छान आहेत फोटो.
एक प्रश्न विचारतो, की यातील प्रत्येक विषयाचे तुम्ही चार-पाच वेगवेगळ्या कोणातून्/उंचीवरून फोटो काढून मग त्यापैकी तुम्हाला उत्कॄष्ट वाटलेले फोटो इथे दिले आहेत का?
उदाहरणार्थ समईचा वरून काढलेला फोटो, हा समईच्या ओळखीच्या प्रतिमेला (एक उभट, उंच वस्तू) छेद देऊन जणुकाय ती एक पंचकोणी (वा पंचटोकी) वाटी आहे, असा आभास करतो,तो मजेशीर वाटतो, आणि काहीतरी वेगळेपण त्यात वाटते.( समईच्या सावलीवरून कळते की ती उंच समई आहे, त्यामुळी चित्राला आणखीनच खुमारी येते). शेवटल्या माळेच्या फोटोत जवळचे मणी आणि कापडाची वीण वा पोत यातील स्पष्टता, आणि दूरचे मणी व कापड यांची धूसरता, यांच्यामधील विरोध, हा चित्राचा मुख्य विषय (वा आशय) गृहित धरून आणखी प्रयोग करता येतील.
रुढ अँगलने काढलेल्या फोटोंपैकी शंखात ठेवलेल्या फुलाचा फोटो उल्लेखनीय वाटतो. गणपतीच्या मूर्तीचे सुध्हा अगदी वेगळ्या, अकल्पनीय, अश्या अँगलने फोटो काढण्यातून काही चमत्कृतीपूर्ण, अनवट अश्या प्रतिमा मिळण्याची शक्यता आहे...
पुढील धाग्यातून असे काहीतरी प्रयोगात्मक बघायला मिळेल, अशी आशा करतो. शुभेच्छा.
(तुमचा लोगो आणखी लहान करून दिसेल न दिसेल इतपत केल्यास आणखी बरे).
तुम्ही काढलेली छायाचित्रे छान आहेत पण धाग्याचे शीर्षक "भक्ती" ऐवजी "पूजा" बरोबर ठरले असते असे वाटते.
हम्म. पूजा मस्त नाव आहे. माझे पण अनुमोदन. :P
@पूजा मस्त नाव आहे. माझे पण अनुमोदन.>>> माझेपण...माझेपण...! ;)
बालिका-भक्ति =)) भक्ति-मय बालिका :p
छान आहेत प्रचि आणि पैसातैला अनुमोदन.
पुजेची भक्ति......छान फोटो.
मस्त ! :)
गजाभाऊ कि बात हि कुछ और है.
अर्धवटराव
छान आहेत फोटो.
एक प्रश्न विचारतो, की यातील प्रत्येक विषयाचे तुम्ही चार-पाच वेगवेगळ्या कोणातून्/उंचीवरून फोटो काढून मग त्यापैकी तुम्हाला उत्कॄष्ट वाटलेले फोटो इथे दिले आहेत का?
उदाहरणार्थ समईचा वरून काढलेला फोटो, हा समईच्या ओळखीच्या प्रतिमेला (एक उभट, उंच वस्तू) छेद देऊन जणुकाय ती एक पंचकोणी (वा पंचटोकी) वाटी आहे, असा आभास करतो,तो मजेशीर वाटतो, आणि काहीतरी वेगळेपण त्यात वाटते.( समईच्या सावलीवरून कळते की ती उंच समई आहे, त्यामुळी चित्राला आणखीनच खुमारी येते). शेवटल्या माळेच्या फोटोत जवळचे मणी आणि कापडाची वीण वा पोत यातील स्पष्टता, आणि दूरचे मणी व कापड यांची धूसरता, यांच्यामधील विरोध, हा चित्राचा मुख्य विषय (वा आशय) गृहित धरून आणखी प्रयोग करता येतील.
रुढ अँगलने काढलेल्या फोटोंपैकी शंखात ठेवलेल्या फुलाचा फोटो उल्लेखनीय वाटतो. गणपतीच्या मूर्तीचे सुध्हा अगदी वेगळ्या, अकल्पनीय, अश्या अँगलने फोटो काढण्यातून काही चमत्कृतीपूर्ण, अनवट अश्या प्रतिमा मिळण्याची शक्यता आहे...
पुढील धाग्यातून असे काहीतरी प्रयोगात्मक बघायला मिळेल, अशी आशा करतो. शुभेच्छा.
(तुमचा लोगो आणखी लहान करून दिसेल न दिसेल इतपत केल्यास आणखी बरे).
ती 'समई' नसावी. ते निरांजन वाटते आहे. समईच्या वर पिसारा फुलवलेल्या मोराची प्रतिमा आहे.
ती समई नसावी. निरांजन वाटतेय.
मस्त फोटो!
केवळ सुरेख! समई आणि माळेचा फोटो खास आवडले.
मस्त आहेत.... :)
सगळ्यांचे आभार !
चित्रगुप्त: सूचनांचे स्वागत आहे. नमूद केले आहेत आपले सल्ले.
बाकी समई आहे की निरांजन ते जाणकारांनी ठरवावं. माझं ज्ञान तितकं व्यापक नाही या बाबतीत.
छान आहेत प्रचि.
सुरेख आले आहेत फोटो.
फक्त समई की निरंजन हे कळाले नाही. मला तरी ती समईच वाटते.
क्लास्स !!