होना. पण आपलं तंत्रज्ञान कितीतरी मागे आहे. अजूनही आपल्याल कादम ऋषींप्रमाणे हरिणाचं रूप घेऊन हरिणीशी कामक्रीडा करता येत नाहीत. किंवा इंद्राने कुठच्यातरी ऋषीचं रूप घेऊन त्याच्या बायकोबरोबर हवं ते करता येत नाही.
हे असलं सं-शोधन मांडणार्यांच्या बाबतीत एक गोष्ट कायम बघण्यासारखी असते, ती ही... की, जेंव्हा आधुनिक विज्ञानात एखादा शोध लागतो,तेंव्हा त्याची संगती हे लोक प्रचीन ज्ञानात हुडकतात...पण त्याच आधुनिक शोधाचा पुढचा टप्पा या आधिच-तयार असलेल्या ज्ञानातुन शोधुन दाखवा म्हटलं..की यांची दातखिळ बसलीच!!!
कोण तांबे ? पिचुफेम बालाजी तांबे का ?
एक नंबरचे सेल्स्मन वाटतात ते ... देवकण देवाला विकुन येतील ...(अन आमच्या घरी त्यांना जणु धन्वंतरीचा अवतार मानतात )....डोक्याला शॉट नुसता.
डोक्याला शॉट लागणे ह्या प्रकारावर काही आयुर्वेदिक/वैदिक version 2013 औषध आहे असे मी पत्र पाठवुन त्यांनाच विचारणार आहे !!
वेद श्रेष्ठ आहेतच. निर्विवाद ! पुराणात अनेक गोष्टींचे संदर्भ आढळतात ज्या आपण आत्ता बघतो. पण मानवाची जिज्ञासा, मानवाचं कुतुहल हे उत्तरोत्तर वाढतच गेलं आहे. आणि त्यामुळे आधुनिक विज्ञानाने वेध घेतलेल्या अनेक गोष्टींचा वेध वेदांनी घेतलेला नाही असंही चित्र आहे. त्यामुळे कुण्या एका पारड्याला जड म्हणता येणार नाही.
आवरा ह्या प्सुडोसायन्सला ... ह्या असल्या लेखांमुळे चर्चांमुळे असली नसलेली श्रध्दाही सम्शयाच्या फेर्यात येते .
मान्य करा की वैदिक लोक सामान्य माणसं होती तुमच्या आमच्या सारखी ...रादर आपल्यापेक्षा कमी प्रगत भौतिक जगात .
पण त्यांनी लिहिलेले वेद , महाकव्य अप्रतिम साहित्य कृती आहेत , , उपनिषदे ,षडदर्शन क्लासिकल फिलॉसॉफी आहे !!
येवडं पुरेसं नाही का ?
उगाचच कशाचा संबंध कशाशीही लावण्यात काय मिळतं लोकांना देव जाणे !
पूर्वज प्रगत होते का नाही, हा वादाचा मुद्दा का असावा?
अजून हि बऱ्याच प्राचीन गोष्टीचे अर्थ व कारणमीमांसा करणे आपल्याला जमले नाही
उदाहरणार्थ पिरामिड : बांधणी & आतली वातावरण निर्मिती.
मायन संस्कृती च्या खगोल अभ्यासा बद्दल हि तेच.
२-४ हजार वर्षां नंतर आपल्या बद्दल हि असेच वाद होतील कदचित.
(त्यानाही रिकामा वेळ असेल तर :) )
धन्यवाद घाट्पान्डे साहेब,आपल्या वरिल वर्णनावरुन पु ल च्या,पानवाला या कथा कथनाची आठ्वण झाली,जसे आपण वेद कालात आहोत आणि आश्रमात (होटेलात) बसुन मिसळपाव चा आस्वाद घेत आहोत्,झोपुन उठलेले बट्ट मण्ण,मिसळ कधी मिळ्ते याची वाट पहात आहेत्,कार्यकर्ते साहेब मिसळ पावा ऐवजी भाकरी बरोबर अधिक चान्गली लागते अशी चर्चा करण्याचा विफल प्रयत्न करत आहेत.
@मिसळपावचा ही उल्लेख वेदात आहे. शोधा म्हणजे सापडेल.>>> =)) अहो ,म्हणजे काय? आहेच! =)) मिसळ कशी करावी? याचा अख्खा सं स्कृतात विधि आहे...
हरि: औम--- आचम्य...प्राणानायम्य... देश(भुक)कालौ संकिर्त्य ;) ..संकल्पः-मम आत्मनः आद्य खाद्य फलप्राप्त्यर्थं...उदरभरणार्थं तथा शीघ्रगत्या करंटप्राप्त्यर्थं... तर्रीसहित मिसळं करिष्ये। करिष्यमाण करंट-पाक-कृत्या>>>आदौ निर्विघ्नता सिध्यर्थं अर्धांगिनी स्मरणं ;) च करिष्ये॥
क्रमशः.............
बाकिचा विधि रात्री देणेत येइल...
हे असलं लेखन,मानवताधर्म वर्धक म्हणजेच धर्मशास्त्र-विरोधी आणी त्यामुळे पर्यायानी पा-खांडी... असल्यामुळे
स्वाभाविकच त्याला लिहिण्याचा खरा करंट रात्री(च) येतो... :-p
400 ग्राम गोमूत्र की बैटरी से 3 वाट का बल्ब 400 घंटे तक जलाया जा सकता है। 12 बोल्ट की इस ‘गो- ज्योति बैटरी’ से मोबाइल भी चार्ज हो सकता है।
इसे कानपुर (उत्तरप्रदेश) की गौशाला में बनाया गया है। इसे बिजली से चार्ज करने की जरूरत भी नहीं होती। कानपुर गोशाला के महामंत्री पुरूषोत्तम तोषनीवाल के प्रयासों से यह सब संभव हुआ है।
तोषनीवाल के अनुसार यह बिजली का वैकल्पिक साधन बन सकती है। तोषनीवाल ने दावा किया है की बिजली से चार्ज होने वाली बैटरियां 5-6 घंटे तक ही काम करती हैं, जबकि गौ- ज्योति बैटरी 400 ग्राम गो-मूत्र से 400 घंटे तक चलती है।
मध्यप्रदेश उर्जा विकास निगम ने इस बैटरी को परीक्षण के लिए भोपाल के राजीव गांधी विश्वविद्यालय में भेजा था। परीक्षण में 400 घंटे में मात्र 3 फीसदी वोल्ट कम हुआ। इससे 12 घंटे तक मोबाइल चार्ज करके भी देखा गया।
तोषनीवाल के अनुसार इस गौ- ज्योति बैटरी की लागत 3500 रूपये आती है। उतराखंड सरकार ने अपने कई दफ्तरों में इसका उपयोग करना शुरु कर दिया है। छत्तीसगढ़ सरकार भी कार्यालयों में उपयोग के लिए बैटरी खरीदने वाली है...
इथे सापडला.
असल्या होक्सेस आंतरजालावर सतत भटकत असतात. कोण्या एका तोषनीवालचा बदला घेण्यासाठीसुद्धा हे कुणी केल्याची शक्यता आहे. किंवा बातमीला खरेपणाची झलक देण्यासाठीही कपोलकल्पीत तोषनीवाल निर्माण केल्याची शक्यता आहे.
आजकाल आंतरजालावर हा उद्योग फार भरभराटीस आला आहे ;)
आपल्याला काय! करमणूक झाली की हसायचं, पुढचं पान.
असाच आणखी एक फेकू गडी फेसबुकावरूनच सापडला होता, हा पहा:
http://www.youtube.com/watch?v=I9aR_xfm-gE
हा बावाजी आयायटीत गणित शिकलेला आहे. काही वेळा गणितातल्या संकल्पनाही उत्तमरित्या सांगतो; म्हणून त्याच्या थापा आणखीनच धोकादायक वाटतात.
होक्सेस नसावे असे टाईम्स मधील बातमी वाचल्यावर वाटले...
University develops simple apparatus that generates energy from cow's urine
V Senthil Kumaran, TNN May 16, 2013, 04.10AM IST
Tags:
Dr V Ramesh Saravana Kumar|
cow's urine
NAMAKKAL: With the entire state reeling under a severe power crisis, especially the rural areas, the department of livestock production and management at the Veterinary College and Research Institute in Namakkal has come up with a simple electricity generating apparatus whereby farmers will be able to generate energy from cow's urine.
Talking to TOI, head of the department Dr V Ramesh Saravana Kumar said the apparatus is based on a simple scientific principle and will be able to generate 10 volts of electricity continuously for 120 hours (five days) from two litres of cow urine. "All we need is 10 to 12 plastic cups, each filled with 200ml of urine, thin copper plates as the positive poles and a thin zinc plates as negative poles. One needs to spend just Rs80 to setup the apparatus," he said.
Describing the apparatus Ramesh said the positive and negative poles in the cups are connected by single core wires or hook-up wires that form two separate networks. The two output wires can be connected to any desired device. "When copper and zinc plates come in contact with uric acid movement of electrons begin, generating electricity. The output dips after five days, when the urine has to replaced," he added.
With the help of the model, college students demonstrated that five wall clocks and a zero watts bulb can be operated simultaneously. "While electricity can also be generated from urine of other cattle, cow's urine is used as it is abundantly available. A cow can produces 16 to 20 litres of urine every day. Proper collection of urine from cows can help farmers generate more electricity," Ramesh said.
Ramesh said the pungent urine smell can be avoided by keeping the apparatus outdoors and using a long wire to connect it to the output device. He said the apparatus was a boon for children residing in rural areas as connecting it with an LED bulb, like the ones used in powerful torches and positioning them properly can provide hours of light for study.
A bigger model can be used to light up an entire house, including the cow shed. Farmers, who have already seen the model, have appealed to technical institutions to generate bigger and more efficient models with provisions to store electricity.
बाकी मूळ चर्चा प्रस्तावासंदर्भात इतकेच म्हणेन की ज्यांना असे संशोधन करायचे असेल त्यांनी ते करावे. नुसतेच नंतर सद्यकालीन विज्ञानातील घडामोडींशी नवीन काही अस्तित्वात आल्यावर सांगड घालत बसू नये, जे चर्चा प्रस्तावात जाणवले. असो.
यात नवीन काहीच नाहिये. हा या video मध्ये दाखवल्यासारखा प्रकार आहे. कोणतेही दोन वेगळे standard electrode potential असलेले धातू आणी electrically conductive solution वापरुन हे करता येते. zinc आणी copper वापरल्यावर zinc oxidize होतो आणी या oxidation प्रक्रियेतून मुक्त झालेली उर्जा electricity च्या रूपात मिळते (electrolyte आहे तसेच राहते). गंमत अशी आहे की zinc तयार करताना हीच प्रक्रीया याउलट वापरलेली असते, त्यामुळे प्रत्यक्षात काहीच फायदा होत नाही.
आणी वरील बातमी ज्याने लिहीली आहे त्याला electeical ची जुजबी माहिती देखील नाही अस वाटतय. 10 volts of electricity हा काय प्रकार असतो?
यात नवीन काहीच नाहिये.
बहुतेक माझा प्रतिसाद नीट वाचला नसावात, कारण मी कुठे तसे म्हणले आहे? मी त्याचा वेदांशी अथवा कशाचीच संबंध लावलेला नाही. फक्त आधी ज्या पद्धतीने ती बातमी दिली गेली त्यावरून हे विज्ञान होते का अज्ञान हे पहाण्यासाठी म्हणून उत्सुकतेपोटी गुगलले तर टाईम्स मधील गेल्या २-४ दिवसातीलच बातमी मिळाली.
आणी वरील बातमी ज्याने लिहीली आहे त्याला electeical ची जुजबी माहिती देखील नाही अस वाटतय. 10 volts of electricity हा काय प्रकार असतो?
"10 volts of electricity" असे वाक्यात म्हणत नाहीत असे म्हणायचे आहे का? उत्तर कळल्यास अजून समजावून सांगेन. :)
प्रतिसाद त्यांनाच दिला होता, तुम्हाला नाही. म्हणून तर तो तुमच्या प्रतिसादाखाली त्याच ठिकाणी आहे, अजून टॅब मिळून आत गेलेला नाही. (जसा हा प्रतिसाद आतल्या बाजूस दिसेल तसा). :-)
@ विकास : आपण याचा वेदांशी संबंध लावत आहात असे मला म्हणायचे नव्हते. तसे ध्वनीत होत असेल तर ती माझी वाक्यरचनेतील चूक म्हणावी लागेल.
आता थोडे सविस्तर लिहीतो. खाली लिहीलेले आपल्याला उद्देशून नाही, times मधील बातमी आणी आदितीने दिलेली fb link यावर भाष्य आहे. मूळ बातमीत म्हटल्याप्रमणे
the apparatus is based on a simple scientific principle and will be able to generate 10 volts of electricity continuously for 120 hours (five days) from two litres of cow urine. "All we need is 10 to 12 plastic cups, each filled with 200ml of urine, thin copper plates as the positive poles and a thin zinc plates as negative poles.
हे वर्णन आणी मी याआधी दिलेल्या विडियो मधील लिंबे वापरून electricity तयार करणे हे एकाच तत्वानुसार काम करतात. किंबहुना सगळे electrical cells याच तत्वानुसार काम करतात. स्वस्त 1.5V batteries zinc आणी manganese dioxide हे electrodes म्हणून आणी ammonium chloride किंवा zinc chloride electrolyte म्हणून वापरतात. alkaline 1.5V batteries सुद्धा zinc आणी manganese dioxide हे electrodes म्हणून आणी potassium hydroxide electrolyte म्हणून वापरतात. (potassium hydroxide is alkaline, hence the name). सर्व rechargble batteries (lithium-ion, lithium-polymer, lead-acid, nickel-metal hydride, nicket-cdmium etc.) सुद्धा हेच तत्व वापरतात. फरक इतकाच असतो की यात electrodes आणी electrolytes असे निवडलेले असतात की जी chemical rection electricity तयार करते ती reaction reversible असते. ही प्रक्रिया बहुतेक ४००० वर्षांपासुन माहीत आहे आणी कदाचीत electroplating साठी वापरली गेली असावी. (see : Baghdad Battery )
बातमी वाचून मलातरी अस वाटतय की त्यांचे काम एखाद्या ७-८ वी मधील मुलाने विज्ञान प्रदर्शनात केलेल्या प्रयोगाच्या दर्जाचे आहे.
With the help of the model, college students demonstrated that five wall clocks and a zero watts bulb can be operated simultaneously.
हे विज्ञान प्रदर्शनात ठीक आहे पण जर हे जास्त गांभिर्याने घ्यायचे असेल तर या controlled experiments ची गरज आहे. जर तसे controlled experiments केले असतील तर "college students demonstrated that five wall clocks and a zero watts bulb can be operated simultaneously" हे वाक्य बातमीत आलेच नसते. त्यांनी जे काही केले आहे ते वर्तमानपत्रात छापून आणणे म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्यातला प्रकार आहे.
आणी यात गोमूत्र फक्त electrolyte म्हणून आहे. त्याऐवजी इतर कुठल्याही प्राण्याचे (not only cattle as the article says), माणसाचे पण, मूत्र वापरून हेच करता येइल.
हा प्रयोग Veterinary College च्या लोकांनी केला आहे, त्यामुळे कदाचीत त्यांना यातील बर्याच तांत्रिक बाबी माहीत नसतील आणी त्यांनी जे काही केले आहे ते प्रामाणीक हेतूने केले असावे पण होत काय, यामुळे काही लोकांना propoganda साठी कच्चा माल मिळतो. वर आदितीने दिलेली facebook वरील post याचेच उदाहरण आहे. त्या post मध्ये म्हटल्याप्रमाणे
400 ग्राम गोमूत्र की बैटरी से 3 वाट का बल्ब 400 घंटे तक जलाया जा सकता है। 12 बोल्ट की इस ‘गो- ज्योति बैटरी’ से मोबाइल भी चार्ज हो सकता है।
थोडक्यात, त्या battery मधील stored energy 1200 W.Hr आहे असा दावा आहे. तुलनेसाठी laptop batteries 30-60 W.Hr च्या मध्ये असतात (laptop च्या आकारानुसार), car batteries पण याच range मध्ये असतात. माझा common sense मला सांगतो की 400 gram गोमूत्रातून एव्हढी उर्जा मिळवणे शक्य नाही पण बर्याच लोकांना हा fact check शक्य नसेल आणी ते या बातमीवर विसंबून राहू शकतात. तुम्हालाही हा hoax नसावा असे वाटले होते. असाच आणखी एक hoax video.
now about "10 volts of electricity"
10 volts of electricity असे वाक्यात बहुतेक म्हणू शकतो, बर्याच ठिकाणी मी असे वापरलेले बघीतलेले आहे. I think it is little lousy to say as electricity comprises of many physical phenomena associated with the presence and flow of electric charge such as electric charge, electrical field, electric current, electric potential etc. मी स्वतः "batterie's voltage is 10" or "battery is at 10V" असे म्हणेन पण कदाचीत मी जास्त छिद्रान्वेशी बनतोय, 10 volts of electricity असे बोलणे सुद्धा बहुतेक ठीक ठरेल. माझा आक्षेप थोडा वेगळा होता.
10 volta of electricity ने काहीच उपयुक्त माहिती मिळत नाही. त्यासाठी त्या battery ची capacity द्यायला पाहिजे (W.Hr मध्ये किंवा mA.Hr@V). एक उदाहरण द्यायचे झाले तर हा cell आणी हा cell यांचे voltage सारखेच आहे पण दुसर्याची capacity पहिल्यापेक्षा २.५ पट जास्त आहे. थोडक्यात दुसरे cells जर कॅमेर्यामध्ये वापरले तर जवळपास २.५ पट फोटो काढता येतील. ही उपयुक्त माहीती आहे, दोन्ही cells चे voltage 1.2V आहे ही नाही. (यात आणखी काही parameters असतात, maximum rate of discharge, internl resistance etc., पण सध्या ते बाजुला ठेवू)
"10 volts of electricity हा काय प्रकार असतो?" हे माझे वाक्य खरेतर "why are you giving me useless information?" या उद्वेगातून होते.
२५०० mA.Hr च्या cell ची link द्यायची विसरलो. (शेवटून दुसरा परिच्छेद).
http://www.all-battery.com/aa2500mahhighcapacitynimhrechargeablebattery10320.aspx
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमच्या तांत्रिक विश्लेषणाशी बहुतांशी सहमत पण तो मुद्दा नव्हताच.
तुम्हालाही हा hoax नसावा असे वाटले होते.
पण आधी जे काही संदर्भ-प्रतिसाद होते त्यात चारशे ग्रॅम गोमूत्र आहे का ४ लाख वोल्टेज आहे यावर तांत्रिक चर्चा चालू नव्हती आणि त्यांनी जर येथे स्पष्टीकरण दिले तर गोष्ट वेगळी आहे, पण नाहीतर केवळ गोमूत्र म्हणजे काय सनातनी, गोमाता करत फिदीफिदी हसण्याचाच मुद्दा इतकेच त्यात उर्धृत होत होते असे वाटण्यासारखी परीस्थिती आहे.
आता जे काही लिहीत आहे ते गोमुत्राचा, वेदांचा अथवा गोमुत्रावर चाललेल्या बॅटरीच्या डिफेन्ससाठी नसून नक्की आपण हसत असताना सगळे बघात असतो का या संदर्भात आहे...
गोमूत्राचा वापर संशोधनासाठी करण्यावरून आधी हसण्यावारी नेले गेले होते ज्यात तशा संशोधनासच होक्स म्हणले गेले होते. आता चर्विचर्वण करतच आहोत म्हणून व्याख्येपासून जाऊयात, Hoax means something that has been established or accepted by fraudulent means. पण मग एक प्रश्न पडला की, The National Council of Rural Institutes was established by the Government of India in 1995 पण हे संशोधन ग्राह्य का धरत असावेत का? Naturebased livelyhood development या त्यांच्या संस्थळावरील प्रेझेंटेशनमधे (पान ४-५) मधे २५० मिली गोमूत्र हे ४०० तास लाईट अथवा मोबाईल चार्जर साठी वापरता येते असे लिहीले आहे ते का लिहीले असावे. इतरत्र देखील या संदर्भात असेच म्हणलेले दिसले. यातील लाईट हा एल ई डी असतो हे काही ठिकाणि लिहीलेले आढळले...१२ व्होल्ट ऐवजी ३ व्होल्ट देखील वाचलेले आहे. तीन व्होल्टस चा संबंध हा दोन AA बॅटरींवर चालणार्या लहान एल इ डी बल्बशी आहे. त्यामुळे देखील मला त्याला अजून होक्स म्हणवत नाही....
आता तुम्ही जे काही लॅपटॉपच्या बॅटरीशी तुलना करून असे होणे शक्यच नाही असे म्हणत आहात ते काहीसे पटत नाही. कारण त्यात आय बी एम च्या थॉमस वॅट्सनने १९४० च्या दशकात जे काही संगणकांच्या आवशक्यतेवरून "I think there is a world market for about five computers." म्हणले होते तसेच काहीसे वाटते. असो. तरी देखील एक लक्षात घेतले पाहीजे की लॅपटॉप बॅटरी जशी काँपॅक्ट असते तशी ही गोमूत्र बॅटरी नाही... थोडक्यात अजून तरी (लॅपटॉप बॅटरीपुढे) मोठीच आहे..
टाईम्स मधे दिलेल्या बातमीच्या आणि त्यावरील तुमच्या विश्लेषणासंदर्भात काही उत्तरे
बातमी वाचून मलातरी अस वाटतय की त्यांचे काम एखाद्या ७-८ वी मधील मुलाने विज्ञान प्रदर्शनात केलेल्या प्रयोगाच्या दर्जाचे आहे.
आय विश... म्हणजे त्यांचे संशोधन फार मोठे आहे असे म्हणायचे नाही. त्या संदर्भात मी सहमत आहे. पण आपल्याकडे सातवी-आठवीतील मुलांना प्रयोगशाळेत किती हात लावून देतील याचा विचार आला. संशोधन लांबच राहूंदेत. त्याव्यतिरीक्त क्लासेस सोडून असे प्रयोग करण्यात किती मुले "वेळ वाया घालवतील" हा अजून एक मुद्दा आहेच. :( त्यामुळे कॉलेजातील विद्यार्थ्यांचे कौतूक होते.
आणी यात गोमूत्र फक्त electrolyte म्हणून आहे. त्याऐवजी इतर कुठल्याही प्राण्याचे (not only cattle as the article says), माणसाचे पण, मूत्र वापरून हेच करता येइल.
मला वाटते तसे त्या बातमीत देखील म्हणले आहेच... फक्त गोमुत्राची उपलब्धता ही खेड्यापाड्यात इतर प्राण्यांच्या मुत्राच्या उपलब्धतेपेक्षा कित्येक पटीने अधिक असल्याने त्यावर भर दिला जात आहे. म्हणूनच असे संशोधन करणारे उत्तर -दक्षिण सर्वत्र दिसून येतील.
मी स्वतः "batterie's voltage is 10" or "battery is at 10V" असे म्हणेन पण कदाचीत मी जास्त छिद्रान्वेशी बनतोय,
सहमत. :) जे वाक्य जगार इतरत्रही वापरले जाते त्यावर केवळ येथेच टिका करत चर्चा भरकटवण्याचे कारण काय?
त्याव्यतिरीक्त काही सर्वसाधारण कॉमेंट्स...
१. टाईम्सच काय एकंदरीतच ज्या पद्धतीने बातम्या दिल्या जातात ते बघून खिन्न होयला होते...
२. आपल्याकडे पाश्चात्य पद्धतीने वैज्ञानिक प्रयोग करण्याची सवय अथवा माहिती ही तळागाळापर्यंत जाउंदेत सर्वसामान्यांपर्यंत पोचलेली आहे असे म्हणायची अवस्था नाही. त्याचे परीणाम सर्वत्रच दिसून येतात. त्यामुळे तुम्ही केलेल्या टिकेतील काही भाग या संदर्भात बरोबरच आहे पण त्यामुळे ते होक्स ठरत नाही असे मात्र वाटते.
तुमच्याशी बहुतांशी सहमत आहे. काही मुद्यांवर थोडे अजून स्पष्टीकरण देतो.
ग्रामीण भागात जर जवळपास उपलब्ध असणार्या साधनसंपत्तीचा वापर करून काही inovative होत असेल तर त्याचे स्वागतच आहे, परंतु म्हणून काय वाट्टेल ते दावे करु नयेत. यात दोन प्रकार असू शकतात. एक म्हणजे समाजासाठी काहीतरी खरच करायची इच्छा, परंतू तांत्रिक माहितीच्या अभावे चूका किंवा अवास्तव दावे. हे क्षम्य आहे. या व्यक्ती जर प्रामाणिक असतील तर चुका लक्षात आल्यावर त्या सुधारतील. दुसर्या प्रकारातील धोकादायक व्यक्ती म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी मुद्दामून चुकीचे दावे करणे. Ramar Pillai यात येतो. fb ची post ज्याला तुम्ही पहिला प्रतिसाद दिलात तीपण याच प्रकारात मोडते. अशा प्रकारचे अवास्तव दावे केले की जे काही थोडेफार शक्य असते ते पण संशयाच्या घेर्यात सापडते आणी हळुहळु लांडगा आला रे आला प्रमाणे वर तुम्ही म्हटल्याप्रमाणे "पण नाहीतर केवळ गोमूत्र म्हणजे काय सनातनी, गोमाता करत फिदीफिदी हसण्याचाच मुद्दा इतकेच त्यात उर्धृत होत होते असे वाटण्यासारखी परीस्थिती आहे." अशी परिस्थिती निर्माण होते.
Hoax : माझ्या मते खालीलप्रमाणे
१) गोमुत्रापासून वीजनिर्मिती : शक्य (hoax नाही)
२) त्या वीजेने एखादा दिवा लावणे : शक्य (hoax नाही)
३) त्या वीजेने mobile charge करणे : तांत्रिकदृष्ट्या शक्य, पण बहुतेक impracticle (but still not a hoax)
४) ४०० gram गोमुत्रापसून १२०० W.Hr उर्जा : definately hoax (स्पष्टीकरण खाली आहे)
लॅपटॉपच्या बॅटरीशी तुलना : लॅपटॉपच्या बॅटरीशी तुलना करण्याचा उद्देश थोडा वेगळा होता. त्या fb post प्रमाणे गोमुत्र बॅटरी १२०० W.Hr उर्जा पुरवते. ४०० gram गोमुत्रापासुन हे शक्य नाही (unless it is stone soup type of thing). लॅपटॉपच्या बॅटरीची क्षमता देण्याचा उद्देश हा होता की ज्यांना १२०० W.Hr हे interpret करता येणार नाही त्यांना तुलनेसाठी सध्याची best technology काय करु शकते ते कळावे. गोमुत्र बॅटरी लॅपटॉपच्या बॅटरीइतकी लहान आणी compact नसेल, पण ४०० gram electrolyte असणारी बॅटरी असुन असुन किती मोठी असेल? ही बाजारात उपलब्ध असणारी ~११०० W.Hr ची बॅटरी, जवळपास १० किलो वजन आहे. या विशिष्ट बॅटरी ची link देण्याचा उद्देश हा आहे की ही battery technology हलकी आहे, याच क्षमतेची lead-acid बरीच जड असेल. so, unless proven otherwise ४०० gram गोमुत्रापसून १२०० W.Hr उर्जा is Hoax. पहिले दोन दावे मान्य आहेत. कदाचीत अजुन काही वर्षांनी ५०० gram वजनाची १२०० W.Hr बॅटरी येइलही, graphene मध्ये potential आहे, पण आजतरी ते शक्य नाही.
तुम्ही दिलेले presentation वाचले. त्यात काहीच बारकावे नसल्यामुळे जास्त भाष्य करणे शक्य नाही. परंतु काही वाक्ये उदा. "Requires no engineering & mechanics", "No acid, distilled water etc are used", "Normal mobile charger is used" असे दर्शवतात की कदाचीत हे काम करणारी व्यक्ती मी वर म्हटल्याप्रमाणे पहिल्या प्रकारात येत असावी.
मी स्वतः "batterie's voltage is 10" or "battery is at 10V" असे म्हणेन पण कदाचीत मी जास्त छिद्रान्वेशी बनतोय,
सहमत. smiley जे वाक्य जगार इतरत्रही वापरले जाते त्यावर केवळ येथेच टिका करत चर्चा भरकटवण्याचे कारण काय?
याविषयी थोडे स्पष्टीकरण देतो. ते वाक्य तुम्ही किंवा मिपा वर इतर कोणीही वापरले असते तर काहीच हरकत नव्हती, मी अजिबात आक्षेप घेतला नसता. आपण रोज बर्याच ठिकाणी असे करतो. समांतर उदाहरण द्यायचे झाले तर मला कोणी माझे वजन विचारले तर मी ६० किलोच सांगीन, ५८८ Newton असे सांगून विचारणार्याला वजन हवे का वस्तुमान असा प्रतिप्रश्न करणार नाही. किंवा कोणी जर पाककृती विभागात "काय छान गोल पराठा लाटला आहे" अशी प्रतिक्रिया दिली की त्याखाली "या आकाराला वर्तूळ म्हणतात, गोल नाही" अशी प्रतिक्रिया देणार नाही.
पण मूळ बातमी ही एका शोधाबद्दल आहे. त्यात scientific rigor ची अपेक्षा ठेवणे चूक नाही. आणी मूळ आक्षेप हा 10 volts of electricity ने काहीच उपयुक्त माहिती मिळत नाही, आणी जो ती माहिती देतो आहे त्याला ते समजतच नाहिये, हा आहे.
किंबहुना या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्ही जे बोलत आहात की नुसती पोपटपंची करत आहात ते दर्शवतात (and sometimes it can go terribly wrong). "10 volts of electricity" किंवा "five wall clocks and a zero watts bulb can be operated simultaneously" यासारखी lousy वाक्ये scientific community मध्ये विश्वासार्हता घालवतात आणी वर म्हटल्याप्रमाणे लांडगा आला रे आला होतं.
लहान तोन्डी मोठा घास घेत आहे,पण माझ्या माहिती नुसार बाजारात मिळणार्या Battery ह्या watt/Hr या वर नाहित तर AH rating वर मिळ्तात जसे 12V 7AH etc.,तसेच त्यान्नी वरिल छायाचित्रात दाखव्लेला बल्ब हा 3 W LED Bulb,aahe तेव्हा तो बल्ब त्यान्नी सन्गित्ल्या प्रमाणे ४०० तास चालु शकतो कारण त्यात inbuilt inverter circuit असते, बाकी विकास यानी म्हट्ल्या प्रमाणे मी सहमत आहे.
watt hr आणि Ampere hr ही दोन्ही मापने मझ्या माहिती प्रमाणे वेगवेगळी आहेत्,जसे आपल्या घरात असलेली वीज मापके (electrical meters) ही माझ्या मते KW/Hr असतात,आणि Battery Capacity हि Ampere /Hr मध्ये असते,ईथे आपल्याला Watts calculate करावे लागते. तसेच मराठीप्रेमी यान्नी सुद्धा २५०० mA.Hr च्या cell ची link अशी दिली होति बाकी यात काही चुक असेल तर स्पस्तिकरण द्यावे म्हणजे आमच्या ज्ञानात भर पडेल.
रोजच्या वापरातल्या बॅटरीज, ज्यांना आपण पेन्सिल सेल म्हणतो, त्यातल्या रिचार्जेबल प्रकारच्या बॅटरीजवर mAh असं एकक दिसतं. एक उदाहरणः
छोटे कॅमेरे वापरणार्यांना अशा बॅटरीज निश्चितच माहित असतील.
ठराविक बॅटरी पॅकमधून किती पावर तासाला मिळेल ते kW·h (किंवा W·h) मधे रूपांतरीत करतात नॉमिनल काही अवरोध (resistance) किंवा उपकरणाला लागणारं व्होल्टेज पकडून गणितं केली जातात.
घरात वापरली जाणारी मापकं kW·h या एककात मापन करतात, kW/Hr नव्हे. SI एककांमधे हे एकक रूपांतरीत केल्यास 3600 Joule असं उत्तर येतं. एका तासाला वापरली जाणारी पावर म्हणजे kW·h. घरच्या वीजेच्या बिलात किती 'युनिट' वीज वापरली ते दिसतं, ते हेच एकक, kW·h
(किलोचा k हा नेहेमी small case वापरण्याची पद्धत आहे.)
प्रतिक्रिया
होना. पण आपलं तंत्रज्ञान
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
लै भारी.
आज चेहेय्रा वरिल किंवा वरिल
हे असलं सं-शोधन मांडणार्
कशाला त्रास करुन घेताय कात्रे
+१ करेक्ट!
सर्नला देवकण सापडल्यावर
कोण तांबे ?
वेद श्रेष्ठ आहेतच. निर्विवाद
आवरा
पूर्वज प्रगत होते का नाही
मिसळपावचा ही उल्लेख वेदात आहे
नसेल तर
अथातो ब्रह्म(मिसळ) जिज्ञासा,
@मिसळपावचा ही उल्लेख वेदात
बाकिचा विधि रात्री देणेत येइल...त्याला लिहिण्याचा खरा करंट
आत्म्या, हसवून मारतोस काय रे
त्यातून काही बोध घेवून काही
आगागागागा...
फेसबुकावर सापडलेला आणखी एक मोती
आयला, भारीये.
खो खो खो...
करमणूक महत्त्वाची
तसे नसावे...
यात नवीन काहीच नाहिये. हा या
मराठीप्रेमीसाहेब
मी कुठे तसे म्हणले आहे?
विकास
प्रतिसाद
@ विकास : आपण याचा वेदांशी
२५०० mA.Hr च्या cell ची link
सविस्तर प्रतिसादाबद्दल
तुमच्याशी बहुतांशी सहमत आहे.
उत्तम
धन्यवाद
मराठीप्रेमीसाहेब
watt hr आणि Ampere hr ही
थत्ते साहेब
Ampere-hr ला बॅटरीच्या
watt-hr हे अधिक योग्य युनिट
watt-hr हे अधिक योग्य युनिट
रोजच्या वापरातल्या बॅटरीज,
धन्यवाद,
जौंद्या हो ही नॉनष्यांडर एककं
KW/Hr असं काही नसतं बहुधा.
मान्य
Pagination