कलादालन
बेबी क्लोथ थीम केक
Primary tabs
नुकताच कन्या नंबर २ चा पहिला वाढदिवस झाला, त्यासाठी हा केक बनवला. तिच्या झोपण्याच्या वेळेनूसार व सुट्टीच्यादिवशी मुली नवर्या कडे सोपवून डेकोरेशन तयार केले.
जर कोणाला ड्रेस व बूट टेम्पलेट हवे असतील तर मी देवू शकते. प्रथम ड्रेस फ्री हन्ड केला कागदावर आणि मग ते टेम्पलेट वापरले.

शूजचा आकार रहावा त्यासाठी तुम्ही प्लास्टीक/टिश्यू पेपर वापरु शकता, वाळल्यावर काढून टाकायचे.


कसलं क्यूट! :)
+१..
मस्त!
काय कला असते एकेकाच्या हातात!
खरच सुंदर. अन तेही बाळ इतक छोट असताना?
असेच म्हणते
फार सुंदर ! रंगसंगती तर फारच सुखावणारी !
मस्त ! :)
मस्त !
अगदी मस्त आहे!
कसलं भारी.. खुपच छान..
नक्की कशाने बनवले आहेत ओ ते ड्रेस अन् शूज??
सहमत.
आम्हांला पण शिकवा. जर तुमची इच्छा असेल तर.
हे सगळं घरी बनवलय तुम्ही??? २ बाळं असताना...??? आणि त्यातलं एक वर्षाचं असताना???
कशाला हो आम्हाला लाजवायला असे धागे काढता??
मस्तच... छान दिसतोय केके अगदी. मार्खिपॅन वापरुन केले कि शुगर पेस्ट??
भारी...
अतिशय सुंदर. कसं काय तयार केलय?
मस्तच !!
हम्रा शलाम है...शलाम है....शलाम है...!!! :)
केक चाखायला मिळेल, कि आम्हि फक्त चित्रच बघायची???
अतिशय सुंदर. रंगसंगती छानच आहे. खुपदा ह्यात गडद (भडक) रंग वापरण्यात येतात. पण हे रंग नयनरम्य, सुखावह आहेत.
काजूपेस्ट वापरली आहे का? पाककृती सुद्धा टाका की!
हे खायचं?????????
बघायलाच भारी वाटतंय.
हे सर्व मी फॉनड्ण्ट वापरुन बनवले आहेत. मला शिकवायला नक्कीच आवडेल. फॉनड्ण्ट घरी बनवू शकता/ विकत मिळतो इकडे विल्ट्न कंपनीचा, मी तो आणला.
पाढंरा रंग आणून त्यात हवे ते खायचे रंग मिसळायचे, हलक्या छटेपासून मग गडद करायचे नाही तर खूप गडद होतात थोडावेळ मुरले की. समजा असे झालेच तर थोडे पांढरे फॉनण्ड्ट मिसळा.
शूज साठी-
आवडत्या रंगाचे फॉनण्ड्ट लाटून घ्या, खूप पातळ पण नको आणि जाड पण नको. पातळ असेल तर आकार राहणार नाही. फोटोवरुन अंदाज येईल.
टेंप्लेट वापरुन शूजचा बेस आणि वरचा भाग कापून घ्या, लहान सुरी/ त्याचे निराळे टूल्स मिळतात. असे दोन संच कापा.
थोडेसे पाणी दोन्ही तळ व वरच्या भागाच्या कडांना लावून चिकटवा व जास्तीचा वरचा भाग सावकाश कापा आणि वरील भागाची दोन्ही टोके पाणी लावून जुळवा.

शूजचा आकार राहण्यासाठी प्लास्टीक/ टिश्यू पेपर वापरा , वाळल्यावर काढून टाका.
आता बेल्टसाठी लहान पट्टी कापलेली पाणी लावून चिकटवा.
सजावट-
शूजच्या रंगाला शोभणारा दुसरा रंगाचा फॉनड्ण्ट थोडा पातळ लाटून बारिक पट्ट्या कापा व शूजच्या तळ व वरचा भाग जिथे जोडला आहे तिथे पाणी वापरुन लावा.
कुकी कटरने फुलांचे आकार कापुन चिटकवा, बेल्ट वर छोटे डॉटस लावा.
आशा करते की मी, समजेल असे लिहीले आहे.
फोटू नाहीत दिसत.. :(
मला सफारी वर दिसत आहेत्,पण दुसरीकडे नाही. जाण्कार मदत करु शकतील का?
जर मूळ पोस्ट मध्ये बदल/ अॅड करायचे असल्यास कसे करावे?
थोडे फोटू दिसतायत. ते गोड आलेत अगदी!