Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फॅन्टसी

द
दिपक.कुवेत
Mon, 05/27/2013 - 07:43
Fantacy साहित्यः १. स्ट्रॉबेरीचे तुकडे - १ कप २. रेडिमेड व्हॅनीला आईसक्रिम - २ मोठे चमचे ३. किवीचे तुकडे - १/२ कप ४. साखर - १ ते २ चमचे ४. ऑरेंज जेली ५. बर्फाचे खडे - ३ ते ४ ६. सजावटिसाठि पुदिना पान, किवी/स्ट्रॉबेरी काप/फोडि यापैकि काहिहि कॄती: १. जेली पाकिटावर दिलेल्या सुचनेनुसार ऑरेंज जेली सेट/तयार करुन ठेवा २. किवीचे तुकडे, साखर आणि ३-४ बर्फाचे खडे मिक्सर मधे घेउन त्याची प्युरे/पल्प तयार करुन घ्या (पाणि न घालता) ३. आता एका बाउल मधे स्ट्रॉबेरीच्या फोडि आणि व्हॅनीला आईसक्रिम घेउन हॅन्ड मिक्सरने किंवा मिक्सर मधे मिक्स करुन घ्या. किवी प्युरेचच भांड वापरणार असाल तर स्वच्छ धुवुन घ्या म्हणजे फळांचे रंग एकमेकात मिसळणार नाहित ४. आता सर्विंग ग्लास मधे प्रथम स्ट्रॉबेरी-व्हॅनीलाचं मिश्रण घाला ५. ग्लास हलकासा टॅप (सपाट पृष्ठभागावर किचन टॉवेल ठेवा व ग्लास हलकासा आदळा) करुन घ्या म्हणजे मिश्रण सेट होईल ६. आता ग्लासला हळुवारपणे गोलाकार फिरवत एका दुसर्‍या चमच्याने किवीचा पल्प ग्लासच्या कडेकडेने गोलाकार घाला (Same like Magic Layers steps). मी कलर कॉस्ट्रास्ट साठि किवी पल्पवर परत स्ट्रॉबेरी-व्हॅनीलाचं मिश्रण घातलं ७. तयार ऑरेंज जेलीचे तुकडे लेयरवर हळुवारपणे सेट करा. माझे जेलीचे तुकडे मिक्स झाले :D ८. मनाप्रमाणे सजावट करुन फॅन्टसी ग्लास पेश करा :) ९. वरील फॅन्टसी ग्लास तयार झाल्यावर मी शील्लक राहिलेल्या पल्प पासुन हा दुसरा ग्लास तयार केला. ग्लास मधे आधी तळाला जेली घातली. मग किवी/स्ट्रॉबेरीचं मिश्रण घातलं आणि शेवटि व्हॅनीला आईसक्रिमचे स्कुप घालुन किवीची चकती आणि स्ट्रॉबेरीच्या फुलानी सजवलं (हे उरलेल्या मिश्रणापासुन बववलय त्यामुळे ग्लास अर्धाच का? हा प्रश्न कृपया टाळावा) Fantacy 2 टिपा: १. स्ट्रॉबेरी किंवा किवीएवजी आपल्याला आवडतील/ जी सीजनल फळं उपलब्ध असतील ती घ्या पण आईसक्रिम व्हॅनीलाच घ्या म्हणजे त्या फळाची मुळ चव बदलणार नाहि. २. जेलीची स्टेप आवडत नसेल तर वगळा किंवा आवडत असेल त्या फ्लेवरची जेली घ्या (कलर कॉम्बीनेशनच्या दॄष्टिने)

प्रतिक्रिया द्या
6835 वाचन

💬 प्रतिसाद (20)
प
प्रचेतस Mon, 05/27/2013 - 07:57 नवीन
अशक्य सुंदर.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 05/27/2013 - 12:49 नवीन
भीषण शुंदोर!!! हम्रे लिये येकदम फँन्टॅन्सीच!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अक्षया Mon, 05/27/2013 - 07:57 नवीन
मस्तच आहे हा फॅन्टसी प्रकार. कलरफुल. सजावटही छानच. :)
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 05/27/2013 - 08:07 नवीन
गणेशा, ५० फक्त आदि सदस्यांनी एकदा पुणे गेट नावाचे हॉटेल ठरवून तिथे कट्टा घडवून आणला होता.. त्यात फ्रूट पंच नावाचा प्रकार अगदी अशाच प्रकारचा होता. अजूनही त्याची चव जिभेवर आहे. मस्त पाकृ.. लगे रहो.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 05/27/2013 - 09:57 नवीन
तिथे मिसळपावचे एक उत्तुंग व्यक्तीमत्व (माजी) भेटले होते. ;) दिपकशेठ कुवेतवाले ह्यांना उत्तमोत्तम पाकृ सादरीकरणाबद्दल हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
न
नि३सोलपुरकर Mon, 05/27/2013 - 08:26 नवीन
दारुण शुंदर....दिपक राव ,आपने तो मार ही डाला.
  • Log in or register to post comments
ध
धनुअमिता Mon, 05/27/2013 - 09:36 नवीन
सुंदर !!!!!!
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 05/27/2013 - 10:47 नवीन
भारी!!!
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 05/27/2013 - 10:59 नवीन
मगाचपासून हा धागा उघडायचं टाळत होते. दिपक दुष्ट आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 05/27/2013 - 11:10 नवीन
अहाहा! बाहेर उन तापवतय आणि मिपा उघडल्यावर ही थंडक मनाला लई भावली. आज पिनाकोलाडा बनवायची अतूट इच्छा मनांत आहे. त्यामुळे आज नाही पण ह्या आठवड्यात नक्कीच प्रयत्न करण्यात येईल.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Mon, 05/27/2013 - 11:15 नवीन
प्रचंड भारी.... !!!
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 05/27/2013 - 11:25 नवीन
जीवघेणे आईस्क्रीमचे प्रकार हल्ली फोटोतच बरे वाटतात !! ;)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 05/27/2013 - 11:33 नवीन
आहाहा... :)
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Mon, 05/27/2013 - 12:04 नवीन
अप्रतिम.........
  • Log in or register to post comments
N
nishant Mon, 05/27/2013 - 14:39 नवीन
एक ग्लास मला पण :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 05/27/2013 - 17:15 नवीन
झक्कास..
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Wed, 05/29/2013 - 06:17 नवीन
अप्रतिम वाटतेय. नक्की करुन पाहू !
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 05/29/2013 - 06:24 नवीन
अप्रतिम :)
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Wed, 05/29/2013 - 07:36 नवीन
लोक्स.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 05/29/2013 - 08:05 नवीन
हे इतकं करत बसायला वेळ कुठे आहे? (पुण्यात) कुठे मिळते ते सांगा लगेच निघतो.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा