पाककृती

मँगो शिरा

Primary tabs

Sheera

साहित्यः
१. रवा - १ वाटि
२. साजुक तुप - पाव वाटि
३. ताजा मँगो पल्प - १.५ वाटि (नसेल तर टिन्ड/कॅन मधला वापरु शकता पण चवीत फरक पडेल)
४. दुध/पाणी - १ वाटि प्रत्येकि
५. चवीनुसार साखर (आंब्याच्या गोडिनुसार)
६. बारीक चीरलेले बदाम/पिस्ते
७. पाव चमचा वेलचीपुड

कॄती:
१. मंद आचेवर एका नॉनस्टिक कढईत तुप तापलं कि रवा खमंग भाजावा/परतावा
२. एका भांडयात १ वाटि दुध आणि पाणी एकत्र करुन उकळि आणावी
३. परतलेल्या रव्यात उकळलेले दुध/पाणी घालावे व दणदणीत वाफा काढुन रवा मोकळा करावा. गरज भासल्यास रवा मोकळा करण्यासाठि परत दुधाचे हबके मारुन १-२ वाफा काढाव्या
४. आता त्यात मँगो पल्प, चवीनुसार साखर व वेलचीपुड घालुन एकजीव करावा व एक १०-१५ मि. गॅस बंद करा. मधे मधे ढवळलात तरी ठिक अन्यथा शिर्‍याची खरपुड पण छान लागते. निदान मला तरी आवडते :)
५. वरुन बारीक चीरलेले बदाम/पिस्ते पेरुन गरमा गरम मँगो शिर्‍याचा लुफ्त घ्यावा

टिप: मँगो पल्प शक्यतो मिक्सर मधुन काढु नका. शिरा खाताना मधे मधे जो आंब्याचा गर येतो त्याने खायची लज्जत अजुन वाढते. कॅन मधला असेल तर पर्याय नाहि :D

किसन शिंदे

हा शिरा बनवून पाहाला हरकत नाही. फोटो मस्तच आहे. :)

कवितानागेश

आंबा असताना वेलची कशी लागेल शंका आहे.
मी नुसताच आम्बा घालून करते. भारी लागतो. :)

हो....... आंबा असल्यावर वेलची घालू नये...फक्त आंब्याचा स्वादच छान लागतो...
मी परवाच असा शिरा बनवला होता..ताजा आंब्याचा रस घालून....या मध्ये मी आंब्याच्या फोडी घातल्या होत्या व थोडा रसही घातला होता

अनन्न्या

आमच्या सासूबाई शिरा फार सुंदर बनवतात, नेहमीचा शिराही प्रसादासारखा असतो.

गणपा

अलीकडेच करुन चापल्याने या वेळी जळजळ अंमळ कमी झाली. :)

बादवे गोड शिर्‍यात टॉमेटो पहिल्यांदाच पाहिला. ;)

पैसा

असा आंबरस घालून शेवयांचा पण शिरा करतात ना?

स्पंदना

त्या दणदणीत वाफा कशा काढायच्या हो?
आता वरचा फोटो बघुन जी जळजळ होतेय ती ही दणदणीत म्हणावी काय?
मस्ताड हो दिपक राव!!

मीनल

माझ्या सासुबाई आंबा भात करतात. तो ही असाच अफलातून होतो.

मदनबाण

झकास्स्स ! :)
माझ्या सासुबाई आंबा भात करतात. तो ही असाच अफलातून होतो.
च्यामारी आपल्याला तर फक्त नारळी भात माहित होता... ये अंबा भात किधर से आया ? ;)

अक्षया

आवडता पदार्थ.
फोटो आणि रेसीपी नेहमीप्रमाणेच छान. :)

विजुभाऊ

माझ्या बायकोच्या सासुबाई अस्साच मस्त पिकलेली केळी आणि अननसाचा शिरा करतात.

पैसा

तुमच्या सासूबाईंच्या लेकीसमोर असं बोलू नका! नाहीतर तिखटजाळ कॉमेंट्स ऐकाव्या लागतील!

जेनी...

दीपू काका शिरा छान दिस्तोय पण प्लेट मध्ये शिर्‍याच्या बाजुला टमाटु काय्ला ठेव्लाय ..
:-/

दिपक.कुवेत

आपल्या/दुसर्‍याच्या सासुबाई, लेकि, सुना, ताई, माई, आक्का अगदि कुणलाहि हा शिरा बनवायला सांगा आणि मनमुराद आनंद लुटा (खायचा :D)

अवांतर: पुजा आज्जी अगं आहेस कुठे? तुझ्या प्रतिसादाविना माझी पाकॄ म्हणजे दुधाविना साखर, फुलाविना सुवास, सुर्याविना प्रकाश, चंद्राविना...(जाउदे योग्य यमक सापडत नाहिये...भावना समजुन घे :D)

जेनी...

=))

दीपूकाका भावनाबद्दल काकुला माय्तेय का ??? ( भयानक घाबरीघुब्री स्मायली कल्पा बॉ आता तुमीच :-/ )

आवो काका निल्कांत काकानी मिपा बंद करुन ठेलोतं ना :-/ म्हनुन येत नोव्ती ..
यील तेवा बण्दच अस्साचं :-/ :-/
आता यीन तुमच्या पाक्रुत नकोतेवा साखर , फुलं , प्रकाश , चंद्र जे मिळल ते मिसळाय्ला :D :P

प्यारे१

अ च प्रतिम!
पाहताक्षणी खावासा वाटणारा .....मँगो शिरा.
भन्नाटच.