Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कबुतरांची सभा

अ — अत्रुप्त आत्मा, Mon, 05/06/2013 - 05:45
पर्वा एका सरकारी हापिसात कामासाठी गेलो होतो आणी नेहमी प्रमाणे वाट बघत ताटकळत उभा होतो. कडेला वाटलं माणसं बोलताहेत पण कबुतरं बोलत होती कालच्या दिवसात काय काय झालं? याचे हिशेब तोलत होती पहिलं दुसर्‍याकडे पाहुन मिष्किलपणे हसत होतं आणी त्यांच्या गमती पाहुन तिसरं मधिच घुसत होतं काल म्हणे पहिल्याला आख्खं कणिस मिळलं पण दुसर्‍यानं धक्का दिला आणी ते हवेतच गळलं थोड्याच वेळात कबुतरांची भली मोठ्ठी सभा भरली आणी आज चरायला कुठं जायचं? यावरच पहिली चर्चा ठरली कुणी म्हणलं किराणा दुकान आजचा पहिला ठराव आहे धान्यात दगडं-खायचा तिथं चांगला सराव आहे. दुसरा म्हणे सरकारि गोडाऊन कशाला मोकळं सोडायचं? पण त्या बेन्या शिपाया देखत पहिलं पोतं कुनी फोडायचं? होता होता...चर्चा करता सकाळचे आकरा वाजले मग कबुतरांच्या पोटात कावळे ओरडायला लागले हळू हळू एकेक जण बाजु बाजुनी कटायला लागला त्यामुळेच चर्चेचा तिढा खर्‍या अर्थानी सुटायला लागला शेवटी अध्यक्षच खुर्ची सोडून फर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करून उडून गेला परंपरे नुसार सभासदांना वार्‍या वर सोडून गेला त्यानंतर विषय एकदाचा मूळ मुद्याला आला सगळे म्हणाले,मरु दे चर्चा दाणे टिपायला चला सरकारी भाषेतच एक बोलला कृती कार्यक्रम हाती धरा चर्चा कसल्या करताय? उडा दुकानांकडं भराभरा तेव्हढ्यात सरकारी हापिसातुन ''गुटुरगू गुटुरगू'' ऐकू आलं आणी मला अंदाज आला...की, हापिस एकदाचं सुरु झालं. काम व्हावं म्हणुन गेल्या गेल्या सायबाला दिला पेश्शल चहा तेव्हढ्यात खिडकितलं कबुतर म्हणलं, ''दाणे नसतिल तर सावध रहा''... =================================================================

प्रतिक्रिया द्या
3889 वाचन

💬 प्रतिसाद (20)
प
प्रचेतस Mon, 05/06/2013 - 06:01 नवीन
=)) =)) =)) अगगगगग्गगग्गगगगगा सुरुवातीची काही कडवी वाचून तिथे उपस्थित असलेल्या भलत्याच कबुतरांवर लिवलंय असं वाटलं. नंतर योग्य उलगडा झाला.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 05/06/2013 - 06:03 नवीन
कोणताच कशाचा काही उलगडा होत नसल्यामुळे लेखन सॉरी कविता डोक्यावरुन गेली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 05/06/2013 - 06:10 नवीन
हम्म्म्म.... सरकारी हापिसातले कर्मचारी आणी त्यांची कामाची साधारण रीत (डेल्ली वर्किंग) कबुतरांच्या अंगावर घतली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ढ
ढालगज भवानी Mon, 05/06/2013 - 08:18 नवीन
छान आहे. हसू आले.
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Mon, 05/06/2013 - 12:07 नवीन
जाए वय उडउडके...
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Mon, 05/06/2013 - 12:44 नवीन
एखादी कबुत्तरी नव्हती का घोळक्यात ?? smiley
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 05/06/2013 - 12:53 नवीन
बिलाशिवाय दाणे टिपायचं एखादं हाटेल सापडले काय कबुतराना ...... ??
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 05/06/2013 - 12:54 नवीन
अच्चा असं झालं तर
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 05/06/2013 - 13:12 नवीन
हो..............!!! मग काय करायचं आपण आता? :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Mon, 05/06/2013 - 13:26 नवीन
मग काय करायचं आपण आता?
धीर सोडू नका , काहीतरी मार्ग निघेलच :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 05/06/2013 - 13:42 नवीन
ह ल क ट ..स्पा :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Mon, 05/06/2013 - 13:43 नवीन
तुमच स्वागत आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
व
विसोबा खेचर Mon, 05/06/2013 - 13:09 नवीन
मस्त..:)
  • Log in or register to post comments
त
तर्री Mon, 05/06/2013 - 13:16 नवीन
जाम आवडली. धान्यात दगडं-खायचा तिथं चांगला सराव आहे. मस्त ....श्लेष तथा डबल मिनीग ! काम व्हावं म्हणुन गेल्या गेल्या सायबाला दिला पेश्शल चहा तेव्हढ्यात खिडकितलं कबुतर म्हणलं, ''दाणे नसतिल तर सावध रहा''... सम मस्त गाठली गेली आहे !
  • Log in or register to post comments
ल
लीलाधर Mon, 05/06/2013 - 14:57 नवीन
मिळुन काय आणताहेत याचीच (वाट) बघणारा लीलाधर :)) :-P :-D
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 05/06/2013 - 15:25 नवीन
आवडली...
  • Log in or register to post comments
J
jaypal Mon, 05/06/2013 - 15:33 नवीन
गिर्रेबाज हो. ;-) लगे रोहो. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Mon, 05/06/2013 - 19:28 नवीन
यक्दम्म झक्कास... :)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 05/13/2013 - 19:02 नवीन
आशयपुर्ण कविता आहे आत्माजी
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 05/13/2013 - 19:06 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा