Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

....तसं नाहीये

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Tue, 06/25/2013 - 20:38
समुद्राच्या अंगी आवेग भिनायला भरतीची जोड लागते . संध्येला कातर व्हायला सूर्यास्ताची वेळ लागते . चातकाच्या आतुरतेला वसंताची ओढ लागते . पाण्याला नितळ व्हायला स्वच्छ सूर्यप्रकाश लागतो . मातीला गंधाळायला पहिल्या पावसाची सर लागते . प्राजक्त ओघळायला पहाटेची साथ लागते . मोगर्‍याला गजरा व्हायला धाग्याची गाठ लागते . मऊ साय धरायला दुधाला धग लागते . साध्या पाण्याचे थंडगार तुषार व्हायला कड्यावरुन कोसळावे लागते . हवेला कुंद व्हायला धुक्याची हाक लागते . इतकचं काय, चंद्र उठून दिसायलासुद्धा रात्रीचे आंगण अन् चांदण्यांचे कोंदण लागते . पण तुझं तसं नाहीये गं तुझं... तसं नाहीये |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२८/०५/२०१३)

प्रतिक्रिया द्या
6231 वाचन

💬 प्रतिसाद (24)
अ
अभ्या.. Tue, 06/25/2013 - 21:19 नवीन
ओह्हो. सिंप्ली ग्रेट रे. आम्हाला प्रतिसाद द्यायला पण शब्द हुडकावे लागतात. तुझं तसं नाहीय्ये रे मिका.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 06/26/2013 - 02:10 नवीन
पाण्याला नितळ व्हायला स्वच्छ सूर्यप्रकाश लागतो
पाण्याला नितळ व्हायला किरणांची झालर लागते कविता अन कल्पना दोन्ही आवडल.
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Wed, 06/26/2013 - 06:32 नवीन
+१ किंवा - पाण्याला नितळ व्हायला प्रकाशाची उब लागते कविता आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
च
चाणक्य Wed, 06/26/2013 - 05:12 नवीन
शेवटच्या दोन ओळी....... क्या बात हैं...
  • Log in or register to post comments
र
रुमानी Wed, 06/26/2013 - 06:00 नवीन
तुमच बरं आहे पण हे ....!
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 06/26/2013 - 07:13 नवीन
कविता बनवायला उपमांची प्लेट लागते.. कडवी बांधायला यमकांची जुडी लागते.. पण तुझं तसं नाहीये रे मिका.. तुझं तसं नाहीये. .......... कविता ठीक. शेवटच्या दोन ओळीत सगळा जीव आहे, बाकीची जुळणी उत्स्फूर्त नाही. तू फार वरचं स्टँडर्ड सेट करुन ठेवलं आहेस, तेव्हा चूक तुझीच.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 06/27/2013 - 14:42 नवीन
शेवटच्या २ ओळींसाठी बाकी रचना केल्यासारखे वाटले. म्हणजे काय, ही रचना वाटली. उत्स्फूर्त आविष्कार नाही वाटला नेहमीसारखा. तरी ठीक. उन्नीस-बीस चालतंय कधी मधी! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
M
michmadhura Wed, 06/26/2013 - 07:32 नवीन
खूप आवडली.
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ Wed, 06/26/2013 - 12:13 नवीन
मला हि
  • Log in or register to post comments
क
कोमल Wed, 06/26/2013 - 12:42 नवीन
मस्तच मिका.. क्या बात है... खुपच छान.. अतिशय आवड्या..
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 06/26/2013 - 13:15 नवीन
गविंशी सहमत!! शेवटच्या दोन ओळीच अख्खी कविता खाऊन टाकतात.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 06/26/2013 - 16:23 नवीन
महौल इतका जबरी झालयं की आता यावर उतारा यायलाच हवा!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 06/26/2013 - 17:42 नवीन
सर्वात जास्त आवडलं ते
मऊ साय धरायला दुधाला धग लागते
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 06/26/2013 - 19:03 नवीन
मिका मिपाचा हिरा आहे हिरा.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 06/26/2013 - 21:44 नवीन
ह्याचा ऑटोग्राफ घेऊन ठेवा रे कुणीतरी माझ्यासाठी. ज्येष्ठ कवी पद्मविभूषण मिसळलेला काव्यप्रेमी ह्यांचा संदेश नि स्वाक्षरी. ;)
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता गुरुवार, 06/27/2013 - 03:15 नवीन
खूप आवडली. मोगर्‍याला गजरा व्हायला धाग्याची गाठ लागते ह्या ओळी सर्वात आवडल्या.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 06/27/2013 - 04:24 नवीन
पण तुझं तसं नाहीये गं तुझं... तसं नाहीये वाह! सगळी कविता वाचल्यावर हा शेवट समर्पक आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाव Mon, 07/01/2013 - 23:01 नवीन
Namaskaar Mi.Ka. mastach.. khoop diwasanni yeNe zhaale ani tumchi kavita wachaayla miLali. sundarach..
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Tue, 07/02/2013 - 23:17 नवीन
सुंदर... फार आवडली..
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sat, 07/06/2013 - 04:27 नवीन
आवडली कविता. :)
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Tue, 07/09/2013 - 09:50 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
फ
फिझा Tue, 04/19/2016 - 09:01 नवीन
अप्रतिम !!
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 04/19/2016 - 15:02 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
उ
उल्का Wed, 04/20/2016 - 10:27 नवीन
खूप सुरेख आहे! शब्दान्ना जुळुन यायला भावनान्ची साथ लागते. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा