Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझी गझल निराळी

ग — गंगाधर मुटे, Wed, 05/08/2013 - 08:14
माझी गझल निराळी

घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी

शब्दांची गुळणी नोहे, नव्हेच शब्द धुराडा
निद्रिस्थी जागवण्याला, गातो शेर भुपाळी

एकेका आरोपीची उला पकडतो गच्ची
सानीच्या लाथडण्यावर पिटती मिसरे टाळी

लढवैय्या आशय माझा करतो तांडव तेथे
जन्माला येते जेथे, ती काळरात्र काळी

युगानुयुगे ते बोलले, ऐकत आलो आम्ही
आता माझ्या मतल्याची ऐकवण्याची पाळी

गझल माझी बंड आणि अन्यायाला दंडही
शेतकर्‍यांच्या मुक्तिसाठी आयुधांची थाळी

चेतनेला पेरून देते अभयतेची खते
संघर्षाला पिकवताना प्रतिभा बनते माळी

लयीत नाही कुणीही, बेसूर सत्ताधारी
अर्थशिस्त शिकवी त्यांना लिहिते वृत्त कपाळी

पोशिंद्याच्या रक्षणाचा ’अभय’ घेतो ’मक्ता’
ओतप्रोत भरतो आहे शेरास्त्रांनी हाळी

                                           - गंगाधर मुटे
---------------------------------------------------

प्रतिक्रिया द्या
1829 वाचन

💬 प्रतिसाद (4)
B
Bhagwanta Wayal Fri, 05/10/2013 - 09:06 नवीन
गझल आहे उत्तम शब्दांची न्यारी खेळी घ्या माझ्याकडुन ही प्रतिक्रिया निराळी
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sat, 05/11/2013 - 06:48 नवीन
प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhagwanta Wayal
श
श्रिया Fri, 05/10/2013 - 09:16 नवीन
सुरेख गझल!
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sat, 05/11/2013 - 06:50 नवीन
प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिया
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा