पाककृती
तांदळाची उकड
Primary tabs
साहित्यः
१ वाटी तांदुळ पिठी
१ वाटी आंबट ताक
१ वाटी पाणी
२-३ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
२-३ लसूण पाकळ्या ठेचून
१ टीस्पून मोहरी
१ टीस्पून जीरे
१/४ टीस्पून हिंग
कढीपत्ता
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर
पाकृ:
कढईत तेल गरम करून मोहरी + जीरे + हिंग + कढीपत्त्याची फोडणी करा.
त्यात हिरव्या मिरच्या व ठेचलेले लसूण घालून परतून घ्या.
आता त्यात ताक, पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून उकळी काढा.
उकळल्यावर गॅस बंद करुन त्यात तांदळाची पिठी घाला, नीट एकत्र करुन वाफ काढा.

गरम उकड साजूक तूप व कोथींबीर घालून सर्व्ह करा.
आवडत असल्यास फोडणीत हळद घाला.
साजूक तूपाऐवजी कच्च तेल घालून ही उकड खाता येते.
आहा! काय प्रेझेन्टेशन आहे. गप्प्कन् खाविशी वाट्तेय.
+++++++++++११११११११११११११११११११११
+ १
आई ग्ग! भन्नाट दिसते आहे!
ekadum bhari!
ए दिल है मुश्किल जीना यहॉ।
काय भन्नाट फोटोज आहेत. कलरकॉम्बेनेशन, प्रेझेंटेशन, अन फोटो काढताना दाखवलेली कल्पकता.
पाककृती विभागाला एका वेगळ्याच पातळीवर नेलं आहे या प्रेझेंटेशन्सनी.
तोंडाला पाणी सुटल ते वेगळच. त्याची तर बातच नको.
एक्दम भन्नाट फोटो... सकाळी सकाळी पोटात डोम्ब उसळ्ला बघा.... :)
आहाहा... नुसता फोटो पाहुनच हवरटपणा करावा आणि तो वाढावा असे वाटु लागले आहे. :)
मस्त आणि सोपी पाककृती. कच्च्या तेलाबरोबर काय किंवा साजुक तुपाबरोबर काय, मस्तच लागणार उकड.
आज केली होती उकड.
चित्रात दाखविल्याइतकी पांढरीशुभ्र झाली नाही. - कारण हिंग जास्त झाला असावा.
ह्या पाककृतीत रव्याच्या उपम्या प्रमाणे बारीक चिरलेला कांदा घातला, फोडणीत उडीदाची + चण्याची डाळ घातली आणि पाण्याचे प्रमाण वाढवून २ वाट्या पाणी घातले तर अजून चांगली होईल असे वाटते. अर्थात, ती उपम्याच्या जास्त जवळ जाणारी असेल.
आम्ही हळद आणि वरून कच्चं तेल घालून खातो.
आई पण हळद घालते. फोटो मस्त आलेत पण मला हा प्रकार अजीबात आवडत नाहि. कितीही उकडलं/काहिहि घातलं तरि नुसते उकडलेल्या तांदुळाच्या पीठाचे गोळे खातोय असं वाटतं.
<<कितीही उकडलं/काहिहि घातलं तरि नुसते उकडलेल्या तांदुळाच्या पीठाचे गोळे खातोय असं वाटतं.>>
ज्याची त्याची आवड :) मला तर खूप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प आवडते :) :)
तुम्चि रास तुळ आहे का? प्रत्येक पाक्रुमधे अप्रतिम सादरीकरण असते.
असावी भौतेक. सगळं कसं मोजून मापून, लै हिशोब करुन असतं पण लोकांना लै जब्रा वाटतं.
(च्यामारी तुळेचे असून पण आमचंच सादरीकरण कसं गंडतं हमेशा? ;( )
नका वाईट वाटून घेऊ. माझी रास पण तुळच आहे आणि पदार्थाचा मेकअप करणे मलापण जमत नाही.(बहुतेक स्वतःच्या मेकअप आवरता घेतला तर जमु शकेल असे वाट्ते).
पण माझी रास तूळ नाहीचे मुळी :P :D
झटपट होणारी म्हणून उकड खूपदा केली जाते, पण इतकी घट्ट नसते. आणि साहित्याची मांडणी इतकी अप्रतिम की उकडीएवढा सोपा प्रकार वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलाय! मस्त!
कच्चा कांदा राहिलाच की हो!!!
ह्या उकडीबरोबर कच्चा कांदा नसेल तर काही मज्जा नाही...
सुंदर......................मस्त...............आम्ही याला उकडपिंडी म्हणतो....... आम्च्या सासूबाई करतात नेहमी, :)
दिसतंय छान.
चवीला कसं लागेल?
उपम्यासारखं? नि टाळूला चिकटत नाय का?
- घाटावरचा.
प्रोसिजर तर उप्पीटासारखीच वाटतेय. पण चव नक्की त्यापेक्षा भारी असणार !
भारीच !!
आमच्या घरात मात्र जे तुम्ही शेवटचे दोन पर्याय दिले आहेत तशीच केलि जाते, दाटसर पातळ...... पिवळ्सर आणि वर कच्च तेल.... अहाहा...
अप्रतिम फोटो आहेत.
शेवटचा तर कायच्याकाय जीव घेणा.