विटामीनच्या गोळीवर गाणे कसे लागेल? किंवा लोनस्कीम वर सुध्दा?
होय रे होय..
पण मूळ धागा नीट वाचून मग दिला तर तो प्रतिसाद कसला.. :)
आता खरेच सिलोन म्हणजे काय हे कोणी सांगितलं तर तो हटकून एखादा नवखा मिपाकरच असणार बघ.. एरवी कोण सांगायला बसलंय ?
;)
देशपांडेसाहेब, हलके घ्या, मजेत चाललंय..
लेखक इथे सिलोनला न्याय मिळावा म्हणुन झगडतो आहे. या मुद्याकडे मी सुज्ञ वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो.
योग्य उत्तर मिळाले तर कदाचीत सिलोनला न्याय मिळेल. हे काही तरी न्यायप्रविष्ट प्रकरण असावे.
सिलोनवर आधि दर एक तारखेला गाणे लागायचे आणि आता लागत नाही म्हणुन सिलोनला कोणीतरी न्यायालयात खेचलेले दिसते.
हाच खटला वर्षानुवर्ष चालल्या मुळे नव्या पिढीच्या तो विस्मरणत गेला असावा.
सिलोन हे कदाचीत सकाळी सकाळी उभे रहायचे एखादे ठिकाण असावे. निदान महिन्यातुन एकदातरी सर्व उपभोक्त्यांना संपुर्ण समाधान मिळावे अशी सिलोन व्यवस्थापनाची ईच्छा असेल. म्हणुन उपभोक्त्यांना एक तारखेची आठवण करुन देण्यासाठी सिलोन व्यवस्थापन हे गाणे वाजवत असावे.
लेखक अधिक खुलासा करतील अशी अपेक्षा आहे.
एकदा एका बाइला जुळ्या मुली झाल्या..त्यांची नावे सिलोन आणि अलोन ! त्या दोघींचा जन्म जुळ्या असुन सुद्धा एकाच तारखेला झाला होता ..आणि एक तारखेलाच झाला होता ..
त्यामुळे त्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला किशोरकुमारचे " वापस नाही जाना आज पहिली तारीख है ,खुश है जमाना आज पहिली तारीख है ' असे गाणे म्हणायच्या ...
पुढे अलोन निघुन गेल्यामुळे अलोन झालेली सिलोन हेच गाण म्हणत बसायची ...
कळ्ळ का ?
रेडीओ सिलोन म्हटलं की आजही दर्दी श्रोते आठवणीत हरवून जातात.विविध वयोगटातील, जातीधर्मांतील,
भिन्न विचार सारणी च्या देश परदेश येथील करोड श्रोत्यांना एका सुरेल माळेत गुंफण्याचे कार्य सिलोन ने केले.१९४९ ते १९७४ या सुवर्ण काळातील अजरामर गाणी रेडीओ सिलोन ने रसिकांना केवळ ऐकविली च नाहीत तर श्रोत्यांमध्ये
एक आगळा ऋणानुबंध निर्माण केला १९४९ ते ६० व्या काळखंडात ऑल इंडिया रे डी ओ वर हिंदी सिनेमा गीतांना बंदी असतांना रे डी ओ सिलोन ने ती सारी गाणी घराघरात पोहचविली.आशिया खंडातल्या विविध भाषा मधल्या ३५ हजार ओरीजनल रेकॉर्ड्स सिलोन च्या संग्रही असून विविध भारती कडे नसलेल्या अनेक रेकॉर्ड्स चा त्यात समावेश आहे.
शिलाँगला स्थानिक भाषेत सिलोन म्हणत असावेत असं अंधुकसं आठवतंय. अधिक माहितीसाठी विकीपेडियावर साडेतेवीसतास उचकापाचक केली, पण काही उपयोग झाला नाही.
कॉलिंग : चिगो..
इशान्य भारत विषयातील जाणकार, अनुभवशिद्द असे भारत सरकारचे मानद अधिकारी साहेबमजकूर, श्री.रावसाहेब उर्फ चिगो ह्यांनी सदरहू सिलोन-शिलाँग विषयासंदर्भात अधिक मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती!
एकाच प्रतिसादात किती शिव्या घालशील, गप की जरा.. ;-) शिलाँगला सिलोन म्हणत असल्याची माहिती नाही. आता तिथल्या स्थानिकांनाही काही माहित असेल, असं वाटत नाही. आणि नेमकी कुठली भाषा, म्हणजे खासी की जैंतिया की वार-खासी की गारो, हापण प्रश्न आहेत. रच्याकने, चेरापुंजीला स्थानिक लोक 'सोहरा'म्हणतात. एक परीचित 'सोहरा'पर्यंत जाऊन 'चेरापुंजी नही मिला' म्हणत तसेच न भटकता परतले होते..:-D
बादवे, 'सिलोन' म्हणजे 'नमक का कर्ज'... सी--> सागर--> खारट--> नमक. लोन--> कर्ज.
('का' चे सोदाहरण स्पष्टीकरण : २००५ बॅच --> २००५ ची बॅच)
शनि शिँगणापूरचे अगोदरचे नाव शिलोन-सिलोन असावे .तिकडे दर बुधवारी रात्री आठ वाजता मोठी आरती असायची .पुजारी अमिन सयानी नावाचा एकजण होता आणि त्याचा आवाज म्हणे 'आकाशवाणी'पेक्षाही भारदस्त होता .पुढचा बुधवार कधी येतो याची वाट पाहात भाविक अगोदरच्या बुधवारच्या आठवणी काढून आठवडा काढत असत अशी माहिती शेजारच्या पुरष्याकाकांनी दिली .तिकडची गर्दी पाहून सरकारने दूरदृष्टीने साडेसातलाच बुधवारी गजरा विकायला प्रधांनाना सांगितले .
आणि हो, बिनाका गीत माला ही काही एका पिढीपुरती मर्यादीत नव्हती तर किमान ३-४ पिढ्यांनी तरी ते ऐकले आणि आनंद उपभोगला. ते आत्ताच्या पिढीला माहीत नसले तरी आश्चर्य काहीच नाही अथवा त्यात वाईट वाटण्यासारखे नाही. नाही तर उद्या शिवाजी परत आला तर दोन पिढ्यातला फरक दाखवत म्हणेल, यांना घोडदौडच येत नाही म्हणून! ;)
बिनाका गीत माला नावाची कोणी चांगली गाणारी नटी होती का श्रीरंग ?तिच्याबद्दलचा काही धागा पूर्वी येऊन गेला काय ?देशपांडेसाहेब एक फोटो टाकाच आणि कोणाला माशाचे पायासूपची पाकृ हवी आहे .तुम्हाला विटि-दांडूची पिदी माहिती आहे का ?
समुद्र विकत घेण्यासाठी लोन हवे असेल तर त्याला सि लोन म्हणत असावेत. किंवा लोन न घेता नुसतेच विंडो शोपिंग करायचे असेल (लोन चे ) तर सि लोन म्हणत असावेत. माझे इंग्रजी कच्चे असल्याने जाणकार अधिक प्रकाश टाकु शकतील.
समुद्र विकत घेण्यासाठी लोन हवे असेल तर त्याला सि लोन म्हणत असावेत.
सूढ्ध ल्ह्या की वो. समुद्राचे स्पेलिंग एस ई ई असे आहे. ते उच्चारशास्त्रा नुसार सवरील वेलाअंटी दीर्घ हवी. म्हणजे सीलोन. उर्दू मध्ये म्हणावयाचे झाल्यास तुमचे म्हणणे "लोन ए सी" मतल्ब "कर्ज ए दरीया " असे घेतल्यास त्याचा अनर्थ होतो. यावरून इंग्रजी भाषेत "दूध का कर्ज" अर्थात मराठीतला " उपकार दुधाचे"हे चित्रपट आठवल्या गेले आहेत.
त्यातील हीरोचे साप कुत्रा नाग यांच्या सोबत चांगले जमत होते.
हल्ली प्राणी मित्र संघटनानी अशा चित्रपटांच्या चित्रणावर बम्दी आणली आहे. ती ऊटवावी. म्हनजे लोकाना कासव , गोगलगाय यांच्या गृप डान्स बघता येतील.
मी धम्याला घेवून "तेरी बाहो मे" अशा नावाचा चित्रपट काढायच्या प्रयत्नात आहे. "हेन्री" नावाचा ऑक्टोपस हे त्याचे मूख्य आकर्षण आहे. चित्रपटात हीरो ऑक्टोपसच्या गळ्यात गळा घालून "तेरी बाहो मे गुजरा जमाना" हे गाणे गातो.
प्रत्येक कडव्यात ऑक्टोपस हीरोल नव्या हाताने गळामिठी घालतो. एकुण आठ कडव्यांचे झक्कास गाणे आहे. लड्डाख च्या पठारावर चित्रीत केले गेलेय.
मी धम्याला घेवून "तेरी बाहो मे" अशा नावाचा चित्रपट काढायच्या प्रयत्नात आहे. "हेन्री" नावाचा ऑक्टोपस हे त्याचे मूख्य आकर्षण आहे. चित्रपटात हीरो ऑक्टोपसच्या गळ्यात गळा घालून "तेरी बाहो मे गुजरा जमाना" हे गाणे गातो.
प्रत्येक कडव्यात ऑक्टोपस हीरोल नव्या हाताने गळामिठी घालतो. एकुण आठ कडव्यांचे झक्कास गाणे आहे. लड्डाख च्या पठारावर चित्रीत केले गेलेय.
अहो विजुभाऊ.. कधीपासून होतंय असं? आफ्रिकेत तब्ब्येतीची काळजी घेत नाही आहात वाटतं.
पण काळजी करु नका. मेडिकल सायन्स खूप पुढे गेलंय. यावरही नक्की काहीतरी उपचार उपलब्ध असतील..
सध्या आफ्रिकेत आहात तोवर हे औषध रोज संध्याकाळी घेत जा. डोस / प्रमाण बाजूला दाखवलंयः
बघा बघा मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो.
प्रोत्साहन म्हणून काही नाहीच.
ते अमिन सायानी बघा कसे प्रोत्साहन बोलायचे ढेकर दिल्या सारख्या ष्टायलीत. अब्ब्ब्ब्बा.अब हम आ रहे है अगली पायदान पर. और यहांपर है तीन गाने........
प्रतिक्रिया
काय हो खरंच सिलोन म्हणजे?
सी व्हिटॅमिनची एखादी
अहो गवि, विटामीनच्या गोळीवर
विटामीनच्या गोळीवर गाणे कसे
जुन्या रेडिओवर हे नाव असायचे,
लेखक इथे सिलोनला न्याय मिळावा म्हणुन झगडतो आहे.
काय बी नाय काळल! :[
म्हणजे श्रीलंका
बसली गविराजांची गोळी बराबर.
- तुमच्याकडे रेडीओ आहे का?
अलोन
और पहले पायदान पे है देशपांडे
+१
(No subject)
शेवटी कायतर …उत्तर कुणालाच माहीत नाही …
शेवटी काय तर उत्तर माहित नसणे
Radio_Ceylon
सिलोन हे श्रीलंकेचे जुने नाव
आणखीन एक मासा गळाला लागला.
रेडीओ सिलोन म्हटलं की
तिसरा मासा !
ठ्ठो:!!!
ए! देव्हार्यात कशाला?
अय्या !
रच्याकने, माश्यांना पाय नसतात
ज्याअर्थी,
सिलोन......
शिलाँग?
गप की रे..
शनि शिँगणापूरचे अगोदरचे नाव
कदाचित हे असावे
सिलो-न
हे घ्या
ठो ठो ठो हसलो...
काकांच्या घरच्या माशाच्या सुपाच्या पाकृच्या
च्यायला! लक्षातच नाही आलं!
बिनाका गीत माला नावाची कोणी
परत एकदा...
कुठे कुठे
समुद्र विकत घेण्यासाठी लोन
हे बोल्ले फायनॅन्शियल
समुद्र विकत घेण्यासाठी लोन
मी धम्याला घेवून "तेरी बाहो
दाखवायला बाटली अन प्यायला चहा
ओऽऽ...आवरा!
=))
जरा 'विषय'चा टेक्स्टबॉक्स
धम्मुडी गं धम्मुडी! मज्जा आहे
अरारा....बेक्कार फुटलो.
बघा बघा मराठी माणूसच मराठी
Pagination