Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आडदांड पाऊस

ग — गंगाधर मुटे, Sun, 06/30/2013 - 16:11
आडदांड पाऊस

अडदांड बेत ओला शिजवून पावसाने
केला शिवार खच्ची भिजवून पावसाने

गाळून घाम विणले मी वस्त्र स्वावलंबी
केल्यात पार चिंध्या खिजवून पावसाने

आले मनात जेव्हा तेव्हाच निग्रहाने
केले सपाट डोंगर झिजवून पावसाने

खाण्या-पिण्यात झाला पाऊसही अधाशी
हंगाम फस्त केला निजवून पावसाने

नाही दिले कुणाला थोडे 'अभय' परंतू
खरडून दैव नेले थिजवून पावसाने

                               - गंगाधर मुटे
--------------------------------------------------

प्रतिक्रिया द्या
1771 वाचन

💬 प्रतिसाद (4)
न
निनाव Tue, 07/02/2013 - 18:49 नवीन
नाही दिले कुणाला थोडे 'अभय' परंतू खरडून दैव नेले थिजवून पावसाने hey khoop sahi waatale..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/02/2013 - 18:52 नवीन
आले मनात जेव्हा तेव्हाच निग्रहाने केले सपाट डोंगर झिजवून पावसाने -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Sat, 07/06/2013 - 11:51 नवीन
गंगा यमुना भरल्या वृद्रावतार धरिले। चारी धाम वाहुन नेले आडदांड पावसाने॥
  • Log in or register to post comments
म
मीनल Sun, 07/07/2013 - 03:33 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा