Welcome to misalpav.com
लेखक: नर्मदेतला गोटा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

इ - चिखलत वैगरे असेल तर तयार व्हा, कारण पुणेरी मिपाकर आता तुम्हाला काही सोडणार नाहीत. तेव्हा शाब्दिक हल्ल्यासाठी तयार रहा … ( ह. घ्या)

पुण्याच्या मध्यवर्ती भागातली एक मिसळ अशीच चर्चेत असते. आपण खानदानी पुणेकर आहोत हे दाखवण्यासाठी याचेही कौतुक करणे भाग आहे.
गुरुजी परवा मी पुण्यात आल्यावर तुम्ही प्रेमाने खाऊ घातलेली मिसळ ती हिच का वो? ;) नंतरचे १२०/३०० मात्र भारी होते पण तो भय्या होता ना?

ती मिसळ हि नै रे अभ्या! आणी धागाकर्ते म्हणतात,ती पुण्याचं नाव घालवणारि बेडे(ढे)कर ;-) मिसळ. आणी पानवाला भैय्याच होता. :-)

आपल्या गावच्या गोष्टींचं कौतुक करण्याच्या बाबतीत कोल्हापूरकर पुणेकरांच्या कैक योजने पुढे आहेत. कोणत्याही मूळच्या कोल्हापुरी असलेल्या माणसाच्या उपस्थितीत "कोल्हा", "पूर" किंवा "कोल्हापूर" असे नुसते शब्द उच्चारले तरी काही क्षणातच कोल्हापूरकरांची रसवंती सुरू होते व पुढला तासभर कोल्हापूरचे कौतुक ऐकावे लागते. त्या कौतुकात कोल्हापूरची उत्कृष्ट हवा (या हवामानात काय ग्रेट आहे हे आजतगायत मला समजलेले नाही), रंकाळा (प्रत्येक शहरात एखादा तलाव असतोच, रंकाळा तलावात काय ग्रेट आहे ते कोल्हापुरीच जाणे), कोल्हापूरच्या म्हशींचं तुम्हाला समोर उभं करून पाणी न घालता काढलेलं सकस दूध (अनेक शहरात व गावात तुमच्या समोर दूध काढून देतात. पण कोल्हापूरचं दूध म्हणजे जणू काही अमृतच अशी कोल्हापूरकरांची समजूत असते), कोल्हापूरचा गूळ (!), कोल्हापुरी लोकांचं तिखट खाणं (नागपरी मंडळी जास्त तिखट खातात, पण हे कोल्हापुरींना कोण समजावणार?), कोल्हापुरी चप्पल (चपलेचा सुद्धा अभिमान असतो), महालक्ष्मीचं देऊळ, पन्हाळा (सिंहगड काय पन्हाळ्यापेक्षा वाईट आहे?), 'अरे'ला 'कारे' म्हणणारे रांगडे कोल्हापुरी (हे अजून युपी/बिहारमध्ये गेलेले दिसत नाहीत), गुजरी (पुण्यातल्या दाजीकाका गाडगीळांचं दुकान काय कमी दर्जाचं आहे?), कोल्हापुरी पैलवान (पैलवानांचा सुद्धा अभिमान), कोल्हापुरातील कुस्त्या (!), तिथल्या पैलवानांचा रोजचा खुराक (आता मात्र हद्द झाली) . . . अशा अनेक कौतुकास्पद व अभिमानास्पद गोष्टींचा श्रोत्यांवर भडीमार होतो. कोल्हापुरी नसलेल्या कोणत्याही व्यक्तीने एखाद्या कोल्हापुरीच्या उपस्थितीत स्वतःच्या गावाबद्दल किंवा इतर कोणत्याही गावाबद्दल चार बरे शब्द काढले की कोल्हापुरी अस्वस्थ होतात आणि "हे तर काहीच नाही. आमच्या कोल्हापुरात तर . . ." असे प्रास्ताविक करून पुढील किमान अर्धा तास कोल्हापुरची अफाट स्तुती केली जाते.

च्यामारी आमच्या कोल्हापुराबाबत कायबी बोललं आमास्नी खपणार नाय ! ;) मिसळ कंची फेमस व्हो ? कोल्हापुरीच ना ? ;) बाकी समदं पांचट पानी बघा ! ;) रंकाळा आणि त्याच्यावर तरंगणार्‍या केंदाळांच बी लयं कवतिक हाय आम्हासनी ! ;) धारोष्ण दुध हे कट्यावर पचवल्या शिवाय समजायचं न्हाय तुम्हासनी ! ;) कोल्हापुरी चप्पल करकचं असा विशिष्ठ आवाज करणारी, इतकी नक्षिदार चप्पल अख्ख्या जगामंदी प्रसिद्ध हाय तवा कवतीक केल तर कशा पायी त्रास व्हतो ? ;) महालक्ष्मीचं देऊळ... अवं आदिमाया हाय ती ! :) आशा ताईंच हे गाणं जरा ऐकाचं... कुस्ती म्हंटलं की लालमाती आणि कोल्हापुरी पैलवानचं का बरं आठवतात ? ;) जाता जाता :--- दिक्षितांची माधुरी सुद्धा म्हणते मै कोल्हापुरसे आई हूं ;)

+१११११११११११. कोल्हापूरकर भलेही काही म्हणत असोत, जालावर फक्त आणि फक्त पुणेकरांची पिरपिर दिसते. त्यामुळे आम्हीही तो प्रतिसाद पूर्ण फाट्यावर मारलेला आहे. (हाडाचा मिरजकर) बॅटमॅन.

हा ना! मला वाटलं मेरीही आंखें मुझे धोका दे रही हय.

पुण्यावर आणि पुणेकरांवर भरपूर लेख झाले … आतापर्यंत स्वताच्या गावात काय चांगले हे पुणेकरांनी अभिमानाने सांगितले आणि पुणेतरांनी त्याचे दोष काढले … आता जरा जागा बदलून बोल राव… तुमच्या गावात अभिमानास्पद काही असेल आणि तुम्हाला त्याचा अभिमान असेल तर जर सांगा आणि मग त्यावर पुणेकर कसे आडवे तिडवे घेतात ते पहा आणि जमल्यास अशा विषयावर पुणेकर दाखवित असलेली सहनशक्ती तुमच्याकडे आहे का हेही तपासून पहा ...

>>> तुमच्या गावात अभिमानास्पद काही असेल आणि तुम्हाला त्याचा अभिमान असेल तर जर सांगा या आव्हानातून कोल्हापूरकरांना वगळा. नाहीतर ते एकदा सुटले की आवरायचे नाहीत. कोल्हापुरी चपला, कोल्हापुरी गूळ, रंकाळा, कोल्हापुरी तालमी, कोल्हापुरी मल्ल, कोल्हापुरी मटण, कोल्हापुरी दूध, कोल्हापुरची हवा ... अशी कोल्हापूरची अफाट स्तुती सुरू होईल आणि मग त्यांना आवरणं अशक्य होईल.

=)) ते सुवर्णमंदिरासारखं रंकाळ्याच्या मध्यभागी बांधलं असतं तर चारी बाजुची को.पु. जन्ता आनंदी झाली असती नै? ह्या राव, को.पु.करांनी जागाच नै दिली पण.

दिलदारी नाय त्यांच्यात जागा द्यायची! ;) पुणेकर बघा, समस्त अपुणेकरी मंडळीना जागा पुरवतात आणि वरुन त्यांची पुण्याबद्दल पिरपिरही ऐकतात.

>>कारण मी पुणेकर नाही
हे वाक्य लक्षात ठेव मेल्या, नंतर जर माझे आणि पुण्याचे जवळचे संबंध आहेत वैगरे लिहीलंस तर जीमोंच्या कथा आणि अनाहितांच्या लाडोबाची विडंबनं वाचायला लावेन तुला!!