाण्याचा उल्लेख खूप दुखावून गेला. असो, मूळ लेखाप्रमाणेच हा प्रतिसादही अत्यंत थर्डरेट समजून दुर्लक्ष करावे अशी सादर विनंती करतो.. - तात्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सहज Fri, 05/03/2013 - 17:45 नवीन
ललित लेखनातली स्थळ, पात्र यांना काही एक स्वातंत्र्य असते. माझ्या प्रतिसादात तुम्हाला भारतरत्न अण्णा दिसले, पण ललित लेखनात ते एक स्वतंत्र घटक आहेत, दोन लोकांना जोडणारा दुवा आहेत. त्यात अनादर, अस्थान नाही. जगनशेठ हे एका ललितलेखाचा एक भाग असु शकतात. प्रत्यक्ष व्यक्तीशी संबध असेलच असे नाही. तुम्ही प्लीज भावना बाजूला काढून पाहीलेत तर माझा प्रतिसाद केवळ एक व्यक्तीचित्रण पाककृती आहे हे दिसेल. तुम्हाला ती पाककृती नावडायचा पर्याय आहेच. तुम्ही जरुर दुर्लक्ष करा, प्रतिसादाला थर्डरेट समजा पण आमच्या पाककृतीतल्या प्रोटॅगॉनिस्टला नावे ठेवू नका तो गरीब बिचारा आहे. आज त्याचा टाईम खराब असेल पण तो हिरो आहे. त्याचे भले कौतुक करु नका पण नावे ठेवू नका अशी विनंती करतो. तुम्ही सिद्धहस्त लेखक आहात आम्हा फुटकळ काळेपांढरे करणार्‍यांच्या प्रतिसादाला बघीतलेत हेच आमच्याकरता खूप आहे. बाकी खेद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विकास Sat, 05/04/2013 - 01:45 नवीन
____/\____ There's a bizarre insistence on how a story should be. 'The protagonist must be sympathetic!' they say. Whatever that means. I never engage in that discussion. I never use that word, 'sympathetic.' I just know 'interesting.' - Alexander Payne
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
श
श्रीरंग_जोशी Fri, 05/03/2013 - 17:01 नवीन
पुरीभाजी व जेवणाच्या थाळीचे एवढे चपखल वर्णन वाचून लगेच पंचम पुरीवाल्याकडे जावेसे वाटत आहे. माझ्या लहानपणीपासून अफाट लोकसंख्येमुळे मुंबईवर खूप ताण आहे असे वर्तमानपत्रांत रोज रोज वाचल्यामुळे कशापायी त्यात भर घालावी या विचाराने मुंबईत कधी निवांतपणे फिरलोच नाही. एकदाच काय काही तासांसाठी दक्षिण मुंबईत चक्कर टाकली.
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग Fri, 05/03/2013 - 17:49 नवीन
अवांतर प्रतिक्रिया वाचून काय म्हणावे कळत नाही. तात्या सध्या एकामागून एक बरेच लेख टाकत आहेत, बऱ्याच नवीन सदस्यांची ह्याच कारणासाठी खिल्ली उडवली जाते वगैरे सगळे मान्य. त्याबद्दल लिहीले तर एकवेळ समजू शकतो. पण येथील ज्येष्ठ सदस्य आणि संपादक/ सल्लागार यांच्या काही खोचक वैयक्तिक टोमणे मारणाऱ्या प्रतिक्रीया वाचून अचंबा आणि खेद दोन्ही वाटले. मला भूतकाळात काय झाले याची बऱ्यापैकी कल्पना आहे पण ते सगळे ह्या आणि इतर धाग्यांवर का? अनेक नवीन सदस्य जे वयाने/ अनुभवाने तात्यांपेक्षा लहान असतील त्यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आहेत. असो ह्या निमित्ताने बरेच जुने आय डी लिहिते झाले हेच काय ते चांगले म्हणायचे.
  • Log in or register to post comments
उ
उपाशी बोका Fri, 05/03/2013 - 18:20 नवीन
पण येथील ज्येष्ठ सदस्य आणि संपादक/ सल्लागार यांच्या काही खोचक वैयक्तिक टोमणे मारणाऱ्या प्रतिक्रीया वाचून अचंबा आणि खेद दोन्ही वाटले. मला भूतकाळात काय झाले याची बऱ्यापैकी कल्पना आहे पण ते सगळे ह्या आणि इतर धाग्यांवर का? अनेक नवीन सदस्य जे वयाने/ अनुभवाने तात्यांपेक्षा लहान असतील त्यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आहेत.
या कारणामुळे आणि कंपूबाजीमुळेच मी इथे (इच्छा असूनही) फारसे लिहित नाही. केवळ वाचनमात्र असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
श
श्रीरंग_जोशी Fri, 05/03/2013 - 18:26 नवीन
तुमचा बिल्ला क्रं ७ आहे. मिपाच्या जन्मापासूनचे तुम्ही सदस्य आहात. कॄपया इथे लिहिण्याचा एकदा प्रयत्न तर करा. मला तरी असे वाटते की जुन्या सदस्यांनी फार बागुलबूवा केल्याने बरेच नवे सदस्य मोकळेपणाने अभिव्यक्त होत नाहीत. (अवांतराबद्दल क्षमस्व)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपाशी बोका
ध
धमाल मुलगा Sat, 05/04/2013 - 00:37 नवीन
तू तर काय आणि खुळाच हैस खरं. लेका बिल्ला नंबर दिसतोय तुला अन तरी कुठं प्रौढ साक्षरतेच्या मास्तरागत विनवण्या करतंयस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा