Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नभईर्षा

अ — अज्ञातकुल, Wed, 06/12/2013 - 12:48
पावसाची चाहूल आली आणि जमीनीतल्या उधईला पंख फुटले. सोहळा झाला पण कळा अवकळा झाली. .......... कोण चाहुली उलगडले गड अंधारातिल वेणा अवघड वारुळातले फुटले घट अन प्रकाशात पडझडली झुंबड क्षणभंगुर भिरभिर भर अंगण उडे पाकळी पर तिज आंदण नभईर्षेचे सोस सकस पण जड झाले पंखांचे जोखड बळ खळले गळले विरघळले स्वप्नखळे वाटेतच विरले सुटली जागा जाग जागली विद्ध कलेवर पाठी उरले ........................अज्ञात

प्रतिक्रिया द्या
1784 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/12/2013 - 13:22 नवीन
अहाहा...! सुंदर.. (पण उधई म्हणजे वाळवी तिला पंख कसे फुटेल. पंख फुटणारे ते वेगळे मुंगळे) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 06/13/2013 - 13:51 नवीन
डॉक वाळवीलाही पंख फुटतात. Image removed. (चित्र जालावरुन साभार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/14/2013 - 12:53 नवीन
माहितीपूर्ण चित्र डकवल्याबद्दल आभार. पण, लाकडं कुजवणारे पिवळे धमक असतात तीच जर उधई असेल तिला पंख फुटलेले मी पाहिलेले नाही. पण आता उधई म्हणजे वाळवीच असते किंवा नसते याबद्दल जर कोणी माहिती सांगितली तर समजून घ्यायला आवडेल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
व
वेल्लाभट Fri, 06/14/2013 - 12:51 नवीन
वाह! फारच छान.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 06/14/2013 - 14:07 नवीन
हं! फारच छान. बाकी प्राडॉ उठुन सत्यात का शिरले ब्वा? कविता वेंजॉय माडी सर!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 06/15/2013 - 08:00 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा