अप्रतिम भजन आठवलं - म्हारो प्रणाम. (https://www.youtube.com/watch?v=z7RHhWaeQTY). काय एकेक सुरेख हरकती घेतल्या आहेत. व्वा! त्या आवाजात काय आहे शब्दात सांगणं कठीण आहे. पण जे काहि आहे ते हॄदयाचा ठाव घेणारं आहे!
मला शोभा गुर्टूंनी गायलेलं अधिक आवडतं.. किशोरीताईंपेक्षा अधिक सुरीलं, मनाला अधिक भावणारं आणि अधिक तयारीचं वाटतं..!
https://www.youtube.com/watch?v=WGSbcLIHXlc
केसरिया या शब्दाचा अर्थ केसरी रंगाचा फेटा बांधणारा असा होऊ शकतो का ? जुन्या काळात राजस्तान मध्ये पुरुषांना फेटा बांधणे जवळ जवळ सक्तीचे होते.
हे गाणे अनेकांनी गायलेले आहे. त्या पैकी लता मंगेशकर यांनी गायलेले गीत येथे देत आहे.
https://www.youtube.com/watch?v=9SnFo2UMvQw
इतकी राज्यं, इतक्या भाषा.. प्रत्येक मातीतलं गाणं वेगळं आणि तेवढंच ढंगदार..मग ती मराठमोळी लावणी किंवा ठाकरगीत असू दे, किंवा राजस्थानातलं केसरिया असू दे, किंवा मध्यप्रदेशातल्या माळव्यातलं लोकगीत असू दे, किंवा पंजाबातल्या रंगेल मातीतल्या टप्प्याशी दोस्ती करणारं कुठलं कुडी-मुंडाचं प्रेमगीत असू दे
खरय, मातीशी नाळ जुळलेलं सगळंच मनाला भावतं.
आमच्या एका दोस्ताच्या लग्नाला जोधपूरला गेलो होतो तेव्हा ही डॉ अग्रवाल नावाची आसामी मला भेटली. डॉक्टरसाहेब राजस्थानी लोकगीताचे गाढे अभ्यासक. खूप गप्पा झाल्या त्याच्याशी. अगदी मोकळाढाकळा गप्पीष्ट माणूस. झकास मैफल रंगली त्यांच्यासोबत. खूप जोधपूर फिरलो आम्ही. सोबत डालबाटी आणि राजस्थानी मिठाई..!
त्याच्याकडून अगदी भरभरून ऐकायला मिळालं या गाण्याबद्दल.. आपल्याला आश्चर्य वाटेल, त्या अग्रवालांनी मला या गाण्याच्या एकूण ६ निरनिराळ्या चाली ऐकवल्या..!
जगणं सार्थकी लावतात असले अनुभव. अश्या छोट्या छोट्या प्रसंगातून जीवन समृद्ध होत जातं असं मला वाटतं
जोधपूर जवळ वीसेक किमीवर मंडोर नावाची बाग आहे. खरे तर ते एक स्मशान आहे. तिथे अनेकविध आकारात इमारतींच्या स्वरूपात समाध्या आहेत.बाग बर्यापैकी सुंदर आहे. पण तेथील एक विशेष म्हणजे राजस्थानी कलाकारांचे
लोकधून वादन. एका तंतूवाद्यावर ते इतक्या अप्रतिम जागा घेत ही " केसरिया ची मांड रागातील धुन वाजवितात की क्या कहने ? आपण तल्लीन होउन ऐकत रहातो. व आपण गाफील आहोत असे पाहून बानरे आपल्या वस्तू प़ळवितात.
या लेखाने तू चंदा मै चांदनी, ( रेश्मा और शेरा) या अप्रतिम गीताचीही याद आली.
एक विशेष म्हणजे राजस्थानी कलाकारांचे लोकधून वादन. एका तंतूवाद्यावर ते इतक्या अप्रतिम जागा घेत ही " केसरिया ची मांड रागातील धुन वाजवितात की क्या कहने ? आपण तल्लीन होउन ऐकत रहातो
अप्रतिम लेख...
मारू थारे देस में निपूजे तीन रतन
एक ढोलो, दूजी मारवन , तीजो कसूमल रंग
पधारो म्हारे देस..
या ओळी गायलेले
मारू थारे देस में निपूजे तीन रतन
एक ढोलो, दूजी मारवन , तीजो कसूमल रंग
पधारो म्हारे देस..
तात्या, लेख आणि प्रतिक्रिया वाचून फार आनंद झाला. शोभा गुर्टुंचे दोन वेगवेगळ्या मैफिलीतले 'केसरिया' माझ्या संग्रहात आहे. त्याची आठवण झाली. 'म्हारो प्रणाम' बाबत तुमच्याशी सहमत.
तात्या लेख नेहमीप्रमाणेच मस्त.
'केसरिया' हा शब्द विश्वास पाटलांच्या 'पानिपत' मध्ये वाचला आहे.
राजपुतांमध्ये सती जाण्यासारखी काहीतरी प्रथा होती त्याला हा शब्द होता असे वाटते.
'पानिपत' मध्ये जनकोजी शिंदे धारातीर्थी पडल्यावर त्याच्या पत्नीने केसरिया केल्याचा उल्लेख आहे.
कोणी जाणकार अधिक प्रकाश टाकु शकेल का?
पण तुमचे रसग्रहण वाचून मात्र प्रसन्न वाटले.
रजपुतांमध्ये परकिय आक्रमणात पराभव अटळ आहे असे वाटले की रजपुत वीर केसरी वस्त्र परिधान करून लढाईत आत्मसमर्पण करीत. त्याला केसरिया म्हणतात. केसरिया मध्ये जीव तोडून शत्रू सैन्यावर तुटून पडणे अभिप्रेत असते. स्वतःचा जीव रणांगणावर समर्पित करायचा असतो.
अशा सैनिकांच्या स्त्रीया चिता पेटवून त्यात आत्मसमर्पण करायच्या (शत्रू सैन्याच्या हाती पडून विटंबना होऊ नये म्हणून). त्याला जोहार म्हणत.
माझ्या समजुतीप्रमाणे राजपूत हे त्यांच्या किल्ल्याला शत्रूने वेढा घातला की शर्थ करून लढवीत आणि जर अन्न धान्य अथवा पाणी पुरे नाहीसे झाले तर शेवटच्या लढाई साठी किल्ल्यावरून खाली उतरत. त्यावेळी ते केसरी रंगाची पगडी अथवा फेटा बांधत आणि त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी जोहार करत. केसरी रंगाचा फेटा याला हे सांकेतिक महत्व आहे.
विसोबा खेचर यांच्या मूळ लेखात नायीका ही लढाई वर गेलेल्या म्हणजे (केसरी फेटा बांधलेल्या) शूर प्रियकराला बोलवत असल्याचा उल्लेख आहे. नंतर या गाण्यात पुढे जाउन नायिका प्रियकराला केशर लावून पाय धुण्याचे आश्वासन ही देते.
यावरून केसरीया बालमा याचा अर्थ केसरी फेटा ( किंवा पगडी ) परिधान केलेला प्रियकर असावा असे मी समजतो.
सर्वांचे मनापासून आभार.. रमेश आठवले, चौकट राजा, मनिम्याऊ, सौंदाळा, पेठकरसाहेब यांच्या प्रतिक्रिया माहितीपूर्ण..
अजूनही ह्या विषयात खूप काही अभ्यासपूर्ण कुणी काही लिहिल्यास स्वागतच आहे..
पुन्हा एकदा आभार..
तात्या.
प्रतिक्रिया
छान लेख! चीअर्स तात्या.
उत्तम लेख !!
याचा अर्थ पण सांगाल का?
मलाही नक्की आठवत नाही..
यावरून किशोरीबाईंचं
मला शोभा गुर्टूंनी गायलेलं
राजस्थान म्हटल की मला
छान ओळख
केसरिया
व्वाह
+१
मंडोर
एक विशेष म्हणजे राजस्थानी
आंबा मीठी आमरी,
अतिशय सुंदर... केवळ हे वर्णन
अप्रतिम लेख...
http://www.youtube.com/watch
लेख
सुरेख! मस्त गाण आहे हे.
तात्या लेख नेहमीप्रमाणेच मस्त
राजस्थानी प्रथा.
धन्यवाद
केसरिया पुन्हा
सर्वांचे मनापासून आभार.. रमेश