Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अन्नधान्य स्वस्त आहे

ग — गंगाधर मुटे, Tue, 05/28/2013 - 02:19
अन्नधान्य स्वस्त आहे

अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे
(फक्त कारण एवढे की अन्नधान्ये स्वस्त आहे)

शेर नाही चांगला की, मी नसे कळपात त्यांच्या?
दाद का आलीच नाही, छान! वा... वा!! मस्त आहे!!!

मी म्हणालो फक्त इतुके "शब्द माझे शस्त्र आहे"
चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे

अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था
कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे

कोण गेले, कोण मेले, कोण पुसतो काळजीला
झोपली सद्भावना अन यादवी आश्वस्त आहे

पुस्तकाने कोणत्याही नोंद नाही घेतली की
कष्ट आणिक भाग्य-लक्ष्मी हाच रेशो व्यस्त आहे

कोरडा दुष्काळ तेव्हा पांढरे पक्षी दिसेना
कंच पिकलेल्या सुगीला मात्र त्यांची गस्त आहे

नापिकीच्या पावलाने काळ हा सोकावलेला
या शिवाराचा जणू तो नेमला विश्वस्त आहे

कोरडे जेव्हा भगोणे, पीठ-मिरची सापडेना
मीच माझी भूक तेव्हा, रोज केली ध्वस्त आहे

तो म्हणाला काव्य कसले? 'अभय' गझला फालतू या
(लेखणीच्या पाभरीने जीवजंतू त्रस्त आहे)

                                  - गंगाधर मुटे 'अभय’
------------------------------------------------------

प्रतिक्रिया द्या
2850 वाचन

💬 प्रतिसाद (6)
स
स्पंदना Tue, 05/28/2013 - 02:26 नवीन
__/\__.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Tue, 05/28/2013 - 06:23 नवीन
जमलिये...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 05/29/2013 - 10:32 नवीन
प्रत्येक ओळीला टाळ्या!!!
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 05/29/2013 - 22:53 नवीन
गजल आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 05/30/2013 - 00:32 नवीन
पण या दु:खात लाचारी नाहि, तर दग्धता आहे. याची गोमटी फळे नक्की मिळातील. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे गुरुवार, 11/08/2018 - 06:36 नवीन
https://www.facebook.com/photo.php?fbid=1509736822632970&set=a.1382119508728036&type=3&theater Devdatta Sangep साहेब, धन्यवाद! समीर सावंत साहेब, हा प्रकार चांगला नाही. याला चोरी म्हणतात. ज्याचे काव्य असेल त्याच्या नावाने टाकावे. शिवाय मूळ काव्याशी छेडछाड करून त्याला विद्रुप करू नये.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा