पाककृती

स्विट अँड स्पायसी चिकन विंग्स

Primary tabs

साहित्यः

चिकन विंग्स - १०-१२
आले-लसुण - बारीक चिरुन १-१ चमचा
सोया सॉस - २ चमचे
व्हिनेगर - १ चमचा
रेड चिली सॉस - २ चमचे
काळि मिरी पावडर - १ चमचा
स्विट अँड स्पायसी रेड चिली सॉस - २ चमचे
टोमॅटो सॉस - १ चमचा
ब्राउन शुगर - १ चमचा
तिळ - १ चमचा
Red chilly flakes - १/२ चमचा
तेल - १ चमचा
कांद्याची पात सजावटीसाठी
मिठ चवीनुसार

कृती:

१. चिकन विंग्सचे ३ तुकडेकरुन एका बाऊल मधे काढुन घ्यावेत.
२. त्यात बारिक चिरलेले आले-लसुण, काळि मिरी पावडर, व्हिनेगर, १ चमचा सोया सॉस, १ चमचा रेड चिली सॉस, १/२
चमचा तेल व चवीनुसार मिठ टाकुन निट मिक्स करुन घ्यावे. हे चिकन १-२ तास marinate करुन ठेवावे.
३. ओव्ह्न २२० degree celcius ला preheat करुन घ्यावा.
४. बेकिंग ट्रेला सिल्व्हर फॉइल लावुन घ्यावे. त्याला वरतुन तेलाचा हात लावुन घ्यावा आणि त्यात marinate
केलेले चिकन विंग्स ठेवावेत.

w1

५. हे विंग्स १५-२० मिनिटे ओव्हन मधे बेक करुन घ्यावेत. १० मिनिटांनी ते एकदा पलटावेत.
६. १५-२० मिनिटांत विंग्स शिजले असतील.
७. आता एका दुसर्‍या पातेल्यात, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, स्विट अँड स्पायसी रेड चिली सॉस, ब्राऊन शुगर,
सोया सॉस, red chilly flakes हे सर्व एकत्र करावे. त्यात २ चमचे पाणी टाकावे. ह्या सॉसला चांगली उकळी
आली की त्यात तयार झालेले चिकन विंग्स टाकावेत.

w2

८. त्यात वरतुन तिळ व कांद्याची पात टाकुन निट मिक्स करावे.
९. गरमा-गरम स्विट अँड स्पायसी चिकन विंग्स खाण्यासाठी तयार आहेत.

w3

w4

अप्रतिम. शेवटची दोन्ही छायाचित्रं अगदी दिलखेचक वगैरे म्हणतात तशी आहेत.

रेवती

भारी आलेत फोटू. शाकाहारींनी पनीर वापरले तर ही पाकृ होऊ शकेल काय?

खादाड

सक्काळी सक्काळी हा देखा वा पाहुन मन त्रुप्त झाले !!

पैसा

फोटो खासच आलेत! रेवती, मला वाटतं, पनीरपेक्षा फ्लॉवरचे तुरे वापरून जास्त चांगले लागेल.

तसेच, उकडलेल्या सुरण, आरवीच्या मोठ्या फोडी आणि मोठ्या मश्रूमचे दोन भाग करून चुस्तमस्त लागतील.

Mrunalini

हो आणि बेबीकॉर्न पण मस्त लागेल.

सस्नेह

चव साधारण चिकन मन्चूरियन सारखी असेल असे वाटते.

सस्नेह

चव साधारण चिकन मन्चूरियन सारखी असेल असे वाटते.

Mrunalini

नाहि गं.. चिकन मंच्युरियन सारखे नाही लागत. त्या मधे कांदा, ढोबळी मिरची वैगरे पण असते. त्यामुळे त्याची चव वेगळी लागते. ह्याची चव पुर्ण वेगळी लागते. एकदा नक्की ट्राय करुन बघ. :)

मी_आहे_ना

झकास पाकृ. आणि कातिल फोटो. 'बफेलो वाईल्ड विंग्स'ची आठवण आली.
(मिपावरच्या बर्‍याच पाकृ "भूकेतीत" असतात...जेवण झालं असो वा नसो. पोटाची नाही तरी जिभेची इच्छा होतेच होते)
:)

पिंगू

पाककृती झकास आहे. बाकी पेठकरकाकांनी दिलेले शाकाहारी पर्याय खूपच छान आहेत..

Mrunalini

अरे हो.. अरवी हा पण ऑप्श्न मस्त आहे व्हेज साठी. :)

सौंदाळा

च्यामारी, हे बघायचं राहुनच गेलं की.
खल्लास पाक्रु. करायला सोप्पी आणि खायला मस्त..

Mrunalini

सगळ्यांचे धन्यवाद :)