Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सुप्त

अ — अज्ञातकुल, Wed, 06/26/2013 - 09:22
सात स्वरांतिल सूर वाहिले दूर राहिले काही सुप्त काहिली झाले त्यातिल उलगडले नच काही गुच्छ बांधले जपले मार्दव अंगिकारले देही विस्कटलेले तळी झाकले वर्ज्य न केले तेही श्वासांची स्पंदने गोमटी कधी विकल अवरोही आरोहात कथा वचनांच्या व्यथा गूढ संदेही विरघळल्या न जळाल्या समिधा दिशा पेटल्या दाही दाह जाहले प्रतिमा अंकित प्रियकर त्यात विदेही खेळ क्षणांचे दीर्घ वेदना कंड सुखावह तरिही तलम ओंजळी एकांताच्या जळ करतळ निर्मोही मेघ पापणीआड बिंब प्रतिबिंब स्वप्नवत पाही जीवन लयमय ऋतू आगळा चिन्मय पवन सदाही ..............................अज्ञात

प्रतिक्रिया द्या
1484 वाचन

💬 प्रतिसाद (6)
य
यशोधरा Wed, 06/26/2013 - 11:45 नवीन
दुसरं कडवं अतिशय आवडलं.
  • Log in or register to post comments
न
निनाव Tue, 07/02/2013 - 19:26 नवीन
surekhach.... shubhechha!
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Mon, 07/08/2013 - 18:34 नवीन
सात स्वरांतिल सूर वाहिले दूर राहिले काही यातच सर्व आले. कविता आवडली हेवेसांनल
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 07/08/2013 - 21:35 नवीन
सुप्त- आत्मा -त्रुप्त
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Tue, 07/09/2013 - 06:29 नवीन
सर्वांचेच मनापासून आभार .....:)
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 07/09/2013 - 15:11 नवीन
विरघळल्या न जळाल्या समिधा दिशा पेटल्या दाही दाह जाहले प्रतिमा अंकित प्रियकर त्यात विदेही
__/\__!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा