Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रेघ

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Tue, 05/14/2013 - 11:48
पिकासोपासून हुसेनपर्यंत कोणाचेही कुठलेही चित्र ऊचलून पहावे प्रत्येक चित्रात एक विविक्षित रेघ असते खरं तर भव्य कॅनव्हासवर ती अगदीच लहानशी असते अहो ते पिकासो अन् हुसेनही जाऊ दे मोरपीस पाहिलयं कधी निरखुन? त्या सुंदर रंगसंगतीतही एक बारीक रेघ असते पिसाच्या बरोब्बर मधोमध बर्‍याचदा या रेघेचा संदर्भ चित्रकारालासुद्धा समजलेलाच असतो असेही नाही पण त्या रेघेशिवाय चित्र मात्र अपूर्ण असते माझ्या असण्यामध्ये तुझे अस्तित्व त्या रेघेसारखे आहे ---- एकाकी तळ्याच्या नितळ पाण्यात दिसण्यार्‍या सूर्याच्या प्रतिबिंबासारखी आहेस तू सूर्यचं पण तरी शितल, पाण्यात आहे ना... सुस्पष्ट, स्वच्छ, निव्वळ तेज अन् याच तेजाने ऊजळून निघाल्यावर लकाकणार्‍या तळ्यासारखा मी... लकाकणारा कितीही दैदिप्यमान दिसला तरी त्या प्रकाशाच्या स्त्रोतापासून दूर जाणे त्याला परवडणारे नसते ------ आजकाल मी रात्रीचा एकटाच भटकायला निघतो आकाशातल्या तार्‍यांकडे टक लावून जमिनीवर चालत असतांना जाणवते सदा चकाकत राहण्यासाठी स्वत:लाच जळत ठेवावे लागते यांना हो कारण, त्यांच्याकडे त्यांचा सूर्य नाहीये ---- मग जाणवल मी किती भाग्यवान माझ्याकडे माझा सूर्य आहे कधीही न मावळणारा एकाकी तळ्याला दैदिप्यमान करणारा माझ्या चित्रातली ती एक विविक्षित रेघ त्याच्याच प्रकाशाची एक तिरीप तर आहे ------ पिकासोला, हुसेनला कळले कि नाही ते माहित नाही पण मला मात्र माझ्या चित्रातल्या त्या विविक्षित रेघेचा संदर्भ समजलाय.. हो बरीच वर्ष लागली खरी पण समजला हे काय कमी आहे? |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१४/०५/२०१३)

प्रतिक्रिया द्या
1736 वाचन

💬 प्रतिसाद (7)
M
michmadhura Tue, 05/14/2013 - 11:55 नवीन
नेहेमीप्रमाणेच छान कविता.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 05/14/2013 - 12:25 नवीन
हो बरीच वर्ष लागली खरी पण समजला हे काय कमी आहे? मस्तच!
  • Log in or register to post comments
अ
अनिदेश Tue, 05/14/2013 - 14:19 नवीन
नेहमी प्रमाणेच जमली आहे :)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 05/14/2013 - 16:00 नवीन
आज फर्स्ट टाइम मिकाची कविता आवडली नाही. :( चित्रातली विवक्षीत रेघ ?????
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 05/15/2013 - 03:04 नवीन
भावार्थ समजला, काव्यार्थ.....
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Wed, 05/15/2013 - 05:41 नवीन
हम्म्.. पर्पज ऑफ लाइफ सारखं काहीतरी?
  • Log in or register to post comments
स
स्पा Wed, 05/15/2013 - 08:06 नवीन
कमाल आहे थोडी कळायला कठीण वाटली पुन्हा पुन्हा वाचून पाहतो
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा