Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे........

व — वैभव कुलकर्नि, गुरुवार, 07/11/2013 - 05:11
थोडे कोपरे खणून बघितले. खोलीला उथळ मानून बघितले. मनाला चपळ करून बघितले. चपळतेला थोडा लगाम लावून बघितले. चंद्राला भाऊ मानून बघितले . नि पिंडाला चाहूल देऊन बघितले. पण शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे........ स्वतःला थोडे शांत करून बघितले रागाला थोडे प्रांत देऊन बघितले निळ्या आकाशी भ्रमंत करून बघितले पैसा बाळगून थोडे श्रीमंत होऊन बघितले समईला वात देऊन बघितले तर देवाला शाप देऊन बघितले पण शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे........ बघताना स्वतःला शून्य देऊन बघितले तर कोणाला पुण्य देऊन बघितले स्वतःला थोडे दुस-यात ठेऊन बघितले दुस-याला स्वतःच्यात घेऊन बघितले गंगेतील पाणी थोडे चाटून बघितले अस्थीला नदींऐवजी ओढ्यात टाकून बघितले पण शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे........ रक्त थोडे विकूनही बघितले. दुस-याचे रक्त चाखुनही बघितले. स्वतःच्यात थोडे वाकून बघितले दु:खात न्हाऊ माखुनही बघितले बघता-बघता डोळे मिटूनही बघितले सरणावर थोडे खेटूनही बघितले. पण शेवटी कळले आयुष्य न उलघडणारेकोडे आहे........

प्रतिक्रिया द्या
1642 वाचन

💬 प्रतिसाद (7)
न
निनाव गुरुवार, 07/11/2013 - 08:04 नवीन
.
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 07/11/2013 - 08:12 नवीन
"उलगडणारे" असे हवे . बाकी कवितेतले काही काळात नसल्याने पास (फक्त मिकाच्याच कविता कळणारा निर्बुद्ध ) स्पा
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 07/11/2013 - 09:45 नवीन
"उलगडणारे" असे हवे . रचना चांगलीच आहे. ...... चंद्राला भाऊ मानून बघितले . नि पिंडाला चाहूल देऊन बघितले. पण शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे........ यातली ही शेवटची ओळ दोन ओळीत विभागली तरी छान वाटेल. चंद्राला भाऊ मानून बघितले . नि पिंडाला चाहूल देऊन बघितले. पण कळतंय शेवटी, आयुष्याचे कोडं उलगडलंच नाही. इथे फक्त 'शेवटी' हा भाग वर्मानात राहून बाकी सगळे केले, बघितले, उलगडले... हे भूतकाळात जातय. यामुळे निवेदन केल्यासारखं वाटू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
र
रसिका तिलेकर गुरुवार, 07/11/2013 - 08:14 नवीन
मस्तच....
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 07/11/2013 - 09:16 नवीन
बायकोला कोपरखळ्या मारून बघितले. बायकोला उथळ मानून बघितले. बायकोला हुशार मानून बघितले. बायकोला थोडा लगाम लावून बघितले. मेव्हण्याला भाऊ मानून बघितले . सासूला हूल देऊन बघितले. पण शेवटी कळले बायको न उलगडणारे कोडे आहे........ स्वतःला थोडे शांत करून बघितले निळ्या आकाशी भ्रमंत करून बघितले पैसा देऊन थोडे श्रीमंत करून बघितले बायकोला ताप देऊन बघितले सासर्‍याला शाप देऊन बघितले पण शेवटी कळले बायको न उलगडणारे कोडे आहे........ पोलक्यात थोडे वाकून बघितले एकत्र न्हाऊ-माखुनही बघितले बघता-बघता डोळे मारूनही बघितले सोफ्यावर थोडे खेटून बसून बघितले. पण शेवटी कळले बायको न उलगडणारे कोडे आहे........
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा गुरुवार, 07/11/2013 - 14:29 नवीन
आयुष्याशी समांतर अशा बर्‍याच गोश्टी तुम्हाला इथेही भेटतिल :) मस्त लिहलय.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Sun, 07/14/2013 - 19:02 नवीन
छान लिहिलंय
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा