Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

" आम्ही वारकरी, निघालो पंढरपुरी - "

व — विदेश, Fri, 07/12/2013 - 20:41
आम्ही वारकरी, निघालो पंढरपुरी हाती टाळ, चिपळ्या, वीणा, एकतारी .. भाळावरी गंध, विठ्ठलनाम छंद विठ्ठलस्मरणांत होतो सारे धुंद .. तुळशीवृंदावनाचा डोईवर ना भार पेलतो विठ्ठल आमचा हा संसार .. भक्त सारे गुंग मुखात अभंग भजनात रंग कीर्तनात दंग .. जातीभेदा वारीत नाही हो थारा विठ्ठलभावाचा एक सर्वास निवारा .. उच्चनीच नाही, नाही रावरंक सर्वांनाच मोही विठ्ठलनाम एक .. "विठ्ठल विठ्ठल"- गर्जता शिस्तीत दिंडीला येई जोर, वाडीवस्तीत .. बाल-वृद्ध चालता चालता वारीत विठ्ठलाचा जयघोष मुखाने करीत .. रिंगणात नाचूया, विठ्ठल विठ्ठल या रे सारे गाऊ, विठ्ठल विठ्ठल .. "जय हारी विठ्ठल"- दिंडी म्हणतसे तहानभूक विसरून, धुंदी आणतसे .. जीवनी घडावा वारीचा प्रसंग जन्मोजन्मी राहील विठ्ठलाचा संग ! .

प्रतिक्रिया द्या
1339 वाचन

💬 प्रतिसाद (1)
प
पैसा Sun, 07/14/2013 - 17:23 नवीन
मस्त वातावरण निर्मिती.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा