Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आधीन

अ — अज्ञातकुल, Mon, 07/08/2013 - 10:17
ओठात माणसांच्या पोटातले उखाणे मेघात चांदण्यांचे संकेत आड गाणे आधीन ओघळांच्या वाहे उदंड पाणी एकांत सागराची पागोळते विराणी थेंबास थेंब भेटे वाटेत पथिक गोटे ओसांड अंतराचे पथ सोडुनी समेटे कधि कुंपणे तळ्याची प्रतिबिंब अंबराचे साकेत भ्रामकांचे अंदाज थेट खोटे सारे खरे परंतू हृदयी उलाल कोणी मातीत सांडलेले उगवे फिरून अवनी संजीवनी जणू ही गत सुप्त भावनांना आशा अजून वेडी संदेश हा पळांना ........................अज्ञात

प्रतिक्रिया द्या
2525 वाचन

💬 प्रतिसाद (14)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 07/08/2013 - 14:20 नवीन
सुंदर!!
सारे खरे परंतू हृदयी उलाल कोणी मातीत सांडलेले उगवे फिरून अवनी संजीवनी जणू ही गत सुप्त भावनांना आशा अजून वेडी संदेश हा पळांना
मी एकदा तुमची डिक्शनरी चोरणार आहे... ;) कुठुन आणता हो शब्द?
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Mon, 07/08/2013 - 15:47 नवीन
मी एकदा तुमची डिक्शनरी चोरणार आहे... smiley कुठुन आणता हो शब्द? ते मलाही नक्की माहित नाही. तुमचा हेतू साध्य करण्यासाठी "मलाच उचलून न्यावं लागेल" शब्द सोबत येतील अशी आशा आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
स
सुधीर Mon, 07/08/2013 - 19:39 नवीन
तुमच्या कवितेतले शब्द भारदस्त असतात. खरोखरच कधी कधी डिक्शनरीची गरज भासते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अज्ञातकुल
व
वेल्लाभट Tue, 07/09/2013 - 05:11 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
य
यशोधरा Mon, 07/08/2013 - 16:13 नवीन
सारे खरे परंतू हृदयी उलाल कोणी मातीत सांडलेले उगवे फिरून अवनी संजीवनी जणू ही गत सुप्त भावनांना आशा अजून वेडी संदेश हा पळांना
सुरेख!
  • Log in or register to post comments
न
निनाव Mon, 07/08/2013 - 16:29 नवीन
mast mast.. khoopach chhan.. agreeing with MiKa
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Mon, 07/08/2013 - 17:54 नवीन
सारे खरे परंतू हृदयी उलाल कोणी मातीत सांडलेले उगवे फिरून अवनी संजीवनी जणू ही गत सुप्त भावनांना आशा अजून वेडी संदेश हा पळांना
खरेच सुरेख आहे...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 07/08/2013 - 21:30 नवीन
संजीवनी जणू ही गत सुप्त भावनांना आशा अजून वेडी संदेश हा पळांना>>> __/\__
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 07/09/2013 - 05:12 नवीन
क्या बात है! अप्रतिम !
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 07/09/2013 - 05:15 नवीन
क्या बात है. आवडली कविता
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Tue, 07/09/2013 - 06:29 नवीन
सर्वांचे मनापासून आभार :)
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Tue, 07/09/2013 - 09:18 नवीन
क्या बात है! अप्रतिम !
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Wed, 07/10/2013 - 13:29 नवीन
खुपच छान कविता आहे. आवडली
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Fri, 07/12/2013 - 17:37 नवीन
सुंदर कविता. आवडली . "उलाल" शब्द खूपच वेगळा आणि छान वाटला..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा