Welcome to misalpav.com
लेखक: सुबोध खरे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

बाबौ!! एक प्रश्नः ही घटना इंटरनेटपूर्व युगात घडलेली असावी. आता इंटरनेटच्या आगमनानंतर काही फरक पडला आहे का? ऑक्स्फर्ड टेक्स्टबुकावर अवलंबून न रहाता आंतरजालाचा वापर करून हा प्रसंग हाताळणं सुकर झालं असतं का? विमानवाहू नौकेवर इंटरनेट वापरायला परवानगी आहे का? --- तुमचे लेखन आवर्जून वाचतो. प्रतिसाद देतोच असं नाही. लिहीत रहा!

खूप छान! वेळेत योग्य उपचार होऊन त्या माणसाचे डोळे वाचले हे महत्त्वाचं. अवांतरः मागे एकदा एक सत्य घटनेवर आधारित पुस्तक वाचलेलं व्हाय नॉट आय- वृंदा भार्गवे (चुभू देघे) त्यात औषधाची रिअ‍ॅक्शन होऊन मुलीच्या डोळ्याच्या बाहुलीला पापण्या चिकटतात नि डोळे जातात. त्यानंतर तशा परिस्थितीत मुलगी जिद्दीनं शिक्षण पूर्ण करते अशी खूप प्रेरणादायक कथा आहे.

बापरे! किती विचित्र अपघात. इंटरनेटबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यास उत्सूक. अजूनही बॅटऱ्या तपासण्याची पद्धत तीच आहे? की डोळ्यांवर गाॅगल/चेहऱ्यावर मास्क घालून धोका कमी केला जातो?

समयसूचकता आणि धीरोदत्त स्चभाव. बहुतेक सगळेच डो़क्टर असे थंड डोक्याने (म्हणजे शांतपणे पण सगळ्य्सा विकल्पांचा विचार करुन) निर्णय घेणारे कसे होतात बुवा..!

अहो कसली समयसुचकता आणि धीरोदात्तपणा. सल्फ्युरिक आम्ल डोळ्यात गेले आहे हे कळल्यावर मला पण मती गुंग झाल्यासारखे झाले होते. कारण चेहऱ्यावर आम्ल उडाल्यामुळे भाजलेल्या केसेस मी बर्याच पाहिलेल्या होत्या. त्यामुळे सल्फ्युरिक आम्ल किती हानी करू शकते ते पाहिलेले होते. (सर्व साधारणपणे "मुलीच्या चेहऱ्यावर एसिड फेकले" यात हेच अमल असते) एवढेच आहे कि मी ते चेहऱ्यावर दिसू नये इतकी काळजी घेण्याचे कसब मिळवले आहे.शेवटी तुमचे मौलिक ज्ञान (fundamentals) अशा प्रसंगी कामाला येते हे जाणवल्यामुळे मी या काही प्रसंग नंतर परत पुस्तकांकडे वळलो आणि त्याचा मला आयुष्य भर फायदा होत आहे. मी काही जास्त न करता त्याचे डोळे सलाईन ने धुतले तेवढा वेळ मला विचार करण्यासाठी मिळाला. कोणतेही रासायनिक प्रदूषण किंवा भाजले असताना आपले शरीर ताबडतोब पाण्याने किंवा सलाईन ने धुवावे हा बालकपाठ मला मूळ शिक्षणात मिळालेला होत. अर्थात एक भाग म्हणजे माझे काम तणावाखाली जास्त चांगले होते. त्यामुळे रुग्णावर कोणतेही काम करताना अगदी रुग्णाच्या पाठीच्या मणक्यातील पाणी काढतेसुद्धा वेळी मी रुग्णाच्या नातेवाईकाला बाजूला उभे राहू देतो. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकाचे माझ्याबद्दल फारच चांगले डॉक्टर आहेत मत असे होते.

डॉक्टर ,तुमचे अनुभव नेहमी वाचतच असते. अचानक उद्भवणार्‍या आणि विचित्र परीस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे तुमचे कसब, थक्क करणारे आहे.

__/\__ दंडवतच.. काय जबरी अनुभव आहेत सगळेच.. बेश्ट..

बोट न लागण्यासाठी नेमका उपाय काय करावा? भरपूर पाणी की काहीच न खाणे..? कुठल्या जागी बोटीवर बसू नये/ बसावे?

बॅटरीतील सल्फयूरिक आम्लामुळे झालेली २५ एक वर्षांपूर्वींची घटना: ही घटना व्यापारी बोटीवरची आहे. शनिवारचा दिवस होता. जहाज जर लांबच्या प्रवासात असेल तर शनिवारी नॉर्मली दिवसा काम करणारे अधिकारी जेवणा नंतर सुट्टि घेतात. सकाळचे ११.३० झाले होते. जहाजावरचा इलेक्ट्रिशियन ह्याच दिवशी बोटीच्या आपातकालिन ब्याटर्‍या चेक करणे चार्ज करणे अशी आठवड्याची कामे करतो. असेच मी व बत्तीसाब (इलेक्ट्रिशियनचे बोटीवरचे टोपणनाव) बॅटरी रुममधे गप्पा मारत होतो. त्याचे सल्फयूरिक आम्लाची घनता बघून झाली होती. त्याने बोलता बोलता त्याचे ढुंगण ब्याटर्‍यांच्या शेल्फवर टेकवले. बोलण्याच्या नादात १२ कधी वाजून गेले ते कळलेच नाही. १२ वाजता जेवणाची सुट्टी होते. आम्ही बॅटरी रुममधले काम आटोपते घेतले आणी बाहेर डेकवर आलो. बत्तीसाब बोल्ला किती गार वारा आहे. मी बघितले तर त्याच्या बॉयलरसूटची ब्याकसाईड आतल्या चड्डीसकट गायब झाली होती!! त्याने जिथे कुल्ले टेकवले होते त्यावर अ‍ॅसीड्चा स्प्रे बसला होता, आणी त्यामुळे कॉटनच्या बॉयलरसूटचा चक्क भुगा झाला होता

खरे साहेबान्च्या लेखाची मी चातकासारखी वाट पहात असतो. काय नसत या लेखान्मधे. मी तर खरे साहेबाना मीपा चा स्टार समजतो. माझे नम्बर एक चे आवड्ते लेखक. त्यान्चा एक एक लेख मला सम्रुद्ध करतो.