Welcome to misalpav.com
लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वेड्यासारखी हसत सुटले आहे, कार्यालयातले लोक वेड लागले आहे का असे पाहत आहेत माझ्याकडे, अरे काय हे, काहीतरी …. आणि असा कोणता धाबा आहे जिथे केळ्याचे शिकरण भेटते. बाकी जे काही लिहिले आहे भन्नाट.

   १. त्या खास केळ्याच्या शिक्रणाची पाकृ येउ दे. २. माझी बाई मागच्या वेळेस जीप उडवताना जीपसोबत नदीत पडली. तीला सर्दी झालीये. स्पार्क प्लग मधुन सारखे मिसफायरचे फट्ट फट्ट आवाज येताहेत. यावरून मागच्या अपघाताचा प्रसंग झाला तेव्हा तुमच्या बरोबर कोणतरी बसले होते असे दिसते. "बाई"ला स्पार्क प्लग असतात ही नविन शास्त्रिय माहिती मिळाली... आतापर्यंत कुठे वाचले नव्हते. सर्दी झाल्यावर बायका शिंकांऐवजी "मिसफायरचे फट्ट फट्ट आवाज" काढतात हेही नवेच. असो. मणोरंजणाबरोबर ज्ञानात पण भर्पूर भर पडली !!! +D +D +D

भारी!! :D गावच्या कुंभाराने त्यावर मातीचा लेप देवून सुरेशचा जीव वाचवला होता. हे मस्तच.

___/\___, खालचा एकही प्रतिसाद न वाचता लिहितो आहे. नंतर पुन्हा एकदा वाचून योग्य प्रतिसाद देईन. वाचायला दहा मिनिटे लागली. हसून हसून पोट दुखायला लागले. आधीचा लेख वाचल्यावर तुमचा प्रतिसाद वाचुन थक्क झालो. बाकीचे नंतर लिहितो.

शिकरण, बाईकची सर्दी, १५/२० चा बुंगाट स्पीड, रणगाडा, डिव्हायडरवरून यू टर्न, सगळेच अतिशय जबरी =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) वायझेडसारखा सत्राशेसाठ वेळेला हसत सुटलो आहे अन तोंडातले ताक लॅपटॉपवर पसरलेय!! विजुभौ, किस ढाबे का शिक्रण खाते हो ऐसे विडंबन पाडने के लिये?

सुरेशचे इप्सीत साध्य झाले होते. रणगाडा च्या साखळ्या तुटून रणगाडात नदीत कोसळताना त्याला स्पष्ट दिसत होता. हॅ हॅ हॅ... आवडेश.

लेखातील खालील दोन प्रसंगासाठी मिपावुड मध्ये एका फिल्म साठी हक्क देण्यात आलेलेले आहेत. "एक था ताईगर" चा रीमेक निघतोय. प्रसंग १ ) रणगाड्याच्या फ्रंट विन्डशील्ड (किती लहान अस्तं म्हैतै?) सुरेश ने सोनाली अन नरेश ला पाहिले तेही सोनाली नरेशच्या खांद्यावर मान टाकून बसली होती. ***या नंतर गाणे आहे " बहारो फूल बरसाऑ ( रीमिक्स) रणगाड्याच्या चेन मध्ये सायकल अडकून फक्त दोन स्पोक तुटले. रणगाड्याची मात्र चेन तुटली. सुरेश अन सोनाली ने रणगाडा पडताना त्यातून बाहेर उडी मारुन जीव वाचवला.( *** या नंतरही गाणॅ आहे "सोने की हँडल चांदीकी सीट .आओ चले डार्लींग चले डब्बल सीट ( स्लो स्पीड मधे ( ये दोसती हम नही तोडेंगे....... शोले मधे शेवटी जसे होते तसे " है का नाय सलमान खानचा " एक था ताईगर".... सुपर रीमेक

हितली लोकं बावळीच हैत. उगं येड्यासारखी रोज रोज मिपावर येतात काय, रोज रोज लेख वाचतात काय, त्या लेखांचे संदर्भ लक्षात ठेवतात काय अन मग त्यावर आलेली विडंबनंपण वाचतात, त्या विडंबनांच्या वर-खाली कुठेतरी दिलेली लिंक क्लिकवून मूळ धागाही पाहतात काय अन बावळ्यागत हसतात काय! खुळ्याची चावडी है जी सगळी. त्यातल्यात्यात एक गोष्ट जमेची- विडंबन म्हणजे काय त्ये 'लोक्सांना' ठाऊक आहे, आणि विडंबन कळण्यासाठी मूळ कलाकृती(?) आधी पहावी लागते इतकं उमजतं ह्या खुळ्यांना. :)

*lol* *lol* *lol* कथा तर कथा, प्रतिसादही जबरा आहेत

काय राव नुस्ती धमाल आहे ही कथा. प्यान्ट काय, शिकरण काय, तमाशा काय, सायकल काय, रणगाडा काय अन काय काय. यापूर्वी वाचली होती तेंव्हा काही समजले नव्हते, कारण प्रेरणा - कथेकडे लक्ष गेले नव्हते. आज दोन्ही कथा वाचल्या आणि कलेजा खलास झाला. वाचताचि या कथेला, कलेजा खलास झाला.