Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संक्षिप्त

अ — अज्ञातकुल, Tue, 05/07/2013 - 07:07
वेदनेचे रूप आहे हिमनगाची सावली वाटते ते बेट तरते नाळ कोणी पाहिली आंधळ्या हृदयास दिसते कोणतीही माउली अधिकतर अंदोलनांच्या सुप्त वेठी काहिली लाट भर आघात अगणित पेटलेल्या मैफिली भेटले अज्ञात कोणी शोधते मन चाहुली वेध व्याधाचे इथे जाळीत माया गुंतली जाळ शीतल कोपले आणि समिधा गोठली एकले हे युद्ध तरिही संगरी प्रश्नावली उत्तरे संक्षिप्त कलिका कोष झाकुन राहिली गंध मदनाचे अधूरे झुळुक अवचित थांबली वादळे उठली; मुक्याने ऐन भाषा संपली ............................अज्ञात

प्रतिक्रिया द्या
1494 वाचन

💬 प्रतिसाद (5)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 05/07/2013 - 13:47 नवीन
वेध व्याधाचे इथे जाळीत माया गुंतली जाळ शीतल कोपले आणि समिधा गोठली
व्वाह!! क्या बात!!!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 05/07/2013 - 15:25 नवीन
पहिली दोन अक्षरे वाचून डोकावलो. तसं काहीच नाही. :( कविता समजली नाही मात्र वाचताना आवेश जाणवतोय. एकेका शब्दाबरोबर नाद उमटतोय.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 05/07/2013 - 19:26 नवीन
क्या बात है...क्या बात है यार..... मार डाला...मार डाला... प्रत्येक ओळी ओळीवर फिदा आहे. सलाम सलाम सलाम!!!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 05/08/2013 - 11:03 नवीन
मस्त मस्त मस्त. आवडली एकदम.
  • Log in or register to post comments
स
साऊ Wed, 05/08/2013 - 15:38 नवीन
फार छान.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा