Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सन्मान

च — चाणक्य, Fri, 05/10/2013 - 03:50
लोक विचारती आम्हा, का दर्द आमच्या शायरीत आहे अहो व्यथांना सन्मानिण्याची, हीच आमची रीत आहे वाटते दु:खासही कधी,दिसावे सुंदर आपणही लेखणीत म्हणून ते आमच्या, यथेच्छ शृंगार करीत आहे ये फुलवितो तुलाही, सांगतो दु:खास आम्ही ऐकतो ते ही स्वतःला, आताशा सावरीत आहे कधी करतो सलगी, बोचर्‍या जुन्या क्षणांशी वागणे जरासे आमचे, आमच्याच विपरीत आहे घेतला दगाही काही, ऐश्या सफाईने आम्ही दगाबाज अजून आमची, वाहवा करीत आहे

प्रतिक्रिया द्या
2453 वाचन

💬 प्रतिसाद (8)
स
स्पंदना Fri, 05/10/2013 - 05:28 नवीन
ये फुलवितो तुलाही, सांगतो दु:खास आम्ही ऐकतो ते ही स्वतःला, आताशा सावरीत आहे
व्वाह! क्या बात है।
घेतला दगाही काही, ऐश्या सफाईने आम्ही दगाबाज अजून आमची, वाहवा करीत आहे
बहोत खुब।
  • Log in or register to post comments
क
कोमल Fri, 05/10/2013 - 07:25 नवीन
असेच म्हणते.. खुपच छान.. आवडेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/10/2013 - 05:31 नवीन
ये फुलवितो तुलाही, सांगतो दु:खास आम्ही ऐकतो ते ही स्वतःला, आताशा सावरीत आहे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 05/10/2013 - 05:32 नवीन
कल्पना खूप आवडल्या.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 05/10/2013 - 05:57 नवीन
केवळ सुरेख...!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 05/10/2013 - 07:21 नवीन
बोहोत खूब...! :-)
  • Log in or register to post comments
ढ
ढालगज भवानी Fri, 05/10/2013 - 16:20 नवीन
फार दिवसांनी अप्रतिम शायरी ऐकली.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 05/10/2013 - 16:35 नवीन
वाटते दु:खासही कधी,दिसावे सुंदर आपणही लेखणीत म्हणून ते आमच्या, यथेच्छ शृंगार करीत आहे
ज्जे बात!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा