कलादालन

केकचे फोटो

Primary tabs

नमस्कार मिपाकर,

मी नविन सदस्य आहे आणि लेखनाचा पहिला प्रयत्न आहे.

चला तर मग...सुरुवात गोडापासुन करु. मी केलेल्या केकचे काही फोटो. प्रत्येक पायरीचे नाही आहेत, पुढील वेळेस आठवणीने काढेन.

आशा करते की आपणास आवडतील.

.

.

.

.

.

Mrunalini

अरे वा... खुपच छान आहेत केक.

वरून तिसरा फोटो तर सॉलीड... केक पण फोटो सारखाच चविष्ट झाला असेल...

प्यारे१

+१

थोडं करेक्शन, टॉपिंग मध्ये स्ट्रॉबेरी पानांसकट ठेवल्या आहेत. पाने काढून ठेवायला हवी.

बाकी केक तोंपासु.

पैसा

मस्त आहेत फोटो! हे सगळे कसे केले त्याबद्दल काही माहिती द्याल का?

इनिगोय

सुपर्ब!
शेवटचा केक कसला मस्त आहे!
तू कोर्स केला आहेस?

सुंदर छायाचित्रं. वरून तिसर्‍या केकला अर्थात सर्वाधिक पसंती.

एखादी केक पाककृती मिसळपाववर टाकून आम्हांस उपकृत करावे, ही विनंती.

वेल्लाभट

केक म्हणजे लई भारी चीज हो! फोटो छान आहेत ! मस्तच

jaypal

नं४ ला थोड झुकत माप देऊन सगळेच फोटो आवडले असे जाहीर कारतो.

अभ्या..

लैच आर्टीस्टीक अन फोटोजेनिक केक बनवता राव तुम्ही.
विनी चा केक सगळ्यात भारी. :)

स्पंदना

देवा! हे असल फक्त दुकानात असत की हो!
तुमी दुकानवाल्या/वाले आहात का? मग ठिक आहे.
मला तो पांढरा शुभ्र अन किवी स्ट्रॉबेरी लावलेला केक आत्ता हवाय!

श्रिया

सगळेच केक छान दिसत आहेत. शेवटचे दोन केक विशेष आवडले. शेवटच्या केकवरील दोन पक्षी कसे बनवले?

चेरी

़केकचे फोटो आवडल्याबद्द्ल धन्यवाद!

लेकीसाठी केक बनवायला सुरूवात केली आणि माझ्या अहोना खूप आवडतात, त्याचेच प्रोस्ताहन आहे. मी बेसिक कोर्स केला आहे बाकी कल्पनाशक्ती.....

स्ट्रॉबेरीची पाने खूप मस्त कलर कॉनट्रास्ट देत होते.

शेवटचे २ केक फॉनड्ण्ट केक आहेत. पक्षी हाताने ड्रॉ करून मग कट केला.

लवकरच केकॄ टाकेन.

इरसाल

केक आवडले. केक म्हणजे जीव की प्राण. आयता विकत आणावा लागेलसे दिसतेय.

तुम्ही फक्त तिसर्‍या फोटोतच दिसत आहात.;)

बॅटमॅन

एकसे एक जबर्‍या प्राणघातक केक दिसत आहेत.

केकृ शब्दही आवडलाच.

आजानुकर्ण

केकचे फोटो कसे बनवले. कृपया फोटोची रेसिपी द्यावी (एक्सिफ डेटा, किती वेळ एक्सपोज केले वगैरे)

अजया

मस्तच! रंगसंगतीही सुरेख आहे! फॉनड्ण्ट कसे तयार करतात याची उत्सुकता होतीच्,लवकर टाका केकृ !!

पिंगू

केक बघून केकाटल्या गेलो आहे..

जयवी

सगळेच केक एकदम "मार डाला" !!
तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम !!

चिगो

केकपेक्षा आईसिंग भारी..;-) जबराट आहेत केक्स, ताई.. सगळेच सुंदर आहेत, तरी चौथा सगळ्यात जास्त आवडला..

जेनी...

सगळेच भारीयेत ... चिमनीवाला आवडला