पाककृती
पनीर आणि मॅगीची (न्युडल्सची) भजी
Primary tabs
साहित्य :- maggy चे छोटे (५ रु. वाले) पाकिट , १/२ वाटी बेसन , १/२ वाटी किसलेले पनीर , १ हिरवी मिरची , चवीपुरते मीठ आणि तळण्यासाठी तेल .

कृती :- प्रथम नेहमी प्रमाणे maggy शिजवून गार करून घ्यावी .शिजताना मॅगिचे पाकीटातील मसालासुद्धा घालावा.
एका बाउल मध्ये बेसन, पनीर , मीठ , एकत्र करावे त्यात मिरची बारिक चिरून घालावी. पाणि घालून भज्याच्या पिठा इतपत पातळ पिठ तयार करून त्यात गार झालेली maggy घालून चांगले मिक्स करून घ्यावे.

एका कढईत तेल गरम करून मंद आचेवर भजी तळून घ्यावीत. पुदिना चटणी आणि केचप बरोबर सर्व्ह करावीत.

पनीर जास्त आवडत नसल्याने पास, पण एक मात्र खरं की तुमच्या पाकॄ एकदम हटके असतात.
लगे रहो. :)
आणि ही भजी खाउन बघ.
नक्कीच आवडतीला तुला.
याच्यात कान्दा कसा काय लागेल?
याच्यात कान्दा कसा काय लागेल?
पनीर + कान्दा?
हे कस्ले कोम्बिनेशन
आणि सगळ्यांना सांगा कशी लागत होती भजी.
छान पाकृ!
दुसर्या फटुमधल्या उजवीकडच्या पेयाचे नाव काय?
अशा रंगाच कोणतहि पेय घ्या .पण हे ...........................लेमन आईस टी आहे.
वाह! वेगळिच पाकृ!
एकदम वेगळीच पाकृ! प्रेझेंटेशन आणि फोटो पण अप्रतिम आहेत. केचप आणि चटणी एकत्र ठेवलेली खूपच छान दिसतेय!
एकदम वेगळि आणि छान पाकॄ. मॅगी कमीत कमी पाण्यात शीजवायची का? नाहितर मग बेसन जास्त घालावं लागेला का?
मॅगी शिजवताना पाणि कमी नाहि घालायचे . पाकिटावर जेवढे पाण्याचे प्रमाण दिलेले आहे तेवढेच घायचे फक्त ते पुर्ण आटले पाहिजे . म्हण़जे बेसन जास्त नाहि घालायला लागत .
खूपच छान.............पावसाळयातला भजी हा जास्त आवडीचा प्रकार,
त्यात अशी ही चटकमटक भजी .....व्वा क्या बात है.........आवडली भजी....केव्हा येऊ खायला???
chhaan! vegaLaa prakaar.
उद्याच प्रयत्न करून पाहतो.
सलग दुसरी पा.कृ. थर्माकोल घातलेली :( पर्याच्या आणि माझ्या वतीने सामायीक निषेध.
आता आम्हा गोरगरीब (फोर्स्ड) ब्याचलरांना करता येण्यासारख्या सोप्या आणि चविष्ट पा.कृ. येऊ द्या ही णम्र इनंती. :)
अवांतरः काकूंना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पंत देताना पाहून अंमळ गंमत वाटली. ;)
अतीअवांतरः मुरलेलं लोणचं आणि लग्न असच असतय.
कळेल तुलाही हळू हळू. ;)
;)
पनीर आणि मॅगी दोन्ही आवडत असल्याने ही पाकॄ आवडली.
(मनचाउ सूप प्रेमी);)
कधी कधी केलेली मॅगी सर्व संपत नाही. ती टाकून देणे जीवावर येते. हा पर्याय चांगला आहे.
मस्त!
काहीच्या काही
म्हणजे हटके हो ..
नक्की करून बघणार ....
आणि ह्यामध्ये चीज कसे लागेल ??
सगळ्यांचे मनःपुर्वक आभार.
पराशेट, धमाल मुलगा, गणपा . ........... तरि विचार करते आहे तुम्हा तिघान्चि मैत्रि एवढि घट्ट मैत्री कशी.........? आता कळल.
एकदम! पनीरसारखी घट्ट!