Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'ती' एक बातमी!!

न — निनाव, Mon, 07/01/2013 - 22:29
सांज होता वाट आंधळी जनावरांची काया भयाण करणारी मात्र , जंगल म्हण्जे जनावरेच नि शहर असायला माणसेच असा काही नियम नाही रक्त वाहिले का कुणी पाहिले का खोल किती जखमा चौकशी चा चष्मा घातले लोखंडी सळे वय होते खुळे सगळे मात्र कळे तरी निरपराध मी रोज रोज तेच रस्ते वेगळे नावे वेगळी भुकेल्यांची ताटे भरली उद्वेगांची गर्दी निराशेत सरली वेशी वर लखतरे मोकाट जनावरे लपलेली 'समोर' मात्र 'न' दिसणारी रडणारी ओरडणारी सोसून छळ प्राण सोडणारी निष्पाप… निरागस लक्ष वेधणारी निर्लज्जांचे , बाधिरांचे, पुन्हा एक बातमी उद्या च्या अंकात सांडलेल्या स्याहीनं ओरबाडलेल्या कागदावर लिहिणारी… सांज होता वाट आंधळी जनावरांची काया भयाण करणारी

प्रतिक्रिया द्या
2001 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 07/02/2013 - 00:02 नवीन
भन्नाट... सिंपली भन्नाट!!!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 07/02/2013 - 11:23 नवीन
:( अप्रतिम लिहितायत. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 07/03/2013 - 01:48 नवीन
घातले लोखंडी सळे वय होते खुळे सगळे मात्र कळे तरी निरपराध मी चर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 07/03/2013 - 01:51 नवीन
:(
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Wed, 07/03/2013 - 05:44 नवीन
आतपर्यंत हलवून नि:शब्द करणारी कविता....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
B
Bhagwanta Wayal Sat, 07/06/2013 - 10:00 नवीन
रडणारी ओरडणारी सोसून छळ प्राण सोडणारी निष्पाप… निरागस लक्ष वेधणारी निर्लज्जांचे , बाधिरांचे, खुपच छान...!
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Mon, 07/08/2013 - 22:38 नवीन
मात्र , जंगल म्हण्जे जनावरेच नि शहर असायला माणसेच असा काही नियम नाही
करेक्ट !!!!
मोकाट जनावरे लपलेली 'समोर' मात्र 'न' दिसणारी
परत, करेक्ट...... बहुगुणींप्रमाणेच म्हणते "आतपर्यंत हलवून नि:शब्द करणारी कविता.... "
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा